एका काश्मिरी दंपतीने आपला जीव धोक्यात घालून आपल्या पंडित मित्रांच्या घरी पाठविले धान्य! दहशतवाद्यांना चोख उत्तर ‘हम सब एक है’!

0

पाकिस्तानच्या नापाक इराद्यानी काश्मीर आणि तेथील जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी येथील काश्मिरीच्या मनात ते कधीच जागा मिळवू शकणार नाहीत असा संदेश एका छोट्याश्या घटनेतून काश्मीरी मुस्लिम समाजाने पाकिस्तानला दिला आहे. अशावेळी जेंव्हा हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचा मृत्यू झाल्यानंतर काश्मीर जळत आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त भागात संचारबंदी आहे, स्थिती खूपच तणावाची आहे असे असूनही एका शूर मुस्लिम महिला जुबैदा बेगम यांनी आणि त्यांच्या पतीने आपला जीव धोक्यात घालून आपल्या पंडित मित्रांच्या घरी धान्य पोहोचविन्याचे काम केले आहे. ही घटनाच देशांच्या एकजिनसी संस्कृतीचे द्योतक आहे.

श्रीनगरच्या तणावपूर्ण रस्त्यांवरून धान्याची पोती पाठीवर घेऊन जात आहेत, त्या मित्रांसाठी ज्यांनी झेलमच्या त्या बाजूने त्यांची आठवण काढली आहे. काश्मीर मधील हिंदू-मुस्लिम समाजात दुही माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना यात छोट्याश्या घटनेने श्रीमुखात दिली आहे की, ‘आम्ही तुमच्या हिंसेला घाबरत नाही आम्ही एक आहोत’

जुबैदा सांगतात की, त्यांच्या मैत्रिणीने त्यांना फोन करून सांगितले की त्यांच्या घरात धान्याची गरज आहे. त्यांच्या सोबत आजारी आजी राहते. “मी माझ्या मैत्रिणीचा आवाज ऐकून तिच्या घरी धान्य पाठविण्याचा निर्णय घेतला. हे खूपच कठीण होते. पण आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला”

एका वृत्तानुसार अशावेळी जेंव्हा दुकाने बंद आहेत, वाहनांची काहीच व्यवस्था नाही, या दंपतीने पायी चालतच आपल्या पंडित मित्रांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जरी पोलिसांनी तेथे येण्याजाण्यास मज्जाव केला होता. असे असूनही हे दांपत्य जवाहरनगर वरून दिवाणचंद यांच्या घरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. दिवाणचंद सांगतात की, येथे सारे लोक चिंतेत आहेत. तरीही आम्ही खुश आहोत की या मित्रपरिवाराने आपला जीव धोक्यात घालून मानवतेला जिवंत ठेवले आहे.

दिवाणचंद यांचे कुटूंब वर्षानुवर्षे खो-यात राहते. ते ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करतात. त्यांची पत्नी एका स्थानिक शाळेत काम करते. जेथे जुबैदादेखील त्यांच्या सोबत काम करतात. दिवाणचंद त्यांचे कुटूंबिय आणि वयोवृध्द आजी यावेळी मदतीची याचना करतात जेंव्हा खो-यात संकटाची स्थिती होती. आणि त्यांचे मित्र असलेल्या दंपतीने मदत घेऊन हजर झाले.

मागील पाच वर्षांपासून काश्मीरची स्थिती ठिक नाही. हिंसा आणि विरोध प्रदर्शनाच्या अनेक घटना घडत आहेत. बुरहान वाणी यांच्या मृत्य़ूनंतर तर स्थिती आणखी चिघळली आहे. या सा-या घटना घडूनही जुबेदा यांच्या निस्वार्थ सेवेच्या उदाहरणाने हेच सिध्द केले आहे की कशाप्रकारे माणूसकी आजही जिवंत आहे.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया