नोएडातील हे स्टार्टअप सिगारेटची थोटके जमा करते, आणि त्यासाठी तुम्हाला पैसे देखील देते!

0

एक सिगरेट आजूबाजूच्या वातारवरणाला देखील हानीकारक असते तर तीच्या माध्यमातून धूम्रपान करणाऱ्यांना  देखील ती नुकसान कारकच असते. तरीही जगात मोठ्या प्रमाणात सिगरेट विकल्या जातात.  यात काही आश्चर्य नाही की यातून तयार होणारा कचरा देखील लक्षणीय असतो. सिगरेटची थोटके, सिगरेट पिऊन झाल्यावर उरणारी ही सुध्दा वातावरणाला तितकीच हानीकारक असतात, आणि काही टन प्रमाणात ती रोज तयार होतात त्यातून जगात एक हानीकारक पदार्थ रोज निर्माण होतो. सिंथेटीक पॉलिमर ज्याला सिगरेट एस्टेट म्हटले जाते त्यापासून ही बनविली जातात आणि त्यांचे विघटन होण्यास १८ महिने ते दहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. सेल्यूलोज एस्टेट हे न विरघळणारे प्लास्टिक असते जे पर्यावरणासाठी हानीकारक असते.


विशाल कांत आणि नमन गुप्ता यांना भेटा, हे दोघे तरूण गुरगांवचे आहेत, त्यांनी ‘कोड’ नावाचे स्टार्टअप सुरु केले आहे. जे सर्व प्रकारच्या सिगरेटच्या वाया जाणा-या कच-याचा फेरवापर करतात. या दोघांना ही कल्पना एका मेजवानीला उपस्थित राहताना सुचली, जेथे त्यांना खूप  सिगरेटची थोटके पडलेली दिसली. इतका मोठा कचरा पाहून त्यांना धक्काच बसला, त्यांच्यासाठी बदलाचा क्षण होता त्यावेळेपर्यंत ते दोघे एकत्र येवून काहीतरी करण्याच्या विचारात होतेच. याबाबत सांगताना ते दोघे म्हणाले, “ तो पूर्णत: अविवाहितांचा अड्डा होता जेथे ही पार्टी होती, खुप जण तेथे विरंगुळ्यासाठी जमले होते त्यामुळे सगळीकडे सिगरेटची थोटके पडली होती. आम्हाला कल्पना सूचली की जर यांना फेरवापरात आणू शकलो तर आणि यापासून काही तयार करू शकलो तर त्यातून मोठ्या प्रमाणात कच-याचा फेरवापर करता येवून पर्यावरणाचे संवर्धन देखील करता येईल”.

याच विचारातून त्यांनी जुलै २०१६ मध्ये  कोड ची स्थापना केली, जेथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या फेरवापर प्रक्रिया केल्या जातात. हे स्टार्टअप सिगरेटच्या टाकाऊ असलेल्या सर्वच कच-याचा फेरवापर करतात, आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी ते लोकांना पैसे देखील देतात. या स्टार्टअपमध्ये प्रत्येक एक किलो थोटकांना सातशे रुपये दिले जातात आणि शंभर ग्रँम करिता ८० रुपये दिले जातात. सिगरेट ग्राहक आणि विक्री करणारे त्यांना हा कचरा आणून देतात आणि पैसे मिळवतात.

प्रक्रिया केलेले सिगरेटचे फिल्टर्स ९९.९ टक्के सुरक्षीत असते कारण त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि ब्यूरो ऑफ इंडियन स्टँण्डर्ड यांच्याकडून ते प्रमाणित केले जाते.  या स्टार्टअपकडून दहा किलो पेक्षा जास्त सिगरेटची राख, थोटके आणि कागद गेल्या तीन महिन्यात गोळा करण्यात आली. आणि हे काम संपूर्ण देशभर पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नोएडा स्थित कोडचे ७० ग्राहक सध्या आहेत, यापैकी ५० विक्रेते आहेत  त्यांना त्यासाठी सिगरेटचा कचरा गोळा करण्याचा सेवाप्रकल्प देण्यात आला. विशाल हे २५ वर्षांचे असून व्यवसायाने अभियंता आहेत, तर नमन दिल्ली विद्यापिठाचे स्नातक आहेत.

एका अहवालानुसार, सिगरेटची थोटके हा सर्वात अविघटन कारी पदार्थ आहे, एकट्या भारतात दरवर्षी शंभर दशलक्ष सिगरेटची थोटके जमा होत असावीत, एकट्या बंगळूरू शहरात हे प्रमाण ३१लाख थोटके रोज असे आहे. एचसीजी कर्करोग केंद्राचे डॉ विशाल राव यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “ सिगरेटचा कचरा हा सर्वात घातक पदार्थ असतो, बहुतांश सिगरेटची थोटके कार्सिनोजीक असतात आणि पाण्याला देखील प्रदूषित करू शकतात जर ती पाण्यात टाकली तर. मासे, प्राणी आणि पक्षी यांना देखील ती खाल्यास अपाय होण्याचा धोका असतो.” जगभरात होणा-या तापमान वाढ आणि पर्यावरणाच्या -हासाच्या चर्चेनंतर दिल्लीच्या या तरुणांनी हा चांगला उपक्रम सुरु केला आहे जे पर्यावरणाच्या संवर्धनाचे मोठे काम करत आहेत.