एकेकाळी गंभीर उदासीनतेतून जाणा-या पूनम आता इतरांच्या समस्येचे करत आहे निराकरण

0

आयुष्य बर्फासारखे आहे, जे काळासोबत हळूहळू वितळून संपून जाते. मात्र, काहींच्या जगण्याची पध्दत त्याला कधी सामान्य तर कधी असामान्य बनवतो. काही लोक हा वेळ चांगल्या कामासाठी खर्च करतात, तर काही लोक आपले अमूल्य जीवन असेच वाया घालवितात. वैयक्तिक समस्या, त्रास आणि अपूर्ण स्वप्नांमध्ये चांगल्या दिवसांच्या अपेक्षेचे ओझे अनेकदा लोकांना दाबून टाकते. व्यक्तीला आयुष्यात खूप काही करायचे असते, परंतु ते करू शकत नाहीत, मात्र काही लोक आपल्या सर्व समस्या असूनही दुस-यांसाठी देखील वेळ काढतात. ते असे काहीतरी करतात, जी त्यांच्या आंतरात्म्याची इच्छा असते. यामुळे त्यांना केवळ मन:शांतीच मिळत नाही तर, समाजाला देखील यामुळे फायदा होतो आणि असे लोक समाजासाठी प्रेरणा बनतात. आम्ही तुम्हाला ओळख करून देत आहोत, ३५ वर्षाच्या पूनम सोलंकी यांच्याशी, ज्या एक सामान्य महिला ते असामान्य महिला बनल्या आहेत. एकेकाळी गंभीर उदासीनतेतून जाणा-या पूनम आता दुस-यांच्या आयुष्यातील समस्या सोडवत आहेत. सामान्य ते विशेष बनण्याचा पूनम सोलंकी यांच्या आयुष्याचा हा प्रवास त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे, जे आपल्या सामान्य जीवनात देखील काहीतरी आगळे वेगळे करू इच्छितात. मृदुभाषी, सौम्य स्वभाव, व्यवहार कौशल्य आणि आकर्षक व्यक्तिमत्व यांची देणगी असलेल्या पूनम राजकारण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्राची एकत्र दखल घेतात. असे असूनही त्या आपले यश प्रकाशझोतात न आणता त्याला लपविणे जास्त पसंत करतात.


कुष्ठरोगी आणि नाव नसलेल्या मुलांच्या हक्काची आवाज

छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यात राहणा-या पूनम सोलंकी शांतपणे अशा मुद्द्यांवर काम करतात, ज्यावर सामान्यरित्या लोक बोलणे देखील पसंत करत नाहीत आणि काम देखील दुर्मिळ लोक करतात. पूनम मागील काही वर्षांपासून या भागात राहणा-या कुष्ठरोग्यांची मदत करतात, त्यांना ओळखून त्यांचा उपचार आणि पुनर्वसन करणे त्यांचे काम आहे. अशा रोगींना त्या मोफत मिळणा-या सरकारी उपचार आणि औषधांबाबत माहिती करून देतात. त्यांना उपचारासाठी प्रेरित करतात. कुष्ठरोग निवारण योजनांमध्ये असलेल्या सरकारी आणि गैर सरकारी एजन्सीला त्या अशा रोगींच्या पुनर्वसन योजनांमध्ये मदत करतात. सामान्य लोकांमध्ये कुष्ठ आणि कुष्ठरोगीं प्रती पसरलेली दुर्भावना आणि पूर्वाग्रहाला दूर करून लोकांना जागरूक करतात. त्या व्यतिरिक्त पूनम त्या मुलांची बाजू उचलून धरतात, ज्यांचा जन्म एखाद्या अवैध संबंधामुळे झाला असतो. पूनम अशा मुलांना एखादे अनाथालय किंवा कुणाला दत्तक न देता त्यांना त्यांच्या वास्तविक वडिलांचे नाव मिळवून देण्यात जास्त विश्वास ठेवतात. त्यांचे मत आहे की, त्यामुळे याप्रकारच्या वाईटावर लगाम लागेल, तसेच अशा मुलांना त्यांचा अधिकार मिळू शकेल. असे असूनही या सामाजिक वाईटा विरुद्ध आवाज उचलणे सहज सोपे काम नाही, कारण यात सर्वात जास्त समाजाचा मजबूत वर्गच गुन्हेगार असतो. हे खूपच कठीण काम असते, तरीही पूनम या मुद्द्यांवर काम करत आहेत. 


