मुंबईत या माता-पूत्र जोडीने ‘बोहरी किचन’च्या माध्यमातून कसा बदलला ‘घर का खाना’चा अर्थ!

0

मुनाफ कापाडिया आणि त्यांच्या मातोश्री नफिसा कापाडिया नोव्हेंबर २०१४च्या एका शनिवारी घरात भोजन करत होते. केवळ आई आणि मुलाने उत्तम बोहरी पध्दतीचे भोजन घेण्याऐवजी त्यांच्या सोबत आज सहा अनोळखी व्यक्ती देखील सहभागी झाल्या होत्या. पैसे घेऊन लोकांना बोहरी भोजनाचा आनंद घेण्यासाठी पाचारण करण्याची संकल्पना यशस्वी झाली होती, मुंबईतील असा भोजनाचा स्वाद जन्मला होता जो मुनाफ आणि नसिफा यांच्या घरी. आज मुंबईत बोहरी किचन हा केवऴ घरगुती भोजनाचा प्रकारच राहिला नाही तर त्यांचा स्वत:चा भटारखाना आहे आणि तुम्हाला घरगुती भोजन घरपोचही दिले जाते.

अनेकांसाठी बोहरी भोजन हा वेगळा आनंद आहे, शक्यतो मित्रांच्या घरी किंवा विवाहप्रसंगात. मुनाफ यांच्यासाठी चमचमीत खिमा समोसा, भाजलेल्या मासाचे तुकडे, आणि चवदार चिकन अंगारी हे नेहमीचे पदार्थ आहेत. मुनाफ यांनी त्यांचा हा उद्योग पन्नास मित्रांना मेल पाठवून सुरू केला. आपली आई नसिफा यांच्या पाककलेबाबत कौतुक करत त्यांनी शनिवारी दुपारी हा जेवणाचा बेत केला.

आवडता उद्योग

त्यानंतर मुनाफ आणि नसिफा यांना मागे वळून बघायला फुरसत राहिली नाही. “ लोकांना जर विचारले की तुम्हाला पूर्णत: पैसे घेऊन भोजन दिले तर येण्यास कसे वाटेल, उत्तर असेल भोजनावळ उघडा. आणि माझे तसेच झाले. मी माझ्या गुगलमधील नोकरीत समाधानी होतो.”, मुनाफ सांगतात. मुनाफ पुढे सांगतात की, सुरुवातीला टिबीके सुरू करताना तो फन कॅफे असेल अशी संकल्पना माझ्या आईची होती. पण तीन दिवस अभ्यास केल्यावर ते कसे सुरू करायचे आणि चालवायचे याबाबत वास्तव पाहणी केली.


मुनाफ आणि नफिसा कपाडिया ( फोटो सौजन्य हिंदुस्तान टाईम्स)
मुनाफ आणि नफिसा कपाडिया ( फोटो सौजन्य हिंदुस्तान टाईम्स)

त्यावेळी तेथे बाजारात बोहरीपध्दतीचे भोजन नसल्याने पोकळी असल्याचे लक्षात आले. उपहारगृह सुरू करण्याची संकल्पना रुचत नव्हती कारण तेवढा आर्थिक भार सहन होत नव्हता किंवा भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमताही नव्हती. “ मला कल्पना सुचली, पण विचार केला गंमत म्हणून का नाही, उद्योग म्हणून नाही, लोकांना बोलावून बोहरी पध्दतीचे भोजन खायला सांगू”. मुनाफ म्हणाले.

नसिफा यांच्याशी याबाबत चर्चा झाली, आई-मुलगा यांच्या जोडीने नेहमीच्या भोजनातील मेन्यू ठेवला. मुनाफ सांगतात की, साधारण शनिवारच्या चांगल्या घरच्या भोजनात जे असतात ते पदार्थ केवळ सातशे रुपयांत द्यायचे ठरविले. पहिल्याच दिवशीचा भोजन देण्याचा आनंद आगळा होता असे नसिफा यांच्या लक्षात आले. “ मला छान वाटले जेंव्हा भोजनास आलेल्या सोनाली यांनी मला आलिंगन दिले आणि भोजनासाठी धन्यवाद दिले. हे सारे माझ्या घरच्या वातावरणात होते.” नसिफा सांगतात. नंतर त्यांनी दोन आठवड्यातून एकदा लोकांना बोलावण्यास सुरुवात केली. लोक मुनाफ यांच्या घरी येत होते आणि नफिसा यांच्या हातच्या रुचकर भोजनाचा स्वाद घेत होते.

