‘गुगल’चे माजी ‘युगल’, एक कॉलेज ड्रॉपआउट मिळून जुळवताहेत धागे रेशमाचे!

‘गुगल’चे माजी ‘युगल’, एक कॉलेज ड्रॉपआउट मिळून जुळवताहेत धागे रेशमाचे!

Monday January 04, 2016,

4 min Read

रजत राव… कॉलेज मधूनच सोडणारा Purdue University चा विद्यार्थी… हा एक कॉलेज ड्रॉपआउट आणि गुगलला राम राम ठोकलेले दोन माजी कर्मचारी… म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर हे तिघे काही कुणाच्या लेखी चमकती-दमकती शस्त्रे धारण केलेले योद्धे असू शकत नाहीत. गेल्या व्हॅलेंटाइन डेला तसे काही कुणी मानण्याचे कारणही नव्हते. पण त्यांचे डेटिंग ॲप ‘क्रुश’ Krush मात्र धमाल ठरले. म्हणजे ते अक्षरश: कामदेवासारखे आगळे ठरले आणि किती म्हणाल तर वारेमापही ठरले!

अर्थात व्हॅलेंटाइन डेचा शुक्रवार रंजक करून देण्यात तसेच कुणाची तरी कंपनी तुम्हाला मिळवून देण्यात हातभार लावणारे, मदत करणारे अशा स्वरूपाचे ॲअॅप्स आणि स्टार्टअप कमी नव्हते. ‘क्रुश’ने मात्र लोकांना सुरक्षित अनुभव दिला. एकतर पर्याय मोजकेच उपलब्ध करून दिलेले. त्यात तुमच्याच अस्तित्वात असलेल्या फेसबुक नेटवर्कद्वारे ते उपलब्ध करून दिलेले होते.

image


रजत यांनी ॲअॅपची पार्श्वभूमी आणि हे नेमके आपल्या ग्राहकांना काय सेवा देते त्यासंदर्भात भरभरून सांगितले. रजत लहानपणापासूनच उद्यमी आहेत. बारा वर्षांचे असताना त्यांनी आपल्या एका मित्रासह पहिला व्यवसाय सुरू केला होता. पाळीव मासे विकण्याचा! दोन वर्षांतच त्याने मस्त कमाई केली होती, पण शिक्षकांनी विरोध केल्याने हा व्यवसाय त्याला बंद करावा लागला. १५ व्या वर्षी संगीत कलावंतांचा एक चमू त्याने उभा केला. पदवी संपादन करण्यासाठी Purdue University मध्ये प्रवेश ही त्याची पुढली खेळी होती. ॲमेझानमध्ये काम करून चुकलेल्या दोघांसह एक नवा व्यावसायिक उपक्रम करण्याच्या उद्देशाने त्याने कॉलेज सोडले. संगीत कंपन्यांशी डिलिंग करणे असे त्याच्या जबाबदारीचे स्वरूप होते. नंतर स्टार्टअपचा किडा चावला आणि ‘क्रुश’चा जन्म झाला.

रजत सांगतात, ‘‘शाळा, महाविद्यालयातून मी वाढलोय म्हणून मला माहिती आहे, की एखाद्या मुलीचे प्रियराधन करणे, ही किती अवघड प्रक्रिया आहे. फेसबुक API च्या संपर्कात आलो तसे ही प्रक्रिया जरा सोपी साधी केली जाऊ शकते, हे आमच्या लक्षात आले. आम्ही आणखी थोडे या दिशेने पुढे सरकलो आणि ‘क्रुश’ प्रत्यक्षात आणले.’’

जोड्या बनवणे, जसे पिझ्झा निवडणे

रजत यांच्या सोबतचे दोघे सहसंस्थापक हे गुगलमधून आलेले. माउंटन व्ह्यू कार्यालयातल्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव. पैकी एक अँड्रॉइड टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारीवर होता, तर दुसरा यू ट्यूब टीमचा सदस्य होता. पुढे या दोघांनी कलर सॉफ्टवेअरमध्येही काम केले. पुढे ॲअॅपलने २००६ मध्ये ही कंपनी अधिग्रहित केली.

आपल्या नव्या उपक्रमाबद्दलच्या योजना मांडताना रजत म्हणतात, ‘‘पिझ्झाची अंतिम सजावट निवडण्याइतके आम्हाला ‘क्रुश’च्या माध्यमातून जोड्या जमवणे सोपे करायचे आहे. एखाद्याला उत्तम विनोद बुद्धी असलेला जोडीदार हवा असेल, एखाद्याला शुद्ध शाकाहारी जोडीदार हवा असेल, संगीतप्रेमी हवा असेल तर ‘क्रुश’चा वापर करून त्याला त्याचे गंतव्यस्थळ प्राप्त होऊ शकेल.’’

फेसबुक हेच द्वारपाल!

