अफगाणिस्तानात युद्धग्रस्त क्षेत्रातल्या युवकांना सोशल मीडिया व इंटरनेटद्वारे जोडणारी ‘इलिन ग्युओ’

अफगाणिस्तानात युद्धग्रस्त क्षेत्रातल्या युवकांना सोशल मीडिया व इंटरनेटद्वारे जोडणारी ‘इलिन ग्युओ’

Tuesday December 08, 2015,

7 min Read

सोशल मिडियाला प्रभावित करण्यासाठी इंटरनेट हे एक प्रभावी माध्यम आहे , परंतु अमेरिकन उद्योजिका इलिन ग्युओ आपल्या स्टार्टअप इम्पॅशन (Impassion Media)मीडियाद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया चा वापर करीत आहे. एक डिजिटल मिडिया फर्मद्वारे संघर्षग्रस्त क्षेत्रात त्याचा वापर करून शांतता व लोकशाहीची स्थापना करण्याच्या प्रयत्नात एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यांनी सर्वात प्रथम सुरुवात अशांततेने होरपळलेल्या अफगानिस्थानापासून केली. जेथे ३० मिलियन इतक्या मोठ्या लोकसंख्येत ८५%पेक्षा जास्त मोबाईलधारक आहेत. इम्पॅशन अफगानिस्थानमधील पहिली डिजिटल संस्था आहे. याअंतर्गत त्यांनी व त्यांच्या टीमने अफगानातील पहिलीवहिली नागरी वार्तांकनाची वेबसाईट तयार केली. राजकीय दृष्ट्या उपयुक्त अशा योजनाही तयार केल्या. त्यांच्या या कामाने परिस्थिती सुधारण्याच्या तंत्रात चांगली प्रगती तर केलीच, शिवाय त्या अत्यंत अशांत अशा प्रांतात अनपेक्षितरीत्या काम करण्यात सफल झाल्या. इलिन म्हणतात की, " अफगानिस्तान येथे आल्याने मी व्यवसायात परिपक्व झाले. आपल्या या अनपेक्षित यशाने माझी 'सोशल मीडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' च्या 'ग्लोबल अजेंडा कौन्सिलवर निवड झाली. माझ्या या अनुभवाने सीमाभागात इंटरनेटच्या वापराच्या माध्यमातून गैरसमज दूर होण्याबरोबरच जगातील इतर इंटरनेट क्षेत्रातील दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहे".


image


त्यांनी विस्तृतपणे युअर स्टोरीशी बोलताना सांगितले की, अफगाण मधल्या एका प्रवासाच्या संधीने त्यांना त्यांच्या ध्येयाची जाणीव झाली व त्यांच्या स्टार्टअप मध्ये मिळालेल्या अपयशाची जागा यशाने घेतली. भारतात बाॅलीवुडमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या चित्रपटाच्या यशावर विशेष दर्जा दिला जातो आणि त्यांच्या नजरेत तीन प्रश्न आहेत जे एका व्यावसायिकाला नवा मार्ग दाखवतात.

आपले बालपण कसे गेले?

माझा जन्म चीनमध्ये झाला व वयाच्या चौथ्या वर्षी मी अमेरिकेत आली. माझे पालक व्यावसायिक असल्यामुळे त्यांचा सर्व वेळ व्यवसाय सांभाळण्यात जातो. त्यांचा व्यवसाय हा मला सावत्र भावाबहिणी प्रमाणे होता की ज्यामुळे मला सांपत्न वागणूक मिळत होती. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीही व्यवसाय करणार नाही अशी मनाशी खुणगाठ बांधत लहानाची मोठी झाली. माझा आनंद सामाजिक कार्य करण्यात होता.


image


व्यवसायात उतरण्याचा निर्णय कसा घेतला?

