अपंगत्वाच्या दुहेरी आघातानंतरही राष्ट्रीय पुरस्कारावर ठसा : शिवानी गुप्ता !

0

आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कठीण नसतो, असे सांगणाऱ्या शिवानी गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढाव उतार पाहिले. आयुष्यात दोन अपघातांना सामोरी जाणाऱ्या शिवानी जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवतात. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील आपला ठसा उमटवतात. अशा या शिवानी यांची कहाणी आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

शिवानी गुप्ता दिल्ली येथील एक उमद्या तरुणी. देशातील अनेक शहरांमध्ये शिक्षणासाठी आयुष्यातील महत्वाचा वेळ व्यतित करणाऱ्या शिवानी एक आनंदी आणि स्वयंपूर्ण तरुणी होत्या. आयुष्याबाबत त्यांची अनेक स्वप्ने होती आणि ती पूर्णदेखील होत होती. आयएचएममधुन शिक्षण पूर्ण केल्यानंतरत्यांना राजधानीतच एका चांगल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. ऐन विशीतच त्यांच्या आयुष्यातील स्वप्नवत प्रवास सुरू होता. मात्र एका रात्रीतच त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

एका रात्री त्यांनी काही मित्रमंडळींना छोट्या पार्टीसाठी आमंत्रित केले. पार्टीनंतर जेव्हा सर्वांची घरी निघण्याची वेळ झाली तेव्हा शिवानी यांनी काही मैत्रिणींना पुन्हा हॉटेलवर सोडण्याची जबाबदारी घेतली. मात्र त्या निर्णयाने त्यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. त्यांच्या गाडीचा एक मोठा अपघात झाला आणि त्यात २२ वर्षीय शिवानी यांच्या पाठीच्या कण्याला जबर दुखापत झाली. या एका अपघातामुळे स्वप्नवत सुरू असलेला आयुष्याचा प्रवास अचानक विस्कळीत झाला. या एका अपघाताने जणू त्यांचे आयुष्य पालटले होते आणि यापुढे देखील आपल्या आयुष्यात बदलाचे वारे वाहणार असल्याची कल्पना त्यांना आली होती. ʻअपंगत्व म्हणजे काय? अपंगत्वाशी दोन हात कसे करायचे, याची मला कल्पनादेखील नव्हती. वयाच्या २२ व्या वर्षी माझी अनेक स्वप्ने होती. अपंगत्व हे त्यापैकी नक्कीच नव्हते. त्याच्याशी दोन हात कसे करायचे, याबाबत मला पुसटशी कल्पनादेखील नव्हती. ती परिस्थिती अत्यंत निराशाजनक होती. मी जगाचा सामना करू शकते, हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण होण्यासाठी बराच कालावधी लोटला ʼ, असे शिवानी सांगतात. या अपघातामुळे त्यांना हॉटेलमधील नोकरीदेखील गमवावी लागली. मंदीचे कारण देऊन त्यांना नोकरीवरुन काढल्याचे शिवानी सांगतात. मात्र मला त्या हॉटेलविरोधात लढा देण्याचा हक्क आहे का?, हेदेखील माहित नसल्याचे शिवानी सांगतात. काही कालावधीतच शिवानी एका वेगळ्या छंदासह या जगाचा घटक होण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी चित्रे काढण्यास सुरू केली. काही कालावधीतच त्यांनी या चित्रांची विक्री करण्यास सुरुवात केली. प्रदर्शन, मेळा आणि कार्यक्रमांमध्ये त्या या चित्रांचे प्रदर्शन भरवत असत. " मला माहित होते की, मी काही चांगली चित्रकार नाही. मला नेहमीच पेच असायचा की, लोकांना खरचं माझी चित्रे आवडत आहेत म्हणून ती विकत घेत आहे की फक्त सहानुभूती म्हणून. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात काही वेगळे करायचे ठरवले," असे शिवानी सांगतात. दरम्यानच्या काळात शिवानी यांना युकेमध्ये दोन महिन्यांसाठी पुर्नवसन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. येथे त्यांना अपंगत्वासोबत काही हक्क मिळाल्याचे लक्षात आले. १९९६ साली त्या या कार्यक्रमातून परत आल्या. लोकांमध्ये आशेचे किरण पसरवण्यासाठी त्यांनी बाहेर पडणे अपेक्षित होते. त्यावेळी भारतीय मज्जातंतू दुखापत केंद्र फेरबांधणीच्या प्रक्रियेत होते असे त्या सांगतात. त्यांनी तेथे समुपदेशक म्हणून काम सुरू केले. त्यांच्यासारखीच परिस्थिती ओढावलेल्या रुग्णांशी त्या चर्चा करत असत. सहा वर्षात त्यांनी शेकडो रुग्णांचे मनोधैर्य उंचावले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बॅंकॉक येथील मुख्यालयात झालेल्या युनेस्कॅपच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. विना अपंगत्व वातावरणात प्रशिक्षण देण्याचा या कार्यक्रमाचा हेतू होता. यात शिवानी यांना केवळ त्यांच्या हक्कांची जाणीवच नाही तर जगाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी मदत देणे, ही सरकारचीदेखील कशाप्रकारे जबाबदारी आहे, हेदेखील समजले. बॅंकॉकवरुन भारतात परतल्यानंतर त्यांनी तात्काळ पाच स्वयंसेवी संस्थांकरिता कार्य़शाळांचे आयोजन केले. शिवाय देशातील सर्व राज्यांमध्ये शासकिय प्रतिनिधी योजण्यासाठी आराखडा तयार केला. ʻहे सर्व बहुतांशी कोलमडले. कारण त्यांच्यासमोर कोणतेही जिवंत उदाहरण नव्हते. काहीही साध्य झाले नव्हते. त्यामुळे आमचे कार्यकर्ते त्यांच्या कामात संघटीत होत नव्हते. या कार्यक्रमासाठी एका दिर्घकालीन प्रशिक्षणाची गरज होती. याशिवाय बांधिलकीची गरज होती ʼ, असे शिवानी सांगतात. त्यानंतर त्यांनी या विषयावर एका साहित्याचे सहलेखन केले. मात्र त्यात आपल्या ज्ञानात कमतरता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील शिक्षण घेण्याचे ठरवून त्यासाठी त्यांनी युकेमधील एडेक्सेलमध्ये मास्टर्स इन आर्किटेक्ट डिझाईनसाठी प्रवेश घेतला. आणि त्याशिवाय युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगमधुन एमएसस्सी इन इन्क्लुसिव इनव्हायरमेंट या विषयातदेखील पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या सर्व गोष्टींमुळे शिवानी आता फक्त अपंगत्वावर मात करणारी पहिली व्यक्ती ठरल्या होत्या. शिवाय सुगम यंत्रणेबाबत संशोधन आणि तज्ञ्जांच्या योजना अंमलात आणणाऱ्या विविध संस्थांना त्या मदतदेखील करत होती. २००६ साली त्यांना या संस्थेतून काढण्यात आले. ʻसुगम यंत्रणेबाबत सर्वच स्तरातील आमचे केंद्रीत प्रय़त्न सुरू होते. खासगी, हॉस्पिटॅलिटी आणि किरकोळ क्षेत्रांमध्ये आता लोक अपंग लोकांना नोकरीची संधी देत होते. शिक्षण क्षेत्रात आम्ही त्यांना एक परिपूर्ण योजना सादर केली होती. ज्यामुळे ते त्यांच्या पायाभूत सुविधा आणि पद्धती अपंग लोकांना सुयोग्य अशा बनवू शकत होते. ʼ शिवानी यांच्या नावाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागली होती. जिनेवा येथील मानवी हक्क उच्चायोग कार्यालयाशी आता शिवानी संबंधित होत्या. अखेरीस जागतिक स्तरावर आपली जागा तयार करण्यात त्या पुन्हा एकदा यशस्वी झाल्या होत्या. मात्र २००९ साली पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्याने अनपेक्षित कलाटणी घेतली. २००९ साली शिवानी याचा पुन्हा अपघात झाला. ज्या सर्व गोष्टींची शिवानी यांनी पुन्हा एकदा उभारणी केली होती. त्या पुन्हा एकदा कोलमडून पडल्या. या अपघातात त्यांनी त्यांचा पती गमावला. याशिवाय या अपघातात शिवानी यांचे सासरेदेखील सापडले होते. पतीच्या मृत्युनंतर त्या पुरत्या कोलमडून गेल्या होत्या. अखेरीस या धक्क्यातून सावरुन पुन्हा आयुष्य जगायलात्यांनी सुरुवात केली. आपल्या आय़ुष्यावर ʻनो लुकींग बॅकʼ, हे पुस्तक लिहिले. ʻआत्मचरित्र लिहिताना मी माझ्याबाबतीत खूप विचार केला आणि तेव्हा मला समजले की, मी ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे, ती माझ्या आयुष्याच्या कथेतच सामावलेली आहेत.ʼ, असे शिवानी सांगतात.

शिवानी यांना या लढ्यासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अपंग नागरिकांसाठी रोजगार क्षेत्रातील वाढत्या संधीसाठी त्यांना एनसीइपीआरडी शेल हेलेन केलर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर आदर्श व्यक्तीमत्व म्हणून कॅविनकेर एबिलिटी मिस्टरी अवॉर्ड त्यांना देण्यात आला. याशिवाय स्नोडॉन अवॉर्ड फॉर डिसेबल स्टुडेन्ट आणि सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या महिलांना वार्षिक दिला जाणारा नीरजा भनॉट पुरस्कारदेखील त्यांना देण्यात आला. याशिवाय सामाजिक न्याय विभाग आणि सबलीकरण मंत्रालयाद्वारे देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देण्यात आला. या सर्व पुरस्कारांपैकी नीरजा भनॉट पुरस्कार विशेष असल्याचे शिवानी सांगते. प्रत्येक दिवस हा कठीण नसतो, असे सांगताना शिवानी सांगते की, " भारतीय समाजामध्ये अपंगत्व हे नेहमीच सहानुभुती आणि मदत सोबत घेऊन येते. एकदा एका बाईने मला २५ पैसे देऊ केले होते. फक्त मी एका मंदिराबाहेर बसले होते आणि अपंग होते म्हणून. तिला वाटले मी भिक मागत आहे. या एका घटनेने मला पूर्णतः हादरवून टाकले होते," असे त्या सांगतात. इतर लक्षणांप्रमाणेच अपंगत्व एक असल्याचे लोकांना समजत नाही. शिवानी सांगतात की, तुम्ही रशियामध्ये जा आणि तेथे त्यांची भाषा बोलू नका. तेव्हा तुम्ही त्यांच्या दृष्टीने अपंगच असता. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही निरुपयोगी आहात. संयमाने रहा, आयुष्यात जे समोर येत आहे त्याचा सामना करा आणि कायम आयुष्याचे ऋणी रहा, असे त्या सांगतात.