तुम्हाला अवघड प्रश्नासाठी सोपी उत्तरे केवळ सामान्य ज्ञानातून मिळू शकतात

तुम्हाला अवघड प्रश्नासाठी सोपी उत्तरे केवळ सामान्य ज्ञानातून मिळू शकतात

Saturday October 01, 2016,

3 min Read

“ बुक माय शो”चा प्रवास सुरू झाला तो धुम्रपान आणि दारू पिण्यातून. मी स्वत: धुम्रपान करत नाही किंवा मला इतरांच्या धुम्रपान करण्याने त्रासही होत नाही, मी जाहिरात क्षेत्रात काम करतो आणि तेथे प्रत्येकाला चहा आणि सिगारेट हवी असते. मला आश्चर्य वाटते की, जे.वॉल्टर थॉमसन यांनी धुम्रपान करण्यास परवानगी कशी दिली, कदाचित माझ्या मते आयटीसी हा त्यांचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने. मला यातून सुटका हवी होती आणि मी सुटी घेतली,” असे आशिष हेमराजानी यांनी टेकस्पार्क२०१६मध्ये बोलताना सांगितले.

बुक माय शो चा जन्म होण्यास काही प्रसंग घडले. १९९० ते २०००च्या सुमारास आशिष सुट्टी घेऊन दक्षिण आफ्रिका आणि बोस्टवानाचा प्रवास करत होते. तो रस्त्याने केलेला पाठदुखीचा प्रवास होता. आणि त्यावेळी त्यांनी रेडिओवर ऐकले की, लोक रग्बी तिकिटे विकत घेऊ शकतात. त्यातून हे सारे भारतात कशा प्रकारे करता येईल यावर आशिष यांनी विचार सुरू केला. बुक माय शोच्या संकल्पनेचे बिजारोपण यातून झाले. पण पुन्हा एकदा दारूमुळेच अशिष यांनी हा व्यवसाय सुरू केला हे सांगावे लागेल. हे कसे ते सांगताना ते म्हणाले की, “ मला आठवते की या लांब रांगेत उभे राहताना तेथे तिकीट खरेदीसाठी छोटे भोक असायचे. अनेकदा रांगेत बराचवेळ उभे असलेल्या ग्राहकांवर पोलीस लाठ्याही चालवत असत. मला हे सारे फार काळ सातत्याने हे सहन करणे शक्य नव्हते. मी यावर फार विचार न करता पुढील प्रवास करण्यास सुरुवात केली".

image


त्यांच्या या प्रवासात ते दारू उत्पादक भागात येऊन पोहोचले, जेथे तुम्हाला वाईन मोफत मिळते. हा अनुभव सांगताना आशिष म्हणाले की, जेंव्हा लोक कटिंग चहा घेत प्रत्येकजण औपचारिक बोलत पण ते जेंव्हा वाईन घेत ते वेगळे बोलत असत.

“ पण मी वेगळा होतो, मी भारतीय आहे. आणि मला चांगली लाल वाइन वाया घालवणे योग्य वाटले नाही,(चूळ भरुन). म्हणून दुपारी तीनच्या सुमारास मी माझ्या मेंदूला ताण दिला. त्याची सुरुवात धुम्रपानाने झाली आणि शेवट दारुने झाला. मी तरूणांच्या वस्तीगृहाच्या पलंगावर होतो आणि मी एक खार्चिक संदेश रु.१८६ खर्च करून माझ्या वरिष्ठांना पाठविला त्यामध्ये म्हटले की, मी नोकरी सोडून जात आहे. असा संदेश मी पाठवला असल्याची जाणीव मला दुसऱ्या दिवशी झाली. ” दुस-या दिवशी मुंबईला परत येऊन, आशिष यांना जाणवले की ते बेरोजगार झाले आहेत आणि त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार करून दोन तीन गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली. त्यानंतर त्यांनी चेस यांना फॅक्स पाठविला आणि बुक माय शोची सुरूवात दोन कोटी रुपयांनी झाली. ते डॉट कॉमच्या बोलबाल्याचे दिवस होते.

१९९९ मध्ये, बुक माय शोला इतर ऑनलाईन बुकींगपेक्षा जास्त प्रतिसाद होता आणि ती तिकिटे दिल्यावर पैसे घेणारी एक आघाडीची कंपनी होती. नंतर न्युजकॉर्प कडून २००१-०२च्या सुमारास बुक माय शोला गुंतवणूक मिळाली आणि डॉट कॉमने सहा वरून १५० अशी संख्या वाढवून माणसे नियुक्त केली. त्यानंतर २५०० चौ. फूटाच्या कार्यालयातून निघून त्यांनी स्वत:चे बिजनेस हाऊस वांद्रे येथे सुरू केले. त्यानंतर झपाट्याने विकास झाला आणि त्यांच्या सहका-यांनी मिळून इकोसिस्टीमच्या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. “ आम्ही कॉल सेंटर चालविण्यास सुरूवात केली. कार्यक्रमांसाठी व्हाइट लेबल सेवा सुरू केली. यातून मी शिकलो की, तुम्हाला अवघड प्रश्नासाठी सोपी उत्तरे केवळ सामान्य ज्ञानातूनच मिळू शकतात”

हा प्रवास अर्थात सोपा नव्हताच, पण उद्यमी म्हणून तुम्हाला काही पर्याय नसतो आशिष म्हणाले, “ निराशावादी म्हणतो की पेला अर्धा रिकामा आहे, आशावादी म्हणतो की, अर्धा भरला आहे, पण उद्यमी रिकामा भाग पाहतो आणि त्यात काहीतरी चांगले पेय टाकून आनंद घेत पुढचा प्रवास करतो".