खरे तर मी संघर्ष व अस्थिरतेने होरपळलेल्या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक होती, परंतु रस्ता सुचत नव्हता. सन २००९ मध्ये कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात नशिबाने मला संशोधन सहाय्यक म्हणून अफगाणमध्ये जाण्याची संधी मिळाली. तेथे पाऊल ठेवल्यानंतर माझी गाठभेट अमेरिकन सैन्याशी झाली व मला त्यांच्या छत्रछायेत पूर्ण देश बघण्याची संधी मिळाली. मात्र तेथे माझा मोठा भ्रमनिरास झाला. सेना व त्यांच्या युद्धग्रस्त क्षेत्रात काम करण्याच्या अमेरिकेच्या परदेशनितीबाबत माझा अपेक्षाभंग झाला. माझे मत असे होते की यापेक्षा चांगल्या प्रकारे परिस्थितीत बदल घडवता येऊ शकतो व अनेक चांगले उपाय अजमावणे शक्य आहे.


image


आपल्या इम्पॅशनने अफगाणमध्ये पाय ठेवण्यापूर्वी तेथे मीडिया च्या क्षेत्रात डिजिटल टेक्नाॅलाॅजीची काय परिस्थिती होती?

सन २००९ मध्ये अशरफ गणी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत होते, त्यांनी त्यांच्या प्रचाराची सोशल मीडिया रणनीती आखण्यासाठी समर्थक पश्चिमी राष्ट्रांकडे मदत मागितली, ही एक मोठी विसंगती होती. कारण याला अपेक्षित महत्व मिळाले नाही, मी असे याच करिता म्हणते की, या आधी सोशल मीडियाचा प्रभाव अफगाणमध्ये फारच थोड्या प्रमाणात होता.


image


अफगाण मध्ये मोठ्या प्रमाणात विशेषता युवकवर्ग फेसबुक वापरतो. सन २००७ ते २००८ च्या मध्यापर्यंत देशात तंत्रज्ञान विकासाची योजना चालली होती. तोपर्यंत त्यांचा डिजिटलवर भर नव्हता. त्यावेळेस तेथे खूप साऱ्या दूरसंचार कंपन्या काम करीत होत्या. त्या होर्डिंग, लीफलेट, सर्वीस अनाऊन्समेंट व टीव्ही कार्यक्रमामध्ये व्यस्त होत्या. परंतु डिजिटल टेक्नोलॉजीकडे कोणाचेही लक्ष नव्हते. मी यावर खूप अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष काढला की आतापर्यंत अफगाण मध्ये सोशल मीडिया ने एका पायरी पर्यंत लक्ष्य काबीज केले आहे व नवीन पाऊल टाकण्याची हीच संधी आहे.


image


अफगाण च्या पहिल्या टेडएक्स काबुल च्या आयोजनात मदत करण्यासाठी मी पुन्हा एकदा येथे दाखल झाले. त्यावेळेस मी त्याच्यासाठी संचार व डिजिटल चा मसुदा आखण्यात मग्न होते. या कामासाठी मला येथे दोन महिने थांबावे लागणार होते व स्टार्टअप साठी डॉक्युमेंट्री सुद्धा तयार करीत होते . या दौऱ्यात माझा निर्माता बाजूला पडला व मी व्यावसायिकांबरोबर गाठीभेटी घेत पूर्ण देश फिरत होती. आता मला याची जाणीव झाली की, व्यावसायिकांबरोबर चर्चा करण्यात आनंद मिळतो आहे व मला डॉक्यूमेंटरी बनविण्यात अजिबात रस नाही. चर्चा करताना कॅमेरा अडथळा असतो असे मला वाटायचे . या प्रवासात पुढे जात असतांना मी माझ्या ध्येयाबद्दल परत विचार करायला लागले. केंद्रस्थानी व्यावसायिक उद्दिष्ट ठेऊन चित्रपट तयार करण्याच्या आवडीनिवडी विषयी माझ्या मनात कलह होता वा प्रत्यक्षात सामाजिक, आर्थिक स्तरावर याचा उपयोग करून घेण्याविषयी पर्याय निवडायचा होता. मी या देशात राहून व्यवसाय करण्याचा व त्याच्या माध्यमाद्वारे देशातील परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक अंग बनण्याचा निर्णय घेतला.


image


आपण इम्पॅशन शिवाय पैवंदगाह व अफगाण सोशल मीडिया च्या अन्य कार्यक्रमांसाठी आर्थिक व्यवस्था कशी केली?

