तुमच्या स्टार्टअप कहाणीची हेडलाइन कोण लिहिणार ?

0

२००८ साली जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा इतर स्टार्टअप्सप्रमाणे माझी या जगात ओळख व्हावी, असे मला वाटायचे. आणि त्याकरिता माध्यमांमध्ये माझ्याबद्दल लिहून येणे, यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो. माध्यमांमध्ये आपली माहिती जाणे, हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक निश्चित आणि पक्का मार्ग आहे. ज्यामुळे तुम्ही लोकांना सांगू शकाल की, 'हे, मी इथे आहे आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहचू शकाल.' कोणीही असे करत नव्हते, त्यामुळे माझी निराशा झाली. स्वतः काहीतरी वेगळे सुरू करण्यासाठी मी कॉर्पोरेट विश्वातील माझी एक उत्कृष्ट अशी नोकरी सोडली होती. माध्यमांना माझी गोष्ट सांगण्याची गरज वाटत नव्हती का? माझ्या काही अद्वितिय उपक्रमांबद्दल काही सांगू शकत होते का? प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी ज्या कंपनीत काम केले होते, त्या सीएनबीसी टीवी १८च्या हाय प्रोफाईल यंग टर्कस शोमध्ये मला सहभागी व्हायचे होते.

पारंपारिक माध्यमांनी मला एक हात दूर ठेवले होते (मी खरचं त्यांची आभारी आहे. कारण एक सर्वोत्तम गोष्ट माझ्यासोबत घडली नव्हती). मला आठवते काही वर्षांपूर्वी जेव्हा औद्योगिक क्षेत्राने तिघांना पुरस्कार देऊन गौरवले होते. उर्वरित दोघांना भारतात सर्वाधिक प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या व्यावसायिक दैनिकात अर्धपानाचे कव्हरेज मिळाले होते, जेथून मी बाहेर पडले होते. मला आठवते की मी ते वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा चाळून पाहत होते. कदाचित मला ते सापडत नव्हते, कदाचित ते कुठेतरी गोंधळून गेले होते. त्यात युअरस्टोरीचा उल्लेख झाला आहे का, हे पाहण्यासाठी मी उत्सुक होते.  नाही, त्याचा उल्लेख तेथे झाला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून, मी माझ्या मनाची समजूत काढली होती की, मुख्यधारेतील माध्यमांकरिता मी सध्या लक्षात येण्यासारखा विषय नाही. नक्कीच जर तेथे उल्लेख जरी झाला तरी मला कृतज्ञता वाटत असे. मात्र एकंदरीतच हा एक फरक एका ठिणगीप्रमाणे होता, ज्यामुळे मला युअरस्टोरी हे उद्योजकांकरिता एक सर्वोत्तम माध्यम बनवायची गरज वाटली. जेथे कोणाला त्याची किंवा तिची गोष्ट सांगण्याची जागा मिळणार होती. आतापर्य़ंत जवळपास ३० हजार लोकांनी युअरस्टोरीसाठी हे काम केले आणि हो, हो आमची ही गती कायम राखण्याच्या प्रयत्नात आमच्याकडून अनेक गोष्टी राहूनदेखील गेल्या.

एक उद्योजक म्हणून मी समजू शकते की, आपली कथा इतरांपर्यंत, माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची  किती गरज असते,  मला आठवते, जेव्हा मी सीएनबीसी आणि युअरस्टोरीमध्ये काम करत होते, तेव्हा फ्लिपकार्टवरील एका कर्मचाऱ्याने (जे आता माझे मित्र आहेत) मला फोन केला आणि यंग टर्क कार्य़क्रमात कव्हरेज मिळण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. ते म्हणाले की, 'आम्ही ज्यावेळेस कोणत्याही मोठ्या महाविद्यालयात जातो, तेव्हा आमच्याबद्दल त्यांना माहिती नसते. या कार्य़क्रमामुळे आम्हाला फायदा होईल.' आपल्या सर्वांकडे आपल्याला माध्यमांकडून कव्हरेज मिळावे, याकरिता कारणे असतात. वेळेनुसार ती बदलतही जातात. पण जर तुम्ही व्यवसायात असाल, तर तुम्हाला संवाद साधण्याची गरज आहे आणि त्याकरिता माध्यम हे सर्वोत्तम ठिकाण आहे. २००८ सालापासून जेव्हा युअरस्टोरीची स्थापना झाली, तेव्हापासून भारतीय माध्यमे ही टप्प्याटप्प्याने प्रगल्भित होत आहेत.

माध्यम जगतातील बड्या कंपन्यांनादेखील दोन वर्षांपूर्वी जाणीव झाली की, स्टार्टअप्स कव्हर करणे आणि त्याबद्दल माहिती लिहिणे, हे उत्तम आहे. स्टार्टअप्सच्या या लाटेला इंधन मिळाले ते, ई-कॉमर्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जात असल्याने. ज्यामुळे स्टार्टअपची बातमी ही हेडलाईन योग्य होत असे. प्रत्येक दिवशी स्टार्टअपची बातमी ही मुख्य बातमी होती. अब्जावधी डॉलर्सच्या घरात कोणाला स्थान मिळाले? कोण आहे नवा पोस्टर बॉय? सर्वात मोठी गुंतवणूक कोण करत आहे? हो, युअरस्टोरी सारख्या प्रोत्साहन देणाऱ्या अनेक व्यासपीठांवर कधीकधी हेडलाईनकरिता दबाव टाकण्यात येत होता. कारण आम्हाला माहित होते की, ऑनलाईन माध्यमांमध्ये किती वेळेस ते संकेतस्थळ पाहिले गेले आहे, हे महत्वाचे असते.

