खवय्येगिरीच्या छंद आणि हौसेतून सुरू झाली खाद्य यात्रा, ‘कसीता शेफ’!

खवय्येगिरीच्या छंद आणि हौसेतून सुरू झाली खाद्य यात्रा, ‘कसीता शेफ’!

Monday May 08, 2017,

4 min Read

कसीता शेफ तुमचा मनाजोगा घरगुती आचारी, दर्जेदार सुग्रास खव्वयांसाठी आगळा वेगळा उपक्रम. लज्जतदार खानपानाचे शौकीन असला तर तुमच्यासाठी ही माहिती म्हणजे मेजवानीची ‘दावत’ आहे हे नक्कीच!

‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम’ असे म्हटले जाते. पण ते खाणे म्हणजे वेगळ्या रसास्वादाची अनुभूती असली पाहिजे,अशाच खवय्यांसाठी आक्टोबर २०१६ मध्ये पुण्यात ‘कसिता शेफ’ नावाने जिभेची हौस पूरविणारी आणि त्यांना खावू घालण्याचा आनंद कमाविणारी खाद्य चळवळ सुरू झाली आहे. बघता बघता गेल्या केवळ काही महिन्यात तिला इतका प्रतिसाद मिळाला की खवय्यांनी आता त्यासाठी स्वत: देखील काही करण्याची आणि ही खाद्य चळवळ पुण्याबाहेर घेवून जाण्याची तयारी दर्शवली आहे. तुमच्या घरच्या स्वादाची मासांहारी व्यंजने येथे तुम्हाला दर्जा आणि स्वाद यांच्याशी कोणतीही तडजोड न करता मनभर-पोटभर खावू घातली जातात, त्यात व्यावसायिकतेपेक्षा खावू घालण्याचे समाधान कमाविण्याचा अट्टाहास जास्त असतो!


शैलेश - संस्थापक 'कसिता शेफ'

शैलेश - संस्थापक 'कसिता शेफ'


गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘कसीता शेफ’ ची ऑनलाइनवरून सुरूवात झाली आहे, या नावात स्पॅनीश स्पर्श आहे ( त्याचा अर्थ घरगुती असा होतो) भारतीय पध्दतीचे मांसाहारी जेवण देणे ही याची खासीयत. थोडक्यात तुमचा घरचा आचारी, सध्या कसिता शेफ केवळ मासांहार करणा-यांसाठी सेवा देते. त्यात मराठी आणि केरळी पध्दतीच्या मसाल्यांचा वापर केला जातो, मराठी पध्दतीने मटण-चिकन रस्सा किंवा सुका, प्रॉन्स, किंवा खेकडे यांना दाक्षिणात्य पध्दतीचा स्पर्श आणि स्वाद असतो.


शैलेश, पत्नी जिजा समवेत

शैलेश, पत्नी जिजा समवेत


कसिता शेफचा कटाक्ष हा असतो की, घरच्या चवीचा आणि दर्जेदार अश्या मासांहारी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची हौस आणि छंद पूर्ण करणे. म्हणजे ‘खाणा-याने खात जात जावे आणि ते तयार करून खावू घालणाराचेही समाधान व्हावे’ असा हा उपक्रम आहे. पुण्यातील मुळचे खवय्ये असलेले शैलेश हे ‘कन्सेप्ट डिझायनिंग आणि ब्रँण्ड डिझायनिंग’च्या क्षेत्रात काम करतात मात्रा त्यांना आणि त्यांच्या पत्नी जिजा यांना मुळातच चवीचे खाण्याचे आणि त्यासाठी काहीही त्रास सहन करण्याचे वेड, छंद, हौस असे सारे काही आहे. त्यातूनच त्यानी मग ‘सुपर फाईन फूड’ ही संकल्पना सुरू केली. त्यांच्या सारख्या चोखंदळ खवय्यांच्या जिभेचे चोचले पूरवणारी खाद्य यात्रा! याची खासीयत म्हणजे तुम्ही मागणी नोंदवा आणि त्यानुसार तुम्हाला हव्या त्या पदार्थाची खमंग मागणी पूर्ण केली जाते. हे सारे काही ताजे तवाने आणि अगदी दर्जेदार देण्याचा स्थायीभाव ठेवून केले जाते. मग ते मसाल्या पासून तेला पर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्ट का असेना दर्जा आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्णता यांचे भान ठेवून आदरपूर्वक शिजवले जाते जेणे करून ते खाताना खवय्यांना ‘अहाहा स्वर्ग तो हाच’ असा भाव निर्माण व्हावा! कसिता बिर्यानी मध्येही पूर्णत: घरचे तूप वापरले जाते, ज्यावेळी तुम्हाला एक किलो बिर्याणी हवी असते त्यावेळी प्रत्यक्षात ती किलोपेक्षा कितीतरी जास्त असते म्हणजे तुमच्या मनाचे समाधान होईपर्यंत तुम्ही ते खावू शकता. दर्जा, ताजेपणा आणि प्रमाण यांच्यात कुठेही तडजोड येथे केली जात नाही.