लोक आणि ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण

पूनम सोलंकी एक यशस्वी आणि ओडिसी नर्तिका आहेत. ओडिसी सोबतच छत्तीसगढ़ी, राजस्थानी आणि गुजराती लोक नृत्य गरबामध्ये त्या पारंगत आहेत. नृत्य त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. साधना आणि पूजा आहे.  घुंगरांचा आवाज आणि तबल्याच्या तालासोबत त्यांच्या चेह-यावर अप्रतिम भाव आणि पदलालित्य त्यांच्या एखाद्या नृत्यशैलीला खूप खास बनवतात. या कलेच्या खाणा-खुणा ओळखणारे प्रेक्षक त्यांचे सादरीकरण पाहून पहिल्यांदा त्यांच्या नृत्य शैलीने वेडे होतात. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या आयोजनांमध्ये स्वतःचे सादरीकरण केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचा एक नृत्यगट देखील आहे. त्या स्वतः छत्तीसगढमध्ये जन्माला आल्या आणि शिकलेल्या आहेत, मात्र गुजरातच्या लोकांना त्यांचे गरबा नृत्य शिकवितात. तसेच आर्थिकरित्या कमजोर मुलींना मोफत नृत्याच्या वेगवेगळ्या शैलींचे प्रशिक्षण देतात. त्यांच्यात असलेल्या कलेला त्या सावरतात. 


२००४ मध्ये नगरसेविक होत्या

पूनम सोलंकी अनेक कलेमध्ये माहीर आहेत. कला, संस्कृती सोबत राजकारणात देखील आवड आहे. वर्ष २००४मध्ये त्या आपल्या भागातील नगरसेविका राहिल्या आहेत. जवळपास १५ वर्षांपासून नगरसेविका असलेल्या पूनम यांना कॉंग्रेस उमेदवाराविरुद्ध लोकांनी रिंगणात उतरवले होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे निवडणुकीत त्यांना विक्रमी विजय मिळाला आणि पुढील पाच वर्षापर्यंत त्या नगरसेविका राहिल्या. आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांनी आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. प्रभागात सुविधांच्या विकासासोबतच महिला सबलीकरण आणि शिक्षणावर देखील त्यांनी लक्ष दिले. महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकडे आणि त्यांच्या सुरक्षेकडे त्यांनी लक्ष दिले. पुढील निवडणुकीत आरक्षित जागा असल्यामुळे त्या पुन्हा निवडणूक लढवू शकल्या नाहीत, मात्र आपल्या क्षेत्रात सामाजिक कार्य त्या आजही करतात. 

समाजातून असमानता दूर करण्याची पूनम यांची इच्छा

पूनम सोलंकी समाजातून जाती, प्रथा आणि अन्य प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक विषमतेला दूर करू इच्छितात. त्यांनी युवर स्टोरी सोबत संवाद साधताना सांगितले की, “देश तेव्हाच प्रगती करेल, जेव्हा समाजातून असमानता नष्ट होईल. जातीप्रथा सामाजिक एकतेमध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. यात बांधल्यामुळे लोकांचे विचार संकुंचित होतात. लोक संपूर्ण मानवता, समाज आणि देशाचे चांगले करणे आणि होण्याच्या जागी आपल्या जाती पर्यंतच राहतात. जातीव्यवस्थेमुळे देशात निवडणूक प्रक्रिया देखील निष्पक्षरित्या होऊ शकत नाही. एक योग्य आणि चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याचे सोडून लोक आपल्या जातीच्या अयोग्य आणि खराब छवी असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत निवडून देतात.” जातीप्रथेवर पूनम यांचा विचार आणि वक्तव्य केवळ कुणा नेत्याचे भाषण नाही, तर त्यांनी याला स्वतःच्या आयुष्यात देखील लागू केले आहे. 

मुलींच्या स्वातंत्र्याला महत्व

महिलेच्या स्वातंत्र्यावर पूनम यांचे विचार स्पष्ट आहेत. त्या सांगतात की, महिला सबलीकरणाच्या रस्त्यात सर्वात पहिले पाउल मुली आणि महिलांचे स्वातंत्र्य आहे. देश आणि जगाच्या निम्म्या लोकसंख्येला मागास ठेवून कुठलाही देश किंवा समाज प्रगती करू शकत नाही. महिलांना देखील आपल्या आवडीनुसार कारकीर्द निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, जेणेकरून त्या स्वतःला सिद्ध करू शकतील. आयुष्यात आपली एक वेगळी ओळख बनवू शकतील आणि आपले ध्येय सिद्ध करू शकतील. त्यांना महिलांच्या देश आणि समाज निर्माणाच्या प्रक्रियेत भागीदारी पाहिजे. पूनम सांगतात की,“एक महिला जर आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकते. आपल्या मुलांचे पालन पोषण करू शकते, तर त्याच जबाबदारीने आणि निष्ठेसोबत आपल्या देश आणि संपूर्ण समाजाची देखील जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलू शकते. त्यांना केवळ एक संधी दिली पाहिजे.” त्यामुळे त्या मुलींच्या शिक्षणाला खूप महत्वाचे मानतात. शिक्षणातच त्यांना महिलांच्या स्वातंत्र्याचा रस्ता दिसतो. त्यांची इच्छा आहे की, मुलींनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात पुढे वाढावे.