बातमी आणि हेडलाईनबाबत बोलायचे झाल्यास, मला एक प्रश्न पडला आहे, ज्यावर आपण सर्वांनी विचार केल्यास मला आवडेल. स्टार्टअपची बातमी ही कमालीची का असते? स्टार्टअप्स हे देशाचे तारणहार असल्यापासून ते स्टार्टअप्सना वाचवण्याची गरज, कोणत्याही मुद्द्याकरिता माध्यमे शेवटपर्य़ंत का अवलंबून राहतात? गेल्या आठवड्यात मी जगाच्या शेवटाच्या अनेक कथा वाचल्या. माझ्याकरिता अनेक उद्योजकांसह फंडिंग हे एका मोठ्या प्रवासातील एक पाऊल असते. असे वाटते की, स्टार्टअप जगत हे चांगले आणि वाईटामधील लढाईपासून फक्त आठवडाभराच्या अंतरावर आहे. मी काही तज्ज्ञ नाही मात्र मला माध्यमांना आणि समर्थकांना विचारायला आवडेल की, चढ आणि उतार हे प्रत्येक प्रवासातील एक नैसर्गिक भाग आहेत का? कोणा एकाला एका दिवसाकरिता नायक का बनवायचा आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्याला कवडीमोल ठरवायचे – त्याच्या कामगिरीवर आधारित नाही पण त्याच्याबद्दलच्या अनुमानांवरुन.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा:

मला माहित नाही... आणि मला त्या गोष्टीचा पश्चातापही नाही

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उद्योजकांना मी विचारेन, आपण पहिल्या पानावर स्थान मिळवल्यास आपल्याला एवढा अभिमान का वाटतो?

गेल्या काही वर्षांपासून, मी अनेक स्टार्टअप हिरो पाहिले आहेत ज्यांनी सतत माध्यमांच्या चर्चेत राहून आपल्या उपस्थितीचा ठसा उमटवला आहे. एका उद्योजकाने तर मला सांगितले होते की, 'अनेक टीवी चॅनेल्स माझा पाठलाग करत आहेत. मला त्यांच्याकरिता वेळ मिळत नाही. तर मला तुमच्याकरिता वेळ कसा मिळेल?' त्यांच्या त्या उद़्गाराने मला माझ्या स्थळी आणून ठेवले मात्र मला आश्चर्य़ वाटले की, त्यांना जाणीव तर झाली नाही ना, की माध्यमांनी लक्ष देणे हे अल्पजीवी आहे? ही पोस्ट माध्यमांकरिता नाही. कारण माध्यमे ही माध्यमे राहणार नाहीत जर त्यांनी आपल्याला हेडलाईन्स दिल्या नाहीत. त्यांनी आपले लक्ष वेधून घ्यायलाच हवे. अन्यथा ते कंटाळवाणे होईल.

आपण उद्योजक आपली कथा सांगण्याचा का प्रयत्न करत नाही? वेळेच्या अभावामुळे? किंवा आपल्याला असे वाटत राहते की, माझ्याकरिता ही योग्य वेळ नाही. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की, जनसंपर्क करणारी व्यक्ती किंवा कथा सांगणाऱ्या तज्ञ्जाची याकरिता गरज आहे. आपणच या गोष्टी नियंत्रणात आणण्याची गरज आहे. किमान आपल्याला शक्य होतील तेवढ्यातरी. आम्ही एका विषयावर काम करतो, तो म्हणजे माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत राहणे, का महत्वाचे आहे? उलट जर तुम्हाला माध्यमांकडून जास्त कव्हरेज मिळत असेल, तर तो चिंतेचा विषय आहे. सोशल माध्यामांच्याद्वारे तुम्ही स्वतःचा मिडिया का तयार करत नाही? इथे मी पेपरटॅप स्टोरीचा उल्लेख करेन. संस्थापक नवनीत सिंग जेव्हा त्यांचा व्यवसाय बंद पडत होता, तेव्हा त्याबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे अजिबात अडखळले नाहीत. नवनीत यांनी स्वतः त्यांची कथा त्यांच्या शब्दात सांगितली. नक्कीच त्यामुळे कोणी अंदाज बांधणे थांबवले नाही. मात्र त्यांनी त्यांच्या शब्दातील कथा सर्वांना सांगितली. त्यांनी सर्वांना सांगितले की, त्यांना काय हवे होते आणि त्यात त्यांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता.

अनेक उद्योजकांनी मला सांगितले की, मी भविष्यातील एक यशस्वी उद्योजक होणार आणि तुम्ही पाठलाग करत असणारी हेडलाईन मी असणार. मला त्यांचा आत्मविश्वास आवडला. पण मला मनातल्यामनात भीतीदेखील वाटली, देव न करो जर ते कायम चर्चेत राहिले तर येत्या काही दिवसात त्यांनी सूर्यप्रकाशात किंवा गडद अंधारात स्वतःसाठी वेळ शोधण्यास तयार रहावे. जेव्हा मी हे लिहित होते, तेव्हा मी भूतकाळात रमून गेले, जेथे बातमी तसेच कार्यालय आणि जीवन यांच्यात कशाप्रकारे समन्वय असावा, हे मला शिकायला मिळाले होते. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मला सांगावेसे वाटते की, 'चला स्वतः स्वतःची हेडलाईन लिहूया तसेच स्वतःची स्टार्टअप स्टोरीदेखील लिहूया.'

लेखिका – श्रद्धा शर्मा (मुख्य संपादिका, युअरस्टोरी)
अनुवाद – रंजिता परब