‘क्रुश’ फेसबुकचे साइन अप वापरते. जेणेकरून स्पॅमिंग रोखता यावे. कमीत कमी एक मित्र इथे आधीच असलेल्या लोकांनाच हा ॲअॅप वापरण्याची परवानगी असते. तुमचे मित्र आणि मित्रांचे मित्र यांतूनच तुम्हाला संभाव्य जोडीदार उपलब्ध होऊ शकतो. एकदा तुम्ही साइनअप केले, की तुम्हाला सायंकाळी ७ वाजता अपेक्षित मित्रांचा दैनंदिन गट उपलब्ध होतो. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यातून निवड करू शकता. समोरची व्यक्ती ठरवेल, संमती देईल तरच तुम्ही तिची प्रोफाईल मिळवू शकता. पहिल्या पाच जोड्या कुठल्याही मोबदल्याशिवाय जुळवल्या जातील, पण पुढल्यांसाठी २ डॉलर मोजावे लागतील.

जोड्या जुळवण्याची ही सशर्त निनावी पद्धती असली तरी क्रुश हे Tinder वा Thrill app सारखे आहे. ते तुम्ही कुठले वगैरे यावर आधारित माहिती पुरवत नाही. ऐवजी तुमच्या नेटवर्कमधील लोक कोण, त्याबद्दल माहिती ते पुरवते.

गोपनिय वैशिष्ट्य

क्रुशचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला रस असलेल्या लोकांना गोपनिय पद्धतीने लाइक करण्याची सुविधा तुम्हाला या ॲअॅपवरून उपलब्ध होते. म्हणजे तुम्ही त्यांना लाइक केलेले आहे, हे त्यांना तत्काळ कळत नाही. तुम्हाला लाइक करणारे लोक कोण आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायचे तर तुम्हाला तीन मित्रांना ‘इन्व्हाइट’ करावे लागते. नंतर तुम्हाला पसंत करणाऱ्यांच्या नावाबाबत एक क्ल्यू दिला जाईल. या वैशिष्ट्यपूर्ण ट्रिकमुळे ॲअॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सुरवातीच्याच दिवसांत ८ हजारांवर जाऊन पोहोचली.

उत्पन्नाच्या संधी

जोड्या जुळवण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त ‘क्रुश’ उत्पन्नाची आणखी काही संलग्न साधने शोधण्याच्या तयारीत आहे. पैकी एक योजना आहे एखाद्या कॉफी हाउसशी टायअप करणे, जेणेकरून जुळलेल्या जोडीला, जुळू शकणाऱ्या जोडीला इथे कॉफीवर गप्पाटप्पाही करता येतील आणि ‘क्रुश’लाही त्याचा लाभ होईल. संभाव्य जोड्यांचे पर्याय उपलब्ध करून देत असतानाच तुमच्या प्रोफाइलवर जोर देणारा प्रिमियम पर्यायही उत्पन्नाचे एक साधन ठरू शकतो. तूर्त रजत यांचा भर मात्र युजर्सची संख्या वाढवण्यावर आहे. उत्पन्नांच्या संधींबाबत नंतर पाहिले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

याच्यासारखे हेच..

रजत म्हणतात, ‘‘सध्याचे प्रमाण पुरुष आणि महिला या क्रमाने जाता ते ३ : २ असे आहे. तिनास दोन! म्हणजे व्यस्त असेच असले तरी इतर उपक्रमांच्या तुलनेत ते आश्वस्त करणारे आहे. वैयक्तिक गोपनियता जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. किंबहुना आम्ही याबाबत खात्री देतो. युजरने मान्यता दिल्याशिवाय कुणीही त्याला मजकूर पाठवू शकत नाही. सबब ‘भरलेला इनबॉक्स’ ही समस्या उद्भवण्याचा इथे प्रश्नच उरत नाही. ‘निनावीपणाची हमी’ अधिकाधिक मुलींना हा प्लेटफॉर्म वापरण्यास प्रोत्साहन देते. आपल्या प्रोफाइलच्या सुरक्षिततेबद्दल त्या निर्धास्त असतात. फेसबुकवरील मित्रांना किंवा या मित्रांच्या मित्रांना त्यांच्या प्रोफाइलबद्दल सुचवण्याच्या प्लेटफॉर्मच्या पद्धतीबद्दलही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या आश्वस्त असतात. हजारो आनंदी जोडप्यांमागचा आश्वस्त हात असलेले रजत यांच्या दृष्टीने प्रेम हे दुसरे-तिसरे काही नसून एक कार्य आहे. रजतला स्वत:ला मात्र कार्यबाहुल्यामुळे डेटिंगवगैरे गोष्टींसाठी सवड काढणे अवघडच! क्रुशच्या माध्यमातून मात्र आता त्याला स्वत:लाही तिन संभाव्य जोडीदार मिळालेले आहेत आणि त्यांच्यापैकी कुणासोबत तरी त्याने व्हॅलेंटाइन डे साजरा केला असणार अशी अपेक्षा बाळगायला आपल्याला हरकत नसावी.

तुम्ही काय आता पुढल्या व्हॅलेंटाइनची वाट बघताय? तुमच्या प्रतिक्षेला आपला हा मित्र पूर्णविराम देऊ शकतो. आता या क्षणी तुमच्या अँड्रॉइड/आयओएस डिव्हाइसवरल्या क्रुश ॲअॅपच्या माध्यमातून…

Krush app on your Android/iOs device.

लेखक : अलोक सोनी

अनुवाद : चंद्रकांत यादव