एक असे रुग्णालय, जेथे शुक्रवारी जन्माला येणा-या मुलींना औषधा व्यतिरिक्त मिळतात, सर्व सुविधा मोफत!

0

ज्याप्रकारे मागील काही वर्षापासून जनगणनेत मुलींच्या प्रमाणात जी घट झाली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, समाजाचे काय विचार आहेत. अशातच केंद्र सरकारकडून मुलींसाठी चालविण्यात येणा-या योजनांनी जागरूक करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या जागरूकतेचा परिणाम केवळ समाजावरच नव्हे तर रुग्णालय आणि डॉक्टरांवर देखील झाला आहे. आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, जी ‘रुग्णालय आता एक व्यवसाय आहे’ या तुमच्या मनातील रूग्णालयाबाबत असलेल्या धारणेला खोटे सिद्ध करेल.

एक असे रुग्णालय जेथे शुक्रवारी जन्माला येणा-या मुलींच्या आई-वडिलांना पैसे भरावे लागत नाहीत. हो, तुम्ही बरोबर ऐकले, हे कुठल्या मोठ्या शहरातील रुग्णालय नाही. या कहाणीची माहिती घेण्यासाठी तुम्हाला दिल्लीजवळ ७५किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मेरठ शहरात यावे लागेल. मेरठचे नाव भारताच्या १८५७च्या क्रांती मध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र आज आम्ही मेरठची चर्चा ज्यामुळे करत आहोत, त्याचे कारण येथे एक रुग्णालय आहे. मेरठमध्ये असलेल्या या रुग्णालयाची विशेष बाब ही आहे की, येथे शुक्रवारी मुलींचा जन्म झाल्यानंतर त्यांना सर्व सुविधा मोफत देण्यात येतात. मुलीचे जन्माला येणे आई – वडिलांसाठी सुटकेचा निश्वास सोडणारे असते. जन्माला येणा-या मुलींच्या आई- वडिलांसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा क्षण असतो. कारण, त्यांना त्या दिवशी रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नसते. त्यादिवशी रुग्णालयात जन्माला येणा-या मुलींच्या आई- वडीलांना केवळ औषधांचाच खर्च द्यावा लागतो. त्याव्यतिरिक्त ऑपरेशन ते डॉक्टरांपासूनच्या सर्व सुविधा रुग्णालयाकडून मोफत दिल्या जातात. या लहान रुग्णालयाने आपल्या या पावलाने खूप मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दयावती रुग्णालया’ने ही सुविधा मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरु केली आणि त्याचा खूपच सकारात्मक संदेश लोकांमध्ये पोहोचत आहे.

‘युवर स्टोरी’ सोबत संवाद साधताना रुग्णालयाचे संस्थापक ४२वर्षाचे प्रमोद बालियान सांगतात की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेची सुरुवात झाली, तेव्हापासून आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. सुरुवातीला रुग्णालयाच्या या योजनेबाबत आम्ही आमच्या डॉक्टर्स आणि परिचारिकांना (नर्स) सांगितले तेव्हा ते यासाठी तयार नव्हते. मात्र, जेव्हा मी त्यांना रुग्णालयाच्या या योजनेमुळे समाजात याचा कसा प्रभाव पडेल, याबाबत सांगितले तेव्हा ते आनंदाने या योजनेत सामील झाले. बालियान यांच्या मते, येथे नॉर्मल आणि सिजेरीयन दोन्ही प्रकारच्या प्रसुतीच्या सुविधा आहेत, त्यासाठी येणारा खर्च ८ ते १२ हजार रुपये असतो. मात्र, शुक्रवारी मुलींनी जन्म घेतल्यानंतर आम्ही या सुविधा मोफत देतो. बालियान सांगतात की, मुलींच्या आई- वडिलांना यामुळे खूप मदत देखील मिळते.

इतकेच नव्हे तर, मेरठ आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात रुग्णालयाच्या या योजनेची खूप प्रशंसा होत आहे. शुक्रवारी जन्म घेणा-या एका मुलीच्या आई- वडिलांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, या योजनेमुळे आम्हाला खूप मदत मिळाली. मुलीच्या जन्मामुळे आम्हाला येणारा खर्च वाचला आणि सर्व सुविधा मोफत मिळाल्या.

रुग्णालयाचे संस्थापक बालियान यांच्या मते, शुक्रवारचा दिवस केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर, मुसलमान लोकांसाठी देखील खूप महत्वाचा असतो. अशातच या दिवसाला जन्माला येणा-या सर्व मुलींसाठी रुग्णालयाचा सर्व खर्च माफ असणे, ही आमच्याकडून त्यांच्या आई- वडिलांसाठी एक भेट असते. बालियान यांच्या मते, जेव्हा सरकार मुलींना पुढे वाढविण्यासाठी इतके प्रयत्न करत आहे, तेव्हा आम्हाला देखील आपल्या समाजासाठी अशी काही पावले उचलली पाहिजेत, जे पुढे जाऊन सकारात्मक प्रभाव टाकतील.

या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी देखील हा एक नवा अनुभव आहे. याआधी ते जेथे काम करायचे, तेथे अशी कोणती व्यवस्था नव्हती की, मुलींनी जन्म घेतल्यावर रुग्णालयातील सर्व खर्च आई- वडिलांसाठी मोफत असतील. परंतु जेव्हा रुग्णालयाचे मालक प्रमोद बालियान यांनी या योजनेबाबत त्यांना सांगितले तेव्हा, त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, त्यांचे हे पाउल समाजासाठी कसे सकारात्मक ठरु शकते, याबाबत जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी यासाठी आपली सहमती दर्शवली. मेरठच्या ‘दयावती रूग्णालया’मार्फत उचलण्यात आलेल्या या पावलाने समाजात जाणा-या सकारात्मक संदेशासाठी ‘युवर स्टोरी’ रुग्णालयाच्या या योजनेची प्रशंसा करते. आणि आम्ही रुग्णालयाच्या या योजनेला आपल्या ‘युवर स्टोरी’ च्या माध्यमातून आपल्या वाचकांमध्ये पोहोचविण्याचा चांगल्यात चांगला प्रयत्न करू.

यासारख्या आणखी काही सामाजिक सामाजिक हित जपणाऱ्या कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. खालील लिंकवर क्लिक करा.

चिकित्सासेवा घरोघर पोहोचवणारे ‘हेल्प मी डॉक्टर’!

'बेबीबॉक्स' म्हणजे आपल्या बाळाची संपूर्ण काळजी

गृहिणींच्या कलेला ऑनलाईन व्यासपीठ मिळवून देणारं ‘मॉम्जबिझ’

लेखक : निरज सिंह

अनुवाद : किशोर आपटे.