अन्नावरील प्रेमासाठीच

कपाडिया कुटूंबियाना लोकांना भोजन द्यायला आवडते. “ माझ्या वडिलांना शेजा-यांना जेवायला नेण्यास आवडायचे. त्यांच्या सोबत काम करणा-या लोकांना रोज घरचे जेवण मिळावे असे त्यांना वाटे, त्यामुळे ते नेहमी जास्तीचे जेवण नेत.” मुनाफ सांगतात. जेंव्हा त्यांनी टिबीके सुरू केले नफिसा यांना हीच संकल्पाना आवडली. पण मुनाफ यांच्या वडिलांना लोकांकडून पैसे घ्यायचे हे मात्र आवडले नाही. पण काही काळ गेल्यानंतर मात्र त्यांना ही संकल्पना योग्य असल्याचे जाणवले. त्यावेळी बाजारासाठी मुनाफ यांनी केवळ ई-मेलचा वापर केला. आठ जणांना शुक्रवारी सायंकाळपर्यत निश्चित केले जात होते. पण नंतर हे आठ माणसांना घरच्या भोजनासाठी शुल्क लावणे कठीण वाटू लागले. त्यावेळी संपर्कासाठी केवळ ई-मेल हेच माध्यम होते.

त्यानंतर आई-मुलाच्या जोडीने फेसबुक पेज सुरू केले. त्यानंतर त्यांनी बोधचिन्ह विकसित करून अरेबिक पध्दतीच्या लिखावटीत तो झळकवला. आणि त्यांना एका रात्रीत २५० लाईक मिळाल्या. हे लोकांना खुले करत असतानाच मुनाफ यांनी ज्याला ते ‘सिरियल किलर नाही’ धोरण म्हणतात ते सुरू केले.

याचा अर्थ असा की, कुणी एखादा टिबीकेमध्ये येतो, तेंव्हा ते कोण आहेत यांची खातरजमा करावी लागते. जागा नसते त्यासाठी त्यांना विनंती करावी लागते. “ हे सगळे पाहणारा जर कुणी माणूस असेल तर अनेकदा मीच असतो,” गुरमित कोच्चर विनोद करतात, मुनाफचे मित्र आणि आता बोहरी किचनचे भागीदारही. हे दोघे एनएच७ च्या विकएण्डच्या प्रसंगी भेटले तेंव्हापासून एकत्र काम करत आहेत सामान्य मैत्रीतून. गुरुमित यांच्याशी भागिदारी केल्यावर टिबीकेने घरपोच सेवा आणि अन्नप्रक्रिया देण्याचा देखील विचार सुरू केला. ईमेल नंतर मुनाफ यांनी फेसबुकवरून टिबीकेसाठी इवेंट सुरू केले.जे लोक त्यासाठी नोंदणी करत होते त्यांना वेळोवेळी सुचित केले जात होते. आता प्रत्येक आठवड्यात हा भोजनाचा आनंद देण्यास सुरुवात झाली होती. ही ती वेळ होती जेंव्हा टिबीकेवर ‘दि ब्राऊन पेपर बँग’ यांना अंक काढावासा वाटला. त्यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये टिबीकेचे कौतुकच केले हे सांगायला नकोच.

त्याचवेळी कुणीतरी मुनाफ यांना विचारणा केली, की बोहरी किचन बद्दल त्यांचे धोरण काय आहे, मुनाफ म्हणाले, “ एक दिवस शाहरूख खान यांनी उठावे आणि खास बोहरी पध्दतीचे भोजन घेण्याची इच्छा व्यक्त करावी आणि सरळ दी बोहरी किचनमध्ये यावे. अश्या प्रकारचा आमचा दृष्टीकोन आहे.” मुनाफ सांगतात.

