शक्तीची विविध रूपे एकाच विदुषीत : खेळाडू, डॉक्टर, उद्योजिका अन्‌... काय काय अनू वैद्यनाथन!

0

एक कथालेखक म्हणून मला माझे काम आवडते. गेल्या काही दिवसांत कितीतरी कथा माझ्या हृदयाचा ठाव घेऊन गेल्या. पण ही कथा त्या सर्व कथांमध्ये सगळ्यात भारी… लई भारी!

तुम्ही त्यांना ॲथेलिट म्हणू शकता, उद्योजिका म्हणू शकता, डॉक्टर म्हणू शकता, प्राध्यापिका म्हणू शकता. आणि हो त्यांच्या खांद्यांवर मुलगी, पत्नी आणि बहीण हे ‘टॅग’ही फारच शोभून दिसतात…

शब्दांचा पसारा फार वाढवून सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींना कमी शब्दांत मांडायचे तर ती मांडणी म्हणजेच ‘अनू वैद्यनाथन’…

खरोखर एक विदुषी… शक्तीची विविध रूपे असतात… ती सर्वच जणू या विदुषीत सामावलेली…


खेळाडू अनू

भारतातच प्रशिक्षण सुरू असताना ‘आयर्नमॅन ट्रायथेलॉन’ पूर्ण करणारी पहिली महिला म्हणून अनूची ओळख झाली. ट्रायथेलॉन हा धैर्याची कसोटी पाहणारा खेळ आहे. तिन खेळांचे ते मिश्रण आहे. ३.८ किमि जलतरण, १८० किमि बाइकिंग आणि ४२.२ किमि धावणे असे सगळे त्यात समाविष्ट आहे. अत्यंत उत्तम खेळाचे प्रदर्शन अनूने केले आणि त्या ‘हाफ आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप’स्पर्धेसाठी निवडल्या गेल्या. या जागतिक स्पर्धेसाठी ‘क्वालिफाय’ करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. ‘अल