‘आय लव यू’ म्हणताना आम्ही संकोचाने दूर का पळतो?

‘आय लव यू’ म्हणताना आम्ही संकोचाने दूर का पळतो?

Monday February 15, 2016,

4 min Read

एक राष्ट्र म्हणून आमची ओळख हुशार अशीच असते. इथे जर काही स्पर्धा असेल तर आम्ही सुवर्ण, रौप्य किंवा कांस्यपदक देखील मिळवू.

मी त्याबद्दल बोलते आहे, कुणीतरी काहीतरी केले त्यावर दाद देण्यास मात्र आम्हाला खूप वेळ लागतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण विचार करा आणि स्वत:लाच विचारा की, मागील वेळी केंव्हा आपण कुणाच्यातरी चांगल्या गोष्टीला स्वत:हून दाद दिली होती.

आपल्या जगात अवतीभवती, अगदी घराच्या बाजूला किंवा स्टार्टअपच्या परिवारात, आणि जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत दाद देणे म्हणजे स्पर्धेत काहीतरी गमावण्यासारखे का असते? किंबहूना जेंव्हा ते आमच्या स्टार्टअपच्या बाबतीत असते, आपण सारे त्याला नावे ठेवण्यात पटाईत असतो.

मी हीच पध्दत गेली अनेक वर्ष पाहिलीआहे, आणि याचेच मला नेहमी आश्चर्यही वाटले आहे. –आम्ही असे का आहोत? कालचीच गोष्ट, मी एका नव्यानेच सुरू झालेल्या कंपनीच्या हुशार तरूण उमेदवारांच्या घोळक्यात होते, मी त्यांना विचारले : मित्रांनो तुमच्यापैकी कुणाचा वाखाणण्यासारखा गुण तुमच्या लक्षात येतो त्यावेळी तुम्ही पुढे येऊन त्याला दाद देता काय? कदाचित त्यांच्यातील दहाजण पुढे येऊन काहीतरी चांगले म्हणतील असे वाटले: आश्चर्य, आश्चर्य त्यांनी असे केले नाही.

याचा दोष मी आपल्या पालकांनाच देईन. होय अर्थातच. ( तुम्ही माझ्याशी वाद घालाल जेंव्हा मी माझी गोष्ट सांगेन) नक्कीच, हे करणे सोपे आहे.

image


आपल्या पालकांनीच आपल्याला संकुचितपणाने प्रेम व्यक्त करण्याची शिकवण दिलेली असते. मला सांगा जर माझी गोष्ट तुमच्याशी जुळली तर. मला आठवते शाळेत असताना मी वाद-विवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत चांगली होते. मी घरी नेहमीच बक्षीसे घेऊन जात असे माझी आई स्मितहास्य करत असे: मला तिचा आनंद समजत असे आणि तिला माझा अभिमान आहे याची जाणिव होत असे. पण त्याचवळी तिचे उद्गार काहीसे असे असत. “हे सगळं ठीक आहे, पण काय- मावशीची मुलगी पहा तिच्या वक्तृत्वाच्या शैलीने बीबीसीचा प्रकल्प मिळवला तिने, हे देखील चांगलेच आहे पण तुला अजून खूप काही करायचे आहे” मला रडावेसे वाटत असे पण माझ्या आईचा आदर करुन मी तसे करु शकत नसे.

माझ्या आईला सतत या छोट्या यशांची काळजी असे आणि माझ्या डोक्यात हेच ती भरवत असे की तिला जे हवे ते हे नाही. आणि मी सातत्याने विनवीत असे की या सा-या छोट्या आनंदाचे सुख मला घ्यायचे आहे: माझे कौतुक व्हावे, एखादी छानशी भेटवस्तू, किंवा अगदी आईस्क्रिमसुध्दा किंवा अगदी एक दिवस अभ्यास न करण्याची सूट. कारण शेवटी मी त्या दिवसाची विजेती असते. हे सारे असेच माझ्या शाळेच्या दिवसांत होत असे. मला आठवते जेंव्हा मला माझ्या सीएनबीसी कार्यालयाचे पत्र आले त्यावेळी माझ्या आईने मला हाक मारली, तिलासुध्दा खूप आनंदच झाला होता,पण – तिचे शब्द होते, “ तुझ्या भावंडाकडे पहा. तो अमेरिकेत गेलाय आणि प्रत्येक महिन्याला आपल्या आईवडिलांना हजार डॉलर्स पाठवतो” असो- माझ्या आई सोबत... काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. आणि त्या आपल्यासाठी नसतात, अगदी आजही. आम्ही खूप काही व्यवस्थित नसतो, दाद देताना किंवा घेतानाही.