आम्ही अफगाणच्या इम्पॅशनची सुरुवात करण्याअगोदर अपयश पचवण्याची तयारी ठेवली होती, हेच आमच्या यशाचे गुपित आहे. त्यामुळेच आम्ही बऱ्याच जोखीम पत्करल्या व खास करून आर्थिक नुकसानाची तयारी ठेवली. आम्ही काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात होतो. जरी आम्हाला अपयश आले असते तरी आम्हाला एक अनुभव मिळाला असता व या देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान दिल्याचा आनंद असता.


image


याच विचारांनी भरपूर पुढे जाण्याची संधी मिळाली की ज्यामुळे आम्ही आपले लक्ष गाठू शकलो. शेवटी आम्ही पहिल्या सोशल मीडिया चे संमेलन आयोजित करण्यासाठी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडे परवानगी मागितली व नशिबाने साथ दिली, परवानगी लगेच मिळाली.

अफगाणमध्ये पाय रोवल्यानंतर तेथील व्यावसायिक योजना हातात घेण्यात यश मिळाले?

आम्ही एका नामांकित डिजिटल संस्थेच्या रुपात चांगले नाव कमावले आहे. आम्ही अल जजिरासाठी जनमत सर्वेक्षण केले, त्यासाठी आम्ही ३४ पैकी ३२ प्रांतातून प्रतिक्रिया मिळवल्या. या एका चांगल्या योजनेमुळे अफगाण मधल्या सोशल मीडिया च्या ताकदीचा अंदाज आला. याशिवाय आम्ही फेसबूक वर युरोपियन युनियनची जाहिरात सुद्धा केली. आम्ही खाजगी क्षेत्रात अनेक उपभोक्त्यांसाठी स्पॉन्सरशीपचे आयोजन केले.


image


आपण इम्पॅशनच्या माध्यमातून अफगाण विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कुठल्या योजना राबवित आहात?

आमच्याकडे देशाचे पहिले व मोठे सिटीझन जर्नलिस्ट मंचच्या रुपात पैवंदगाह आहे. सध्या आमचे लक्ष त्याच्या विस्ताराकडे आहे. वास्तविक आम्ही काही महिन्यापूर्वीच सर्व ३४ प्रांतात नागरी वार्ताहर मिळवण्यात यशस्वी झालो.

आम्ही अफगाणीस्थानात इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रयत्नशील आहोत. सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, हे चित्र खूप आशादायी आहे. याचा अर्थ असा नाही की, आपले बरेचसे मित्र फेसबुक वापरतात तर अफगाणीस्थानातल्या जनतेच्या प्रगतीत हातभार लागला पाहिजे हा विचार वाढीस लागला पाहिजे.

इंटरनेटचा पाया अतिशय दुरावस्थेत असलेल्या देशात इंटरनेटची पाया भरणी करणे किती मुश्कील आहे?

आम्ही येथील इंटरनेट कनेक्शन व बॅकअप च्या सिस्टिमवर बरेच पैसे खर्च केले आहेत. या शिवाय आम्ही अफगाणच्या सोशल मिडीयाच्या पुढील योजनाविषयी आशादायी आहोत. आज मोबाईल फोन सोशल मिडीयाचा एक मोठा हिस्सा आहे. ब्लूटूथ हे त्यातील मिडियाचे एक खूपच प्रभावी साधन आहे. सोशल मीडियाची गोष्ट करताना अनेक लोकांच्या तोंडी फेसबुक, ट्वीटर सारख्या साईटचे नाव येते. हा जरी सोशल मिडीयाचा एक हिस्सा असला तरी तो बऱ्याच अंशी इंटरनेट वरच अवलंबून आहे.