सा-या जिन्नसांची आई

लवकरच लोकांनी दी बोहरी किचनबाबत बोलण्यास आणि लिहिण्यास सुरूवात केली. आणि सातशेवरून शुल्क हजार पर्यंत गेले तरीही त्यांना चांगला प्रतिसाद होता. आता त्यांच्यासाठी ही शोधाशोध करण्याची वेळ आली की टिबीके नवीन काय करणार?

“ माझी आई आणि मला काहीतरी नवीन  करायचे होते.” मुनाफ म्हणाले. संग्राहक असलेल्या ट्रेक्युरिअस यांनी शहरभरात अनुभव घेतल्यानंतर एकदा दी बोहरी किचनला भेट दिली आणि मुनाफ यांना टिबीकेला संकेतस्थळावर येण्याबाबत विचारणा केली. सुरुवातीला नकार दिला, मुनाफ यांना त्यांचा अनुभव दुसरीकडे द्यायचा नव्हता. त्यांना पाया मजबूत करायचा होता आणि ब्रँण्ड म्हणून स्वत:च बाजारात नवीन संकेतस्थळ सुरू करायचे होते. पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुनाफ यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत ते अनुभव घेऊ शकतात जो फारच वेगळा आणि अनोखा होता. त्यानंतर त्यांनी ‘दी मदर ऑफ ऑल फेस्ट’ मागील वर्षी सुरू केले.

ज्यावेळी साधारण टिबीके सप्तवर्गातील भोजन होते. मदर ऑफ ऑल फिस्टमुळे ते नवव्या वर्गातील भोजन झाले. या दरम्यानच्या काळात, नफिसा याच अन्न शिजवायच्या. “ आम्ही याच संख्येत स्वयंपाक करत होतो. आता ती संख्या वाढली. जास्त लोकांना भोजनस्वाद देताना मलाही आनंद जास्त होतो.” नफिसा सांगतात.

अन्नप्रक्रियेच्या जगात प्रवेश करताना

बोहरीभोजन हा स्वादानुभव आहे, कलेजी, भेजाफ्राय हा इतरांपेक्षा वेगळा अनुभव आहे. दी मदर ऑफ ऑल फिस्टचे मेन्यू कार्डही रुचकर पदार्थानी परिपूर्ण, भरगच्च आणि श्रीमंत आहे. नऊ वर्गीय भोजनाला २५०० रुपये आकारले जातात.आज सुटीच्या दिवशी साधारण टिबीके भोजनाला १५००  रुपये लागतात जे दोन आठवडे आधीच विकले जाते.

घरगुती भोजनाचा अनोखा आनंद

घरगुती भोजनाच्या आनंदाचा चांगला अनुभव घेताना, मुनाफ यांनी कधीच या कामाला संख्यात्मक पध्दतीने वाढविण्याचा विचार केला नाही. घरपोच सेवेचा प्रयोग व्यावहारीक नव्हता कारण नफिसा या एकमेव स्वयंपाकी होत्या. लोकप्रियतेसह घरगुती भोजनाच्या सेवेतून दी बोहरी किचनला महिना ८०हजाराची कमाई होते. यामुळे मुनाफ यांना विचार करावा लागतो आणि ब्रॅण्ड त्यांच्यासाठी जास्त किमती ठरतो. केवळ आठ महिन्यापूर्वीच त्यांनी पूर्णवेळ हेच काम करण्यासाठी गुगल मधील आपली नोकरी सोडली आहे.

हे दिसते तेवढे सोपे नाहीच

“ एकेकाळी माझ्यासाठी ही गोष्ट कठीण होती. ज्यावेळी पहिल्यांदा मी या क्षेत्रात आलो, मला माहिती नव्हते किचन कसे तयार करावे. मागणी, तंत्रज्ञान, साधनसामुग्री आणि इतर सारे”, मुनाफ म्हणाले. त्यावेळी त्यांनी एनएच विकऐंडरला जाण्याचे ठरविले. मुनाफ याला टिबीकेसाठी मोठा आव्हानाचा काळ मानतात. पहिल्यांदाच ते अन्य शहरात भोजन देत होते. गुरुमित यांची भेट झाल्यावर, सारे काही बदल झाले. स्पाइसबॉक्स सुरू केल्याचा गुरुमित यांना अनुभव होता त्यांना त्यातील आव्हाने परिचित होती. आणि ऑनलाइन किचन पध्दतीच्या गरजांची माहिती होती.

