कदाचित यात्रेने तुमचे जीवन वाचेल.....

कदाचित यात्रेने तुमचे जीवन वाचेल.....

Friday January 13, 2017,

4 min Read

कमल याने सर्वस्व गमावले. त्याचे वडील वारले. त्याचे काम गेले. त्याचे नातेसंबंध संपुष्टात आले. त्याला असहाय, निराश आणि तुटलेपणाची जाणीव झाली. तो इतका हरवला, भरकटला, त्याचे गमावलेले मार्ग शोधत राहिला. वीस वर्षांनंतर त्याने काय घडले त्यावर कादंबरी लिहिली, “पुनर्जन्म”. ही कादंबरी त्यावर आहे की त्याने प्राचीन यात्रेच्या कलेमधून स्वत:चा शोध कसा घेतला. भटक्या होवून कसा जगला.

या जगातील सर्वच शोधयंत्रणा कोलमडून पडल्या तर हरवलेल्याने वाट कशी शोधायची ? अशा परिस्थितीत यात्रेकरू, पांगलेले कसे काय मार्ग शोधतील ? मी कमल यांचे पुस्तक वाचले. पुस्तक आजच आले. मी माझ्या सिस्टिममध्ये डाऊनलोड करून घेतले. मला शोध घ्यायचा आहे कि, विनाअडथळा मी रोजच्या जीवनातसुध्दा कसे यात्रा करू शकतो आणि तेही चौकटीत अडकलो असलो तरी. तसेच मी मुक्तपणे भटकंती करू शकतो का ?

काहीवेऴा मलाही बध्द झाल्यासारखे वाटते. पण मी एकाचवेळी काही महिने दूर जावू शकत नाही. मला माझ्या जीवनात आता यात्रा हव्या आहेत! याबाबतची माहिती मी ‘पुनर्जन्म’या पुस्तकाच्या वाचनातून मिळवू शकतो तसेच कमल यांच्याशी चर्चा करून, कारण यात्रा हा विषय खूप मोठा आहे, त्याचे अनेक भाग आहेत.


image


कमल रविकांत यांच्या पूर्ण मुलाखतीचा सारांश इथे पहा.

अ) उत्तराच्या शोधात

काहीतरी घडले. काहीतरी संभ्रमात टाकणारे. काहीतरी जे नियोजित नव्हते असे.

तुम्हाला नेहमीचा मार्ग सोडून द्यायला लावणारे. असो. एक नव्याने प्रयत्न करा, वेगळ्या वळणावरून चालण्याचा, धीराने आणि संयमाने जगण्याचा. आहे ती वाट स्वीकारण्याचा.

ब) वास्तव स्वीकारण्यास वेळ लागेल

मला नाही वाटत की, तुम्हाला कुठल्या दूर स्थळी जावे लागेल.

परंतू प्रत्येक दिवशी स्वत:साठी वेळ द्या, त्यासाठी जे यापूर्वी तुम्ही कधीच केले नाही. अशा गोष्टीचा विचार करा जो तुम्ही यापूर्वी कधी केला नसेल.

अशा जागा शोधा ज्या तुम्ही या पूर्वी कधीच पाहिल्या नसतील. त्या तेथे निरंतर असतील. यात्रेकरुंच्या प्रतिक्षेत.

धाडस करा जे तुम्ही पूर्वी कधीच केले नसेल.

क) संघर्ष

कदाचित काही लोकांना जीवन सुखावह असेलही, मला नाही.

जीवन पैश्याच्या चिंतेने भरले आहे, नातेसंबंधाच्या चिंतेने, (माझ्यासाठी) मुलांच्या चिंतेने, निर्णयांच्या, लोकांच्या जे माझा मत्सर करतात, जे माझा त्रागा करतात. जे मला घाबरतात. तिरस्कार, दुस्वास करतात.

प्रत्येक यात्रा संघर्षातून सुरु होते. आणि सारे प्रवास संघर्षांचे आहेत. संघर्ष संपत नाही ते बदलत राहतात. ते बदलतात त्या ठिकाणी जिथे तुम्ही हारता, जिथे तुम्ही तुमच्या ध्येयापासून परावृत्त होता. जिथे तुमचा संघर्ष इतरांच्या लक्षात येत नाही पण तुमच्यावर असामान्य प्रभाव टाकून जातो.