आपण अशा एका देशात महिला नेतृत्व असणाऱ्या टीमचे काम करीत आहात की जो देश महिलांच्या प्रती असलेल्या वागण्याने बदनाम आहे. आजपर्यंतचा आपला अनुभव कसा आहे?

बऱ्याचदा अफगाण महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. मी एक महिला असण्याअगोदर अमेरिकन आहे. मी महिला सरकारी अधिकाऱ्या बरोबर रात्रीच्या पार्ट्यांना जात असे ज्यात पुरुषांना आमंत्रण नसते. याशिवाय मी अशा कार्यक्रमांना पण उपस्थित असते ज्यात अफगाण महिलांना स्थान नाही. आमच्या कार्यालयात बरेचदा महिला अधिकाऱ्यांच्या अधिकारांबाबत नाखूष असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद होतात. परंतु असे कर्मचारी लवकरच येथून काढता पाय घेतात.

जर भारतीय कर्मचारी व येथील स्थानिक भारतीय यांच्यात अतिशय सौदार्ह्यापूर्ण संबंध आहेत आणि ते फक्त असणाऱ्या बॉलीवूड प्रेमामुळेच. जेव्हा येथील स्थानीक लोकांचा भारतीयांबरोबर वाद होतात तेंव्हा ते स्वतःच बॉलीवूडची गाणी गुणगुणतात व सन्मान, संबधांचा पाया मजबूत होतो.

अफगाण इंटरनेट प्रेमी पिढीबाबत आपले मनोगत काय?

साधारणता अफगाण मध्ये राजकीय अस्थिरता व संघर्ष नजरेस पडतो, पण युवक बरेच आशावादी आहेत. येथील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उद्योग सुरु करणाऱ्याची संख्या जरी नगण्य असली तरी भविष्य आशादायी आहे. त्यांना खूप कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, पण त्यांचे जे काही मिळालेले यश आहे ते उत्साहवर्धक आहे.

युद्धग्रस्त क्षेत्रात आपल्या कामा प्रती योगदानाचा अनुभव कसा आहे?

सुरवातीस आम्ही प्रत्येक कामा साठी स्थानिक लोकांनाच प्राधान्य देत होतो. परंतु कालांतराने आमच्या लक्ष्यात आले की, ज्या कौशल्याची गरज आहे ते येते नाहीच. आम्ही स्टार्टअप साठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊ शकत नव्हतो, जे आता आम्हाला शक्य आहे. त्यासाठी आम्हाला बाहेर देशातील लोकांना नियुक्त करावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने ते अतिशय जोखमीचे काम होते.

आपल्या कामातून एक शिकवण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांना काय सल्ला द्याल?

स्टार्टअप च्या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या युवा उद्योजकांना मी एवढेच सांगेल की, स्टार्टअप संस्कृती ही एक चांगली गोष्ट आहे की येथे सर्वच मित्र असतात. असे असणे खूप महत्वाचे आहे. परंतु जीवनात सफल होण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. त्यासाठी प्रसंगी कठीण निर्णय घ्यावे लागतात. सुरवातीला मला वाटायचे की मी नेतृत्व विकासावर लक्ष देण्यात कमी पडते आहे. जेव्हा आपण एक व्यावसायिक असतो तेव्हा आपल्यात नेतृत्व गुण असतोच. जर आपण आपले नेतृत्व सिद्ध करू शकत नसाल व व्यवसाय वृद्धी होत नसेल तर आपल्या टीमचे मनोधैर्य खचेल.

याशिवाय मी सर्व व्यवसायिकांना आग्रह करते की त्यांनी आपल्या प्राथमिक गरजा अधोरेखित करून आपल्या ध्येयाला केंद्रित केले पाहिजे. माझ्या जीवनात हे तीन प्रश्न खूप महत्वपूर्ण आहेत.

लेखिकाः राखी चक्रवर्ती

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close