image


image


या सा-या खादंतीच्या छंदासाठी कोणाही पारंपारीक आचारी किंवा शेफला सोबत न घेता शैलेश यांनी तीन गृहिणींच्या मदतीने त्यांना काही प्रमाणात प्रशिक्षण आणि सूचना देवून ‘शेफ’ म्हणून स्वयंपाक घरात तैनात केले आहे, गेल्या सात- आठ महिन्यांपासून त्यांच्या हाताची चव इतकी खुलत चालली आहे की ‘कसिता शेफ’ ला येणा-या खवय्यांच्या मागण्यांचा परिघ दिल्ली आणि मुंबई पर्यंत पोहोचला आहे.


image


कसितामध्ये जेवणाची इच्छा असेल तर तुम्हाला काही प्रमाणात शिस्त ही पाळावी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला जर रात्रीचे जेवण हवे असेल तर ठराविक वेळेत तुम्हाला तुमची मागणी नोंदवावी लागते, तसेच दुपारचे जेवण असेल तरी त्या ठराविक वेळेत तुम्ही त्याची पूर्व कल्पना द्यावी असा येथील रिवाज आहे. कारण तुमच्या दर्जेदार ताज्या आणि चविष्ट खादंतीसाठी मग येथे पाक कौशल्य पणाला लागते, आणि तयार होतात तुमच्या जिभेला पाणी आणतील अशी दर्जेदार व्यंजने!


image


तसे तर आज तुम्हाला मासांहार करायचा असेल तर मर्जीनुसार केंव्हाही कुठेही करता येतो, मग ‘कसिता शेफ’ मध्येच का? या प्रश्नाचे उत्तर देताना शैलेश म्हणतात की, “ धावपळीच्या आजच्या जीवनात माणसाला चवीचे खाद्य, दर्जेदार आणि चोखंदळ पध्दतीने देणे जेणेकरून त्यांच्या चवीची रसना जिभेवर दीर्घकाळ एक सुखद स्वाद देवून जीवनाचा आनंद व्दिगुणित करेल यासाठी हा प्रयत्न आहे.” साधारणत: आपण अन्यत्र जेव्हा जेवायला जातो त्यावेळी ब-याच तडजोडी केल्या जातात इथे ख-या अर्थाने ‘होम शेफ’ म्हणजे घरच्या जेवणाची चव तुम्हाला घेता येते. असे जेवण ज्यात व्यावसायिक दृष्टीने तुमच्या खिश्यातून पैसे काढायचे म्हणून काहीच केले जात नाही, तर तुमच्या मनातील खवय्येगिरीच्या आनंदात भर घालून मन भरून स्वाद आणि लज्जत यांचा तुम्हाला आनंद देताना खावू घालण्याची हौस भागवणारी ही खाद्य जत्रा आहे.


जिजा शैलेश 

जिजा शैलेश 


ही मागणी तुम्ही फोनवरून किंवा ऑनलाईन नोंदवू शकता. त्यानंतर सुरू होते तुम्हाला दर्जेदार खाद्य देण्यासाठी स्वयंपाक घरातील कसिता शेफची खाद्य जत्रा. तुम्हाला ताजेतवाने स्वादिष्ट मासांहारी पदार्थ अगदी घरच्या सारखे पोटभर मनभर खावू घालण्यासाठी! कसिता होमच्या या खाद्य चळवळीत आता तिन जणींना स्वयंपाक करणे कठीण झाले आहे म्हणून आणखी तिघींच्या मदतीची तयारी सुरू झाली आहे. मुळातच धुणी भांडी करणा-या या मुळच्या गृहिणींना आता चांगल्या दर्जाच्या सुग्रणी म्हणून मानाचा रोजगार तर मिळालाच आहे पण त्यांच्या हाताच्या स्वादाने खावू घालण्याचा आनंद ही मिळतो आहे. आता हा पसारा वाढत जाणार आहे, खवय्यांच्या अमर्याद चोखंदळ खाद्यप्रेमाच्या या लाटेत आता छंद-हौस म्हणून सुरू झालेल्या या खाद्य जत्रेला नव्या दिशा मिळणार आहेत. ‘कसिता शेफ’च्या चोखंदळ चवीसाठी या ठिकाणी संपर्क करू शकता- 8007327373

वेबसाईट - http://casitachef.com