प्रवाशांसाठी टॅब आणि लॅपटॉप सुविधा देणा-या हायटेक ऑटो चालक अन्नादुराई याचे दहा हजार फेसबुक फॉलोअर्स!

प्रवाशांसाठी टॅब आणि लॅपटॉप सुविधा देणा-या हायटेक ऑटो चालक अन्नादुराई याचे दहा हजार फेसबुक फॉलोअर्स!

Sunday July 31, 2016,

2 min Read

तुम्ही असा विचार करू शकता का? की, एका साध्या ऑटोचालकाचे दहा हजार फॉलोअर्स असतील इतकेच नाही त्यांची रिक्षा म्हणजे जणू काही एखाद्या आयटी तज्ज्ञाचे कार्यालय वाटते. जेथे २ टॅब आणि लॅपटॉप उपलब्ध आहेत. हे आहेत अन्नादुराई!

image


अन्नादुराई उर्फ ऑटो अन्ना दुराई २०१२मध्ये बारावीचे शिक्षण अर्धवट सोडून रिक्षा चालवितात. त्यांच्या या ऑटोरिक्षाने सा-यांना चकीत केले आहे. त्यांच्या या ऑटोरिक्षामध्ये कित्येक प्रकारची वृत्तपत्र, नियतकालिकांसह पुस्तके आणि लहानसा टीव्ही, वाय-फायदेखील आहे. जेंव्हा एकादा चेन्नईवासी किंवा बाहेरचा प्रवासी त्यांच्या रिक्षेत बसतो त्याला हे सारे पाहून सुखद धक्का बसल्याशिवाय रहात नाही. इतकेच नाहीतर चेन्नईत सर्वात जास्त पसंती असलेले ते ऑटोचालक आहेत. वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर अन्नादुराई यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक होत आहे. आतापर्यत त्यांनी ४०पेक्षा जास्त कॉर्पोरेट कार्यालयात भाषणे दिली आहेत. ३१ वर्षांचे अन्नादुराई हुंदई व्होडाफोन, रॉयल इनफिल्ड डेन्फो तसेच गेमेसा सारख्या कंपन्यातून कामगारांना संबोधित करत आहेत. केवळ चेन्नईतच नाहीतर बंगळूरू, हैद्राबाद मुंबई पुणे गुरगाव सारख्या शहरात त्यासाठी गेले आहेत.

image


अन्ना ने आपल्या ऑटो रिक्षामध्ये टॅबलेट, आयपॅड तसेच लॅपटॉप ठेवले आहेत. जेणे करुन त्यांच्या ग्राहकांना या सेवा मिळू शकतील. इतकेच नाही तर त्यांनी सोबत स्वायपींग मशीन ठेवले आहे.त्यामुळे प्रवाश्यांना सुट्ट्यापैशांची चण चण भासत नाही. या मागचे कारण देखील रोचक आहे. जेंव्हा प्रवाश्यांकडे सुट्टे पैसे नसतात तेंव्हा ते त्यांना म्हणतात की पुढच्या वेळी द्या, पण प्रवाश्यांना हे लज्जास्पद वाटायचे. ही समस्या दूर करताना त्यांनी स्वायपींग मशीन ठेवले आणि लोक त्यामुळे डेबीट किंवा क्रेडीट कार्डाने पैसे अदा करु शकतात. ते अंतरानुसार प्रवाशांना १०, १५, २०, २५ रुपये आकारतात.

image


अन्नादुराई खास दिवसांत आपल्या ग्राहकांना सवलतही देतात. विशेषत: शिक्षकांना ते अशी सेवा देतात. वॅलेन्टाईन दिनाला प्रेमी देखील त्यांच्या या खास सेवेचा आनंद घेतात. मदर्स डेच्या दिवशी ते मुलांसोबत प्रवास करणा-या आईंना मोफत सेवा देतात.

अन्नादुराईना वाटते की प्रत्येक प्रवाशी त्यांची सेवा घेऊन खूश व्हायला हवा. ते महिन्याला ४५ हजार कमावितात आणि त्यातील ९ हजार रुपये सेवांवर खर्च करतात. ते एक अॅप तयार करण्याच्या तयारीत आहेत जेणे करून त्यांची वाट पाहणा-या ग्राहकांना हे कळावे की त्यांची रिक्षा कुठे आहे आणि ती खाली आहे की नाही.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया 

    Share on
    close