रिमा लागू यांचे ५९व्या वर्षी अकस्मात निधन, ३१व्या वर्षी ‘मैने प्यार किया’ मध्ये केली होती सलमानच्या आईची भूमिका!

0

शांत संयत अभिनयाची राणी असलेल्या रिमा लागू यांनी बॉलिवूडच्या नायकाच्या आईच्या भूमिकेत ऐन तरूणपणी जी नजाकत आणली त्याची आठवण त्या कायम ठेवून गेल्या आहेत. खासकरून सलमान खान यांच्या मैने प्यार काय मधील ही आई आज सा-याना सोडून गेली आहे.

रिमा यांनी सहकलाकार म्हणून हिंदी आणि मराठीत अनेक भूमिका केल्या, मराठी रंगभूमी  तर त्यांनी गेल्या चार दशकांपासून गाजवली होती. तुझं माझं जमेना या मराठी विनोदी मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका केली होती. श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या सारख्या मालिकांतून त्या झळकल्या होत्या. मात्र चरित्र अभिनयात त्यांनी विशेष कामगिरी केली, मैने प्यार किया, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, कल हो ना हो, सारख्या सिनेमात त्यांनी आई साकारली होती. यात हे वाखाणण्याजोगे होते की केवळ ३१व्या वर्षी त्यांनी म्हणजे सलमान खान यांच्या पेक्षा आठ वर्षाने मोठ्या असताना त्यांनी त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. यातून हिंदी सिनेमात त्यांच्या नावे वेगळ्याच प्रतिमा तयार झाल्या होत्या, त्यांच्या सह कलाकारांनी त्या वयात वेगळ्या भूमिका केल्या तरी आईच्या भूमिकेत त्यांनी जे नवीन ग्लॅमर निर्माण केले ते कुणाला साध्य करता आले नाही.


त्यावेळी त्यांच्या वयाच्या असलेल्या ग्लॅमरस अभिनेत्री श्रीदेवी, माधुरी दीक्षित, काजोल यांना हे शक्य झाले नाही, त्यांना तर वयाच्या चाळीशी आणि पन्नाशीजवळ येवूनही ते शक्य झाल्याचे दिसत नाही. ज्या काळात महिला अभिनेत्री आपले वय लपवत असत त्या काऴात त्यांनी ही भूमिका स्विकारणे धाडसाचे होते. अशा भूमिका करणे कुणा अभिनेत्रीला त्यांची कारकिर्द आणि वैवाहिक आयुष्य पणास लावण्याचा धोका असल्यासारखेच होते.

नुकताच आपण १४ मे रोजी मदर्स डे साजरा केला, मात्र त्यावेळी शुभेच्छा देताना आईच्या आरोग्याची काळजी आणि तिच्या दीर्घायुष्याची कामना करताना वयाची साठी देखील न गाठता बॉलिवूडच्या या आईने मनाला चटका लावून जी एक्झीट केली ती विसरता येणार नाही.