ड) यात्रेचे फायदे :

* तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता: यात्रेत तुम्ही प्रत्येक गोष्ट नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळ्या रितीने पाहता. त्याची मजा घेता. त्यातून शिकता. अगदी एका दिवसात, एका भेटीत, यात्रा होवू शकते.

* तुम्ही लोकांना भेटता. मला प्रत्येकाकडून माझ्या भवितव्यासाठी काही घ्यायला आवडते. थोडेसे शिळे, थोडेसे कुरकुरीत, ज्यात काही संदेश असेल असे.

आम्ही यात्रा अधिक सोपी केली. आपण वस्तुसंग्रहालयात जावून दोन हजार कला अविष्काराच्या गोष्टी पाहू शकतो. काही लोक एखादे संग्रहालयात लटकणारे चित्र पाहण्यासाठी हजार किमी वरून येतात. मग तुम्ही जे वास्तव अनुभवता ते जास्त प्रभावशाली नाही का ?

तुम्ही जितके लोकांना मान्य करत जाल, गोष्टींचा स्विकार करत जाल, तुमच्या भोवतालच्या भावना समजत जाल, तेवढे जास्त तुम्ही यात्रेकरू व्हाल.

तुमच्यात परिवर्तन करून परता. यात्रा केवळ लॉस एंजेलिस वरून न्यूयॉर्कला विमानाने जाण्यात नाही. भटकंती केल्यानेच तुमच्यात बदल होतो. तुम्ही ते तुमची समज वापरून करा: जास्त ऐका, जास्त पहा, जास्त चव चाखा, निरिक्षण जास्त करा.

आधुनिक जीवनात मुल्य देवूनच काही गोष्टी घेता येतात. आता यात्रा करणे कठीण झाले आहे कारण सारे काही तुमच्या फोनच्या हाकेच्या दोन पावलांवर आले आहे.

भटकंती करत काही कालवधीसाठी इतरांपासून अलिप्त राहण्याचा वेगळाच अनुभव असतो. त्यातून जे साध्य करता येते, त्यासाठी अनुभवच घ्यावा लागेल.

कमल रविकांत यांच्या “पुनर्जन्म” ने मला या गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडले. ते यात्रेला गेले. ते लोकांना भेटले. त्यांनी धाडस केले, प्रवास केले, आणि त्यांचे पुस्तक वाचल्यावर मला समजले की हे कसे घडले.

वेळ आणि रेकॉर्ड तारीख

• अनेक वर्षांपूर्वी, मी कमल यांच्याकडून शिकलो की तुम्ही तुमचे स्वत:चे पुस्तक स्वत:च प्रकाशित करा आणि ते दोनशे पेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे नको. ते दहा पानी असेल. किंवा चाळीस पानी. तुम्ही लहानसे पुस्तक आत्ताच लिहा आणि आठवडाभरात प्रकाशित करा. ते शक्य आहे. मी ते केले आहे. ऐका कमलने ते कसे केले [६:२०]

• कमाल म्हणतात, “ जर तुम्हाला जीवनाचा धडा शिकायचा असेल, पण तो जलद शिकायला हवा. . . जा हे करा (ऐका) [१५:४२]

• “प्रत्येकजण मनोरंजक आहे”, कमल सांगतात. ते विश्लेषण करतात की तुमच्या आवडीच्या विषयात तुम्हाला कसे रममाण होता येईल [२३:००]

• “ एखाद्याला जर असे वाटले की, ‘सारे काही निष्फळ आहे’ काय करावे?” कमल यांनी स़ांगितले की भय झटकून कसे पुढे जायला हवे [२४:३०]

• कमल संन्याश्याशी बोलले. त्यांनी त्याला विचारले, “ तुम्हाला शांती कशी मिळाली?” साधूने तीन उत्तरे दिली. आणि मला समजलीच नाहीत. मी विचारणाच करत राहिलो, “ तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? त्याचा अर्थ काय?” तो समजावत राहिला, आणि मी शिकलो शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी क्रमांक एकचे तत्वज्ञान. कमल याच तत्त्वज्ञानाचा जीवनात अवलंब करतात. कमल सांगतात, हे तत्त्वज्ञान प्राप्त करण्यासाठी मी संघर्ष केला. तुम्ही देखील त्यासाठी प्रयत्न करा. ते ऐका [४८:४०]

लेखक : जेम्स अल्टूचेर

सूचना: या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते आणि दृष्टिकोन ही लेखकाची स्वत:ची मते आहेत आणि त्याच्याशी युअरस्टोरी सहमत असेलच असे नाही.