डॉ. रितीका ओबेराय यांच्या धाडसी प्रवासाबद्दल त्यांचे सर्वत्र होत आहे कौतूक!

डॉ. रितीका ओबेराय यांच्या धाडसी प्रवासाबद्दल त्यांचे सर्वत्र होत आहे कौतूक!

Friday June 23, 2017,

2 min Read

डॉ रितीका ओबेराय या आणखी एका महिलेने पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणा-या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. एक्स्ट्रीम ४ या ऑफ रोड स्पर्धेत त्यांना एकमेव महिला स्पर्धक म्हणून विशेष पुरस्कार देण्यात आला.

त्यांनी ४*४ एसयूव्ही जेके टायर एक्स्ट्रीम ४ प्ले २०१७ स्पर्धेत भाग घेतला होता. रितीका या त्यांच्या मिड २० मध्ये एकमेव महिला ऑफ रोड स्पर्धक होत्या. जो धाडसी आणि उत्कंठावर्धक खेळाचा प्रकार आहे, त्या दंतवैद्यक आणि उद्योजक देखील आहेत. अशा प्रकारच्या विशिष्ट स्पर्धेत भाग घेवून त्यांनी आव्हानात्मक कामगिरी केली जसे की नदीतून, आव्हानात्मक वाळवंटातून प्रवास केला. त्या म्हणाल्या की, “ पुरूषांची मक्तेदारीचा हा खेळ असल्याने त्यात आव्हान होते. तुम्ही अगदी पुरूषाच्या बाजूला उभे राहून आव्हान देता आणि सिध्द करता की महिला देखील काही कमी नाहीत. ही देखील एक महत्वाची बाब आहे.”


image


रितीका ज्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत, सध्या गुरगांव येथे राहतात. ऑफ रोड प्रकारच्या स्पर्धेत त्या गेल्या पाच वर्षापासून सहभाग घेत आहेत. रँलींग आणि ड्रायव्हिंगच्या त्यांच्या छंदातून त्यांचा हा खेळ विकसित करण्याकडे कल झाला, त्यात त्यांच्या मित्रांनी जे स्वत: पुरूष आहेत आणि स्त्रियांचे हे क्षेत्र नाही असा ज्यांचा समज आहे आणि ऑफ रोड चे शौकीन आहेत त्यांनी भर घातली, फेब्रूवारी महिन्यात त्यांनी चंदीगढ येथे या स्पर्धेत भाग घेतला. ही तीन दिवसांची सात स्तरांची स्पर्धा होती, जी रोपोर जिल्ह्यात १८००एकरच्या अभयारण्यात आयोजीत करण्यात आली होती. खेळातील त्यांचा सहभाग केवळ इथवर थांबला नाही, त्या चांगल्या व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू देखील आहेत.

मात्र घरातील अडचणी ओलांडून येणे सर्वानाच इतके सोपे नसते, घरच्यांच्या पाठींब्या बाबत बोलताना त्या म्हणतात की, “ माझे वडील नेहमीच प्रोत्साहन देतात, मला हवे तसे जगायला देतात. माझ्या आईला मात्र माझी फारच काळजी वाटते, पण म्हणून काही तुम्ही सदैव घरात बसून तर राहू शकत नाही ना?”

    Share on
    close