मुलींच्या इच्छेनुसार त्यांचे लग्न व्हावे

पूनम बाल विवाह आणि विसंगत विवाह दोन्हीच्या विरुद्ध आहेत. त्या सांगतात की, “बाल विवाहमुले जेथे मुलींचे लहानपण संपते आणि ते चांगले शिक्षण घेऊ शकतात, तसेच विसंगत विवाहामुळे संपूर्ण आयुष्य खराब होते. लग्नात मुलींची इच्छा खूप गरजेची आहे. आई - वडिलांनी आपल्या मुलीला साथीदाराबाबत असलेले विचार जाणून घेणे आवश्यक आहे. स्वतःची इच्छा त्यांच्यावर थोपण्यापेक्षा स्वत:च्या इच्छेने त्यांना संपूर्ण निर्णय घेऊ द्यावा.”

पूनम स्वत: छत्तीसगढच्या आहेत, मात्र त्यांनी गुजराती कुटुंबात दुस-या जातीच्या मुलासोबत विवाह केला. आंतरजातीय विवाहावर त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्या सांगतात की, याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. सरकार देखील याला प्रोत्साहन देण्यासाठी आज अशा तरुणांना ५० हजारापासून अडीच लाखापर्यंत रक्कम देत आहे. 

उदासीनतेमुळे दुस-यांसाठी काहीतरी करण्याची मिळाली प्रेरणा

पूनम सोलंकी यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात खूप मनोरंजक आहे. रायगढच्या महाविद्यालयात बीएससीच्या शिक्षणादरम्यान आपल्या महाविद्यालयातील एक वर्गमित्र दिवेश सोलंकी यांच्यावर पूनम यांचे प्रेम झाले. घरातल्या लोकांचा विरोध असूनही, त्यांनी दिवेश यांच्यासोबत विवाह केला. असे असूनही लग्नाच्या अनेक वर्षानंतर आजही त्या म्हणतात की, त्या नव्हे तर दिवेश त्यांच्या मागे पडले होते. असो, काहीपण... कुटुंबात पहिल्यांदा एखादा प्रेम विवाह आणि ते देखील आंतरजातीय हे कुणालाही पसंत पडले नव्हते. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना बेदखल केले. कुटुंबियांची नाराजी आणि घरातून नाते तुटल्यामुळे त्यांच्यावर त्याचा खूप वाईट परिणाम झाला. त्या उदासीनतेच्या छायेत गेल्या. डॉक्टरांकडून त्यांचा उपचार करण्यात आला. त्यादरम्यान नातेसंबंधात आलेला दुरावा दूर होऊन त्यात गोडवा येऊ लागला. पूनम यांच्या माहेरी आणि सासरी दोन्ही पक्षांनी हळू हळू त्यांना स्विकारणे सुरु केले. मात्र त्या उदासीनतेतून बाहेर येऊ शकत नव्हत्या. त्याचदरम्यान उदासीनतेमुळे त्यांना नृत्याकडे वळविले, ज्याची आवड त्यांच्या मनातील एका कोप-यात दबलेली होती. पूनम यांनी नृत्याची सुरुवात उदासीनतेतून निघण्यासाठी केली होती, मात्र त्यांना माहित पडले नाही की, कधी आणि कशा त्या राजकारण आणि समाजसेवेच्या रस्त्याकडे वळल्या. 

पूनम सांगतात की, “जीवनाची सुंदरता आणि यश यावर निर्भर नसते की, तुम्ही किती खुश आहात, तर जीवनाची सार्थकता यावर आहे की, दुसरे आपल्यामुळे किती खुश आहेत.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

संसाराची गाडी चालवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांशी मैत्री करणारी कविता

लैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत आहे समाजातील रूढीवादी विचार

रात्र गस्तीच्या वेळी तान्ह्या मुलीला सोबत घेऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 'अर्चना झा'


लेखक : हुसैन ताबिश
अनुवाद : किशोर आपटे