रूढी-परंपरा मोडत रिक्षा चालविणाऱ्या बांग्लादेशातील एकमेव रिक्षाचालिका मोस्समत जास्मिन

0

४५, वर्षिय मोस्समत जास्मिन यांनी अनेक प्रकारच्या व्यवसायात आपला हात मारून पाहिला आहे, अगदी घरकाम करणा-या बाई पासून कपड्यांच्या कारखान्यात कामगार म्हणून देखील. आता त्या बांग्लादेशातील एकमेव माहिती असलेल्या ऑटो रिक्षा चालिका आहेत. तीन मुलांची माता असलेल्या त्यांना चितगाव परिसरात ‘क्रेझी आन्टी’ संबोधले जाते. तेथे त्या ऑटो रिक्षा चालवितात आणि पाचशे ते सहाशे रुपये रोज कमावितात, त्या म्हणतात, “ हे मी करते कारण माझ्या मुलांनी उपाशी राहू नये, आणि चांगले शिकावे. अल्लाहने मला धडधाकट हात आणि पाय त्यासाठीच दिले आहेत.”


जास्मिन यांनी रिक्षा ओढण्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू केले, ज्यावेळी त्यांना घरकाम करताना किंवा कारखान्यात काम करून भागत नाही हे जाणवले, कारण त्यांना त्यांच्या कुटूंबाचे चांगले संगोपन आणि मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. शेवटी त्यांना अशा प्रकारच्या कामामुळे अनेक अडथळे आलेच, कारण बांग्लादेश हा परंपरावादी देश आहे, जेथे महिलांनी अशी कामे करणे चांगले समजले जात नाही. त्यावर त्या म्हणतात की, “ सुरूवातीला अनेकांनी रिक्षात बसण्यास नकारही दिला, तर काहींनी टोमणे सुध्दा मारले, मी पुरूषांचे काम करत आहे असे देखील म्हटले.”

नकळतपणे त्यानी पुरूषांच्या मक्तेदारीला आव्हान दिले होते, मात्र त्यांचा हेतू केवळ कायमस्वरूपी रोजगार मिळवणे इतकाच होता. त्यांच्या पतीने अन्य महिलेसोबत लग्न केल्याने त्यांना काही वर्षांपूर्वी सोडून दिले, त्यावेळेपासून, त्या एकट्या माता म्हणून मिळेल ते काम करून मुलांचे पालन पोषण करत आहेत आणि कुटूंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. 

सुरूवातीलाच असंख्य अडथळे येवूनही, त्यांना वाहतूक पोलिसांनी त्रास दिला, कारण त्या नेहमी हेल्मेट घालत नव्हत्या, आणि त्यांनी हे काम का सुरू केले आहे म्हणूनही विचारणा झाल्या मात्र त्यांच्या निर्णयावर त्या पक्क्या रहिल्या आणि रस्त्यावर देखील.