भारतातील दहा प्रमुख मोबाईल स्टार्टअप्स

0

गेल्या महिन्यातच संपन्न झालेल्या युवर स्टोरी टेकस्पार्क्सला भरघोस प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये भारतातील ३० टेक स्टार्टअप्स सहभागी झाले होते. युवर स्टोरी आयोजित मोबाईल स्पार्क्स २०१६ मध्ये मोबाईल क्षेत्रात नव्याने संशोधन करू पाहणाऱ्या स्टार्टअप्सना एक व्यासपीठ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.

मोबाईल स्पार्क्सचे आयोजन हे युवर स्टोरी मार्फत राबवण्यात येणाऱ्या वार्षिक कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या पाच वर्षांपासून मोबाईल स्पार्क्स चे आयोजन केले जात आहे. मोबाईल क्षेत्रातल्या हापटिक (Haptik) कल्चरअॅली (CultureAlley) , ड्राइवयु ( DriveU), मायचाइल्डअॅप (MyChildApp), स्क़ाॅडरण (Squadrun) आणि मॅडस्ट्रीटडेन (MadStreetDen) या काही स्टार कंपन्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यात.

मोबाईल स्पार्क्स २०१६ मध्ये सहभागी प्रमुख दहा कंपन्या :

फाइव्हबार्ज (5BARz) : ज्यांना कोणाला मोबाईलवर सिग्नल समस्या भेडसावते, फाइव्हबार्ज ही तांत्रिक कंपनी मोबाईल फोनचे नेटवर्क सुरळीत करण्यासाठी काम करते. फाइव्हबार्ज या कंपनीने नुकतेच एक तंत्र विकसित केले आहे जे घरात आणून फक्त प्लग इन केल्यास तुम्हाला विनाअडथळा सिग्नल मिळू शकते.

अडोरो (Adoro) : तुमच्या फॅशनसंबंधी गरजा पूर्ण करते अडोरो. एखाद्या पर्सनल असिस्टंट प्रमाणे हे तंत्रज्ञान तुमच्यासाठी काम करते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेब सामग्रीच्या सहयोगाने तुम्हाला हव्या असलेल्या एक किवा अनेक थीम उपलब्ध करून देते.

अॅपाइ (Appaie) : या कंपनीचा स्वयंचलित साॅफ्टवेअर विकसित करण्यावर भर आहे. अॅपाइकडे सध्या स्वयंचलित अॅप विकास तंत्रज्ञान आहे. विकासकाकडून मिळालेल्या सूचना घेऊन वेब रोबोटच्या सहाय्याने कोडींग केले जाते आणि सॉफ्टवेअर विकसित केले जाते किवा मेन्टेन ठेवले जाते.

डेटामेल (Datamail): मोबाईलच्या विश्वात भाषेचे येणारे अडथळे दूर सारण्यासाठी डेटामेल काम करते. एक्सझेनप्लस इमेल एंटरप्राइज सोल्युशन द्वारा विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये इमेल आयडिज तयार करून सेवा प्रदान करते. इंग्रजी आणि इतर भारतीय भाषेची सेवा या कंपनी मार्फत पुरवली जाते.

फिनोमेना (Finomena) : ग्राहकांना उद्भवणाऱ्या ऑनलाईन किवा ऑफलाईन आर्थिक व्यवहाराच्या समस्या सोडवण्यासाठी ही कंपनी काम करते. त्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक समस्या सोडवून व्यवहार अधिकाधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते.

ग्रेकर्नल (GreyKernel): ग्रेकर्नल ही कंपनी व्यावसायिकांना त्यांची उत्पादनसूची तयार करण्यास मदत करते. उत्पादनाची संपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपातील माहिती तसेच सूचना देते.

मार्क्ट.ओ (Markt.ooo): ग्राहकांची ऑनलाईन खरेदी यादी तयार करण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. किरकोळ व्यापाऱ्यांना या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

मनीटॅप (MoneyTap) : मनीटॅप या अॅपच्या माध्यमातून ऑन डिमांड क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दरमहा २५,००० पर्यंत पगार असणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध आहे.

पिक्टर (Pictor) : पिक्टर अॅप हे युजरला त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करत चांगली फोटोग्राफी करण्यास मार्गदर्शन करते. युजरने फोटोग्राफ क्लिक केल्यानंतर त्याला पुन्हा तज्ज्ञाच्या सहाय्याने दर्जेदार बनवले जाते. थोडक्यात, हे स्टार्टअप ई-कॉमर्स क्षेत्रातील फोटोग्राफी विकसित करण्याचे काम करते आहे.

स्टीन्टमिंट (StintMint): स्टीन्टमिंट हे उद्योजकांना ऑन डिमांड मोबाईल वर्कफोर्स तयार करून देते. कोर प्रक्रिया स्वयंचलित करण्यास स्टीन्टमिंट प्रयत्नशील आहे. भविष्यातील कामाचे व्यवस्थापनही यामार्फत केले जाते.