ते एक अस्वस्थ नाते असते जेंव्हा दाद द्यायची असते आणि म्हणूनच टाळले जाते आणि जवळही बाळगले जाते.

किंबहूना, आपण दाद न देण्याचे दुसरे एक कारण म्हणजे आम्हाला दिलखुलासपणाने, मनमुरादपणे, वाहवा करायची नसते ती आमच्यात वृत्तीच नसते. शेवटी, संशोधनातूनही हेच दिसून आले आहे की माणूस म्हणून आम्ही इर्षा करतो जे टीका करतात आणि नकारात्मक वागतात. आम्ही अश्या लोकांचा व्देष करतो जे नकारात्मक वागतात जरी ते हुशार असले तरी. अधिक सक्षम आणि तज्ञ जे सकारात्मक बोलतात. म्हणून जितके तुम्ही इतरांची टीका कराल आणि त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्ही हुशार असल्याचे दिसून येईल.

तात्पर्य काय : आपल्या वातावरणात अशा लोकांची कमतरता असेल जे नकारात्मक वागतील किंवा संस्थेला किंवा व्यक्तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. अगदी एका रात्रीत,असे लोक तारे होतील. आणि आपण सारे त्याचे लाभार्थी होऊ कुजबूज करण्यासाठी.

सकारात्मकता म्हणजे कंटाळा. सकारत्मकता म्हणजे कमीपणाचे. सकारात्मक म्हणजे परिपूर्ण नाही. आणि त्यात तुम्ही कधीच समाधानी होऊ शकत नाही. आणि हो, सकारात्मक दाद दिल्याने कधीच चांगल्या बातमीचा मथळा होऊ शकत नाही. असे असले तरी,

माझा विश्वास आहे की, सकारात्मकता आणि दाद देण्याने नेहमीच खेळात जिंकता येते. जे लोक दाद देताना जराही टीकात्मक वागत नाहीत त्यांचाच उत्कर्ष होतो. त्यांना हवे ते संरक्षण आणि प्रेम मिळते त्यांच्या जीवनभरासाठी.

येणारा प्रत्येक दिवस आपल्याला त्यासाठी संधी देतो आहे, जीवनाला दाद देण्याची, स्वत:ला आणि त्यांना जे अवतीभवती आहेत. चला दाद देऊया, चला प्रेम करुया आणि त्याची पर्वा नको करुया की जग काय म्हणते? जर तुम्ही कशावर किंवा कुणावर प्रेम केले, ते व्यक्त करा. तुम्हा सर्वांना हे माहिती असू दे, ती एक सर्वोत्तम गोष्ट आहे, जी तुम्ही इतर कुणासाठीतरी केली आहे. जसा आपण व्हँलेंटाइन्स डे साजरा करतो आणि त्यासोबत सारे रुसवेफुगवे बाजूला ठेवतो. चला: स्वत:ला वचन द्या, प्रेम करुया दाद देण्यासाठी, शुभेच्छा देऊया आणि आपल्या स्टार्टअपच्या प्रवासाला एका प्रेममय अनुभवाचा अत्यूच्च भाग बनवू या.

हेही वाचा.

वेगळ्या वाटेने चला, स्वत:चा आत्मविश्वास असू द्या, इतरांचे कौतुक करा, यशस्वी व्हाल : श्रध्दा शर्मा मुख्य संपादिका युअर स्टोरी.

लेखिका : श्रध्दा शर्मा, मुख्य संपादिका युअर स्टोरी.

अनुवाद : किशोर आपटे.