या ४१वर्षीय मुंबईतील टॅक्सीचालकाने दहावी शालांत परिक्षा दिली तेंव्हा. . . 

0

शरीफ अब्दुल समद खान हे मुलूंड -मुंबई येथे टॅक्सीचालक आहेत, त्यांनी ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत त्यांना नवा आदर्श घालून दिला आहे. या ४१ वर्षीयांनी स्वत:ला दहावी शालांत परिक्षा देण्यासाठी तयार केले आहे. २५ वर्षापूर्वी शाळा सुटल्याने ते दहावी उत्तीर्ण होवू शकले नाहीत. बालवयातच शाळा सुटली आणि त्यांना काम करावे लागले होते, कारण कुटूंबात कमाविणारे कुणीच नव्हते.

घराच्या आर्थिक स्थितीला हातभार लावल्यानंतर आता शरीफ यांनी शिक्षण घेण्याचे ठरविले आहे, शिकून पाव विकणा-या आपल्या वडीलांसाठी काहीतरी करावे असा त्यांचा मानस आहे. त्यांना आणखी सहा भावंडे आहेत आणि त्या सा-यांच्या मदतीने त्यांना आपल्या घरच्यांसाठी शिकून आणखी काहीतरी चांगले काम करायचे आहे. उत्तरप्रदेशातील प्रतापगढ येथील त्यांचे कुटूंब आहे, घरच्या परिस्थितीबाबत सांगताना शरीफ म्हणाले की, १९ ९१-९२च्या सुमारास कधीतरी मी मुलूंड मध्ये महापालिका शाळेतून शिकताना शिक्षण अर्धवट सोडले. या शहरात आम्हाला राहण्यासारखी स्थिती नव्हती, असे आमच्या लक्षात आले होते. दंगलीमुळे आम्हाला प्रत्यक्षात काही त्रास झाला नाही तरी आमच्या घरच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरित परिणाम झाला होता. मला काम करून वडीलांना आर्थिक हातभार लावायचा होता. त्यावेळी मला वाटले होते की, मी कधीच हाती पुस्तक घेवू शकणार नाही. पैसे कमवायचे आणि कुटूंबाचे भरण पोषण करायचे हेच माझे ध्येय होते.


शरीफ आता पाच मुलांचे पिता आहेत, आणि नेहमी याचा विचार करतात की त्यांनी शाळेत जावून त्यांचे शिक्षण पूर्ण करावे. स्वत: वाईट स्थितीतून गेले असल्याने त्यांना शाळा सोडावी लागली होती, त्यामुळे ती वेळ आपल्या मुलांवर येवू नये असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या मुलांपैकी एक रूकसार यांनी नुकतीच बारावी ची परिक्षा दिली.

त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ मला पाच मुले आहेत, चार मुली ज्या हिंदी माध्यमातून शिकत आहेत आणि मुलगा दुसरीत आहे त्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत आहे. माझ्या मुलींपैकी एक रूकसार बारावीच्या परिक्षेला बसली आहे. आणि तीने आणि इतर मुलांनीच मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे”.

या माणसासाठी आजही जीवन खडतर आहेच, ते चाळीत लहानश्या जागेत राहतात आणि आठ ते दहा तास भट्टीजवळच्या तापमानात काम करतात, जेणेकरून त्यांच्या मुलांचे आयुष्य चांगले व्हावे. असे असले तरी त्यांच्या घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर, खास करून त्यांच्या मुलांच्या इच्छेसाठी, ज्यांनी त्याना दहावी उत्तिर्ण व्हा म्हणून गळ घातली आहे ते परिक्षेला बसले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या दहावीच्या शालांत परिक्षेत ते यंदा शिक्षणाचा उरलेला डाव बहिस्थ विद्यार्थी म्हणून पूर्ण करत आहेत.

रूकसार यांनी स्वत:ची परिक्षा झाल्या बरोबर त्यांच्या परिक्षेच्या अभ्यासाची तयारी करून घेण्यात पुढाकार घेतला आहे.

या कहाणीतून सा-यांना हीच प्रेरणा घेता येते की, शिकण्यासाठी कधीच उशीर होत नसतो, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील.

शरीफ सांगतात की, “पढने की कोई सीमा नही होती” (शिकण्याच्या काहीच मर्यादा नसतात.)