सा-यांच्या फॅशन, आवडी निवडींचा विचार करणारे ‘ऑरेंजपिक’ 

0

ओम्नी चॅनेल हा तीन वर्षापासून सगळीकडे परवलीचा शब्द झाला आहे. हे वेगळे काही नसून ब्रिक आणि मॉर्टर रिटेलर आहे, ज्याने भौतिक जगाला डिजीटलशी जोडले आहे. आदित्य बिर्ला यांच्या सारख्या रिटेल मधील महत्वाच्या व्यक्तीने, शॉपर्स स्टॉप, आणि अरविंद रिटेल मध्ये गुंतवणूक करून ते सुरू केले, त्यांनीच ओमी चॅनेलचा पाया रचला. भारतातील ८ अब्ज किरकोळ खरेदीदारांना डिजीटलच्या माध्यमातून येथे काहीही  खरेदी करता येते. असे असले तरी वूपलर सारख्या स्टार्टअपने ग्राहकांना त्यांच्या फॅशनचे कपडे दुकानात न जाता घरपोच मिळवून दिले आहेत.

सिसको आणि शॉपर्स स्टॉप यांनी या डिजीटलच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे, ज्यात खरेदी ऑनलाइन स्टोर मधून केली जाते. अशाच प्रकारे या दिल्लीच्या मुळच्या स्टार्टअपने फॅशनच्या जगात वेगवेगळ्या पध्दतीने वैविध्यपूर्ण मंच निर्माण केला आहे.

ऑरेंजपिक हा ओम्नी चॅनेल आणि क्राऊडसोर्स फॅशन यांनी शोधलेला अॅप आहे, ज्याचा हेतू सर्च आणि सजेशन इंजिन मार्फत फॅशनची माहिती देणे हा आहे. त्याचा हेतू लोकांना नविन फॅशनची माहिती देणे हा आहे.  ऑनलाईन तसेच ऑफलाईन असे दोन पर्याय त्यात आहेत. 


ऑरेंजपिक टीम
ऑरेंजपिक टीम

“ हा अॅप शोधून काढतो की, ऑनलाईन किंवा ऑफलाईनवर लोकांना वैविध्यपूर्ण प्रकारे कोणत्या वस्तू हव्या आहेत.” पियुष मल्होत्रा यांनी सांगितले, जे ‘ऑरेंजपिक’ चे सह संस्थापक आहेत. ते पुढे म्हणाले की, जर ग्राहकांना स्वत:ला शक्य झाले नाही तर त्यांनी स्टाईल सर्च पोस्ट केल्यास अॅपवरून त्यांना हल्ली सुरू असलेल्या फॅशनची माहिती मिळते.

सुरूवात

ऑरेंजपिकची सुरूवात चार अभियंता तरुणांनी केली, पियुश मल्होत्रा, अर्पित शर्मा, आनंद कुमार, आणि सौम्या शर्मा. हे संस्थापक २०१२मध्ये बिझनेस स्कूल मध्ये भेटले होते, आणि नेहमी अर्पित यांच्या हॅण्डबॅग संबंधी व्यवसायावर त्यांची चर्चा होत असे. त्यांना नेहमी गंमत वाटे की, ग्राहक कसे त्यांच्या किरकोळ विक्री व्यवसायिकाकडे येत असावेत त्यापेक्षा त्यांनी यावर काही डिजीटल समाधान मिळते का याचा विचार सुरू केला. यातूनच मग २०१६ मध्ये ऑरेंजपिकचा शोध लागला आणि फेब्रूवारी २०१७मध्ये ते अवतरले.

ऑरेंजपिक तुम्हाला वस्तू न वस्तू मधील फॅशन सांगते, जेथे वापर करणारे फॅशन स्टाईलच्या टिप्स सांगतात आणि या मंचावरून त्या पूर्ण केल्या जातात. अन्य प्रकारच्या व्यवधानात इंस्टाग्राम मार्फतही मोठ्या प्रमाणात माहिती घेता येते, याशिवाय नव्या प्रकारचे लूक्स तयार करून त्यांची मागणी नोंदविता येते, शिवाय यात वेगवेगळ्या ब्रँण्डचे पर्याय देखील देण्यात आले आहेत.

व्यूहरचना

फॅशनच्या ब्रॅण्डसाठी, या मंचावरून रेडीमेड मोबाईल ओम्नी चॅनेलव्दारे परवडेल अशा ऑनलाईन  खरेदीचा आनंद घेता येतो. ऑरेंजपिक चा हेतू हा आहे की, सारख्याच ब्रॅण्डच्या वस्तू त्यांच्या वापरकर्ताना एकीकृत पध्दतीने उपलब्ध करून देणे. “ कंपनी खाजगी स्वरुपातील मागणीला देखील ब्राण्डच्या वतीने स्विकारते, जी व्यक्तीश: ब्रोशरिंगच्या माध्यमातून नोंदवली जाते,” असे पियूष म्हणाले. ऑरेंजपिकचा हेतू एकाच ठिकाणी सारे काही देण्याचा आहे, जे एकाच अॅपच्या माध्यमातून सा-या काही फॅशनचे पर्याय धुंडाळु शकतात.

यात पैसा कसा मिळतो

अॅन्ड्रॉइड वरील २०हजार युजर्सच्या सहकार्याने या मंचाने आता महसूल मिळवण्यास सुरूवात केली आहे. युजरची संख्या प्रति महिना११० टक्के वाढते आहे, फेब्रूवारीत सुरूवात झाल्यापासून हे झाले आहे कारण ग्राहकांना जास्तीचा परतावा मिळतो. प्रत्येकवेळी जेंव्हा ते ऑरेजपिकवरून खरेदी करतात ऑनलाइन अॅपवरून त्यांना कॅशबॅक मिळते.

ऑरेंजपिकचा दावा आहे की त्यानी १५ ऑनलाईन ऍफिलियेशन आणि दिल्ली एनसीआर मधील ११० स्टोर सोबत हातमिळवणी केली आहे, त्यांच्या मते अॅपला चारशे विचारणा चार महिन्यात आल्या.

या व्यवसायाच्या पध्दतीमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने महसूल जमा होतो, फ्रिमियम सबस्क्रिप्शन वर आधारित सेवा आणि ब्रॅण्डेड वस्तू ज्या हव्या त्या फॅशन आणि पध्दतीच्या उपलब्ध होतात. “स्थानिक पध्दतीने देखील हे नियंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” पियुष म्हणाले.

भविष्याची वाटचाल

ऑरेंजपिकची नुकतीच सुरुवात झाली आहे, आणि सध्या विस्तारासाठी त्यांची विविध गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे. या चमूने आयओएस संवर्गात येण्याचे ठरविले आहे, तांत्रिक दृष्ट्या हे उत्पादन ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणारे असावे असाही प्रयत्न आहे. उद्देश हा आहे की ग्राहकांना ओम्नी चॅनेल फॅशनच्याच वस्तू शोधून घेता याव्यात ज्यात वेगवेगळ्या ब्रॅण्डमधून ते निवड करू शकतील. ज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन मधील दरी कमी केली जाईल.

या तिशीच्या आतील चार संस्थापकानी पन्नास लाख रूपयांची गुंतवणूक या व्यवसायात केली आहे. त्यांचा विश्वास आहे की जे मुल्य त्यांनी लावले आहे ते ब्रान्ड आणि स्टोअर्सच्या माध्यमातून वसूल होईल. मात्र यावर आताच भाष्य करण कठीण आहे कारण अजून (संत्रे) ऑरेंज पिकायचे आहे!