एनएच७च्या अनुभवानंतर गुरूमित पुढे गेले आणि घरगुती भोजनाचा अस्वाद घेतला. आणि लोअर-परळ येथील मँकडोनाल्ट मध्ये बसून त्यांनी या वर्षीच्या मार्च महिन्यात पुढील आराखडे तयार केले, त्यात प्रक्रिया पध्दती, किचनची व्यवस्था, पँकिंग, घरपोच सेवेचा प्रकार आदीचा विचार केला होता.

नव्या पध्दतीचे एकमेव

पण मोठ्या प्रमाणात हे सारे समजण्यास आणि स्वयंपाक करण्यास नफिसा यांना अवघड जात होते.  प्रत्येक बारीकसारीक बाबी, प्रमाण योग्य असायला हवे असा त्यांचा कटाक्ष होता. त्याचवेळी सारे वेळेत हवे होते. पहिले किचन त्यांनी वरळीत सुरू केले. गुरुमितच्या मदतीने त्यांनी निष्णात शेफ मदतनीसांची आणि पँकिंग करणा-यांची मदत घेतली. अशा प्रकारे त्यांच्या चमूला झोमॅटोवर प्रतिकूल प्रतिक्रिया आली, मुनाफ यांनी किचन बंद केले अणि पुन्हा आपल्या संकल्पनेवर काम सुरू केले जेणेकरून टिबीकेला आणखी धक्का लागणार नाही. पुनरागमन आता आठ आठवड्यापूर्वी झाले आणि प्रतिसादही चांगला आहे.

मालाड येथील इनऑर्बीट मॉलमध्ये नफिसा यांनी उद्योजकता स्पर्धा जिंकली आहे. त्यातून त्यांना मॉलमध्ये नऊ महिन्यांसाठी स्टॉल मिळाला आहे. आता त्यांच्या मुंबईभर विस्तार करण्यचा विचार आहे. त्यासाठी टिबीके गुंतवणूकदारांच्या शोधात आहे आणि या वर्षीच्या अखेरपर्यंत बाहेरील बाजारात उतरणार आहे.

अनेक अहवाल असे सांगतात की अन्नप्रक्रिया  उद्योगाची वाढ दरवर्षी चाळीस टक्के होत आहे आणि या वर्षीच्या अखेरपर्यंत दहा हजार दशलक्ष डॉलरचा टप्पा पूर्ण करेल. दुसरीकडे किरकोळ अन्नपदार्थ विक्रीमध्ये तीनशे दशलक्ष डॉलरची गुंतवणूक असून त्यात भारतीय उपहारगृहांच्या उद्योगाचा पन्नास दशलक्ष डॉलरचा हिस्सा आहे. अशाप्रकारे घरगुती भोजनाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस विस्तार होत आहे. विशेषत: युरोपात त्याला मोठी मागणी आहे. तेथे ‘इटविथ’ सारखे मोठे खेळाडू आहेत त्यांनी युरोप आणि ऑस्ट्रेलिया पादाक्रांत केले आहे. ही संकल्पना आता भारतात हळुहळू रुजत आहे. तेथे पुण्यातील भोजन ‘टँगो’ आहे. मिलबोट म्हणून सुरू झाले आहे, ज्यात घरच्या भोजनाचा स्वाद आहे. पण आता प्रत्यक्ष घरी जाऊन जेवणाचा अनुभव देणेही सुरू झाले आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

भारताची खाद्यसंस्कृती एका क्लिकवर उपलब्ध करुन देणारे 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'

जोधाने अकबरासाठी तयार केलेल्या मेजवानीची खरी सूत्रधार : फूड स्टायलिश शुभांगी धैमाडे

स्नॅकीबलः एक पाऊल निरोगी जगण्याच्या दिशेने

लेखिका : सिंधू कश्यप
अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील