दर्जेदार शिक्षणाच्या शोधात ‘मायक्लासरुम’!

0

शिक्षणाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी काही लोक गोष्टी तर मोठ्या मोठ्या करतात. मात्र, वास्तवात हे काम असे लोक करत आहेत, जे गोष्टींपेक्षा काम करण्यावर विश्वास ठेवतात. एखाद्या शाळेत वर्गातील ३० मुले एका खास विषयावर संवाद साधतात, तर त्याच वर्गातील बसलेली मुले त्यात सामिल होऊ शकत नाहीत. तसेच शिक्षकांना देखील एखाद्या नेमलेल्या वेळेत मुलांना शिकविण्याची घाई असते, त्या दरम्यान ते घरासाठी देखील काम देतात. ही एक जुनी प्रक्रिया आहे. “ माय क्लासरूम” ने याच समस्येचे निराकरण शोधलेले आहे. हे केवळ या समस्यांना दूरच करत नाहीत तर, हे त्या वर्गाला एक वेगळा अनुभव प्रदान करतात.

“माय क्लासरूम” मध्ये समूह संपर्क माध्यमे आणि ई-लर्निंगचे मजबूत मिश्रण आहे. जे पारंपारिक वर्गात देण्यात येणा-या शिक्षण आणि शिकवण्याच्या कलेला ऑनलाईन मंच उपलब्ध करून देते. “माय क्लासरूम” चे सहसंस्थापक नटराज यांच्यामते, “दुस-या शब्दात याला स्मार्ट जागेवर स्मार्ट पद्धतीने शिकणे देखील म्हणू शकतो.” हे सुरु करण्याचे कारण विद्यार्थ्यांच्या सहायतेसाठी विविधतेसोबत संवादासाठी एक मोठे मंच उपलब्ध करणे आहे. ज्यात विभिन्न भौगोलिक क्षेत्र आणि संस्कृतीचा सहयोग असेल. नटराज यांच्या मते, माय क्लासरूमचा विचार त्यांना तेव्हा आला, जेव्हा ते एमबीए चे शिक्षण घेत होते. त्यांना या गोष्टीची जाणीव होती की, चांगल्या संघटना मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ओपन कोर्सच्या कल्पनेवर काम करत आहेत आणि हे सर्व फक्त एकमेकांची मदत करण्यासाठी. तसेच याची सुरुवात यासाठी करण्यात आली होती की, जगभरात समान विचार असणा-या लोकांना एकत्र आणले जावे. ते मानतात की, शिक्षण एक संवाद आणि एक अनुभव आहे.

“माय क्लासरूम” ची स्थापना सौंदर्न नटराजन आणि नटराजन यांनी मिळून केली होती. सौंदर्न यांच्याकडे तांत्रिक क्षेत्रातील २२ वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ओरेकल कॉर्पोरेशन मधून केली होती, ज्यानंतर त्यांनी Quest America Inc. साठी काम केले. तर, नटराजन सॉफ्टवेयर ऑर्किटेक्ट राहिले आहेत, ज्यांनी युएस फेडरल एजेंसी एफएए आणि इपिए व्यतिरिक्त जॉर्ज वॉशिंगटन विद्यापीठासाठी काम केले आहे. हे दोघे एकमेकांना मागील १० वर्षापासून ओळखतात. या लोकांच्या गटात ८ सदस्य आहेत आणि हे लोक कोयंबट्टूर आणि बेंगळूरूमध्ये काम करत आहेत. मात्र, त्यांचे अधिकाधिक काम कोयंबट्टूर मधूनच होत असते. “माय क्लासरूम” मध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

१. लोकांची बुद्धी – जागतिक पातळीवर अशा लोकांना सामिल करून घेणे जे, एका क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.

२. चांगली सहायक सामग्री – विद्यार्थ्याच्या माहितीच्या आधारावर आवश्यक माहिती देणे, जेणेकरून विद्यार्थ्याचा वेळ वाचेल आणि त्यांना माहिती देखील मिळेल.

३. ऍपच्या माध्यमातून प्रायोगिक शिक्षण – विद्यार्थ्याला आपल्या विचारांच्या माध्यमातून जागतिक परिस्थितीनुसार समर्थ बनविणे.

सध्या “माय क्लासरूम” चे लक्ष उच्च शिक्षणावर आहे, मात्र शाळेच्या पातळीवर देखील त्यांनी काही पथदर्शीप्रकल्प तयार केले आहेत, सध्या त्यांच्यासोबत अनेक शैक्षणिक संस्था सामिल झाल्या आहेत, ज्यांचे अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध आहेत. एका निष्कर्षानुसार जागतिक पातळीवर वर्ष २०११ मध्ये सेल्फ पेस्ड ई- लर्निंगचा व्यवसाय जवळपास ३५.६ अब्ज डॉलरचा होता, जो वाढून ५६.२ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे आणि वर्ष २०१५ च्या अखेरपर्यंत हा दुप्पट होण्याची आशा आहे.

“माय क्लासरूम” ची सुरुवात जुलै २०११ मध्ये झाली होती, तेव्हा त्यांच्या या मंचाचा वापर ३० हजार विद्यार्थी करत होते. वर्ष २०१२ मध्ये या लोकांनी वीटीयू सोबत ई- लर्निंगसाठी परस्परसामंजस्य कराराव्दारे हातमिळवणी केली. ज्या मार्फत विटीयूच्या १७५ मान्यता प्राप्त संस्थांना हे लोक माय क्लासरूम सोबत चित्रफिती देखील देतात. मागीलवर्षी त्यांनी अध्यापक विडीयो व्याख्यान स्पर्धेचे देखील आयोजन केले होते, ज्यात सर्वात चांगल्या चित्रफितीच्या व्याख्यानांना सन्मानित देखील केले. तर, ‘एसोचैम’कडून वर्ष२०१४चा राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार “माय क्लासरूम” च्या गटाला देण्यात आले.

“माय क्लासरूम” च्या गटाचे मत आहे की, त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आपले उत्पन्न वाढविण्याचे होते. या लोकांचा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आहे, जे विभिन्न शैक्षणिक संस्थांमध्ये सामील झाले आहेत. सध्या हा बाजार विस्कळीत आहे. त्यामुळे यात शिरकाव करणे खूपच मेहनतीचे काम आहे. सोबतच प्रभावशाली लोकांना सामील करणे प्रमुख आव्हानापैकी एक आहे. या लोकांचे मत आहे की, प्रत्येक दिवशी बदल होत आहेत, अशातच या लोकांना देखील कायम बदलावे लागते. 

लेखक: हरिश बिश्त

अनुवाद: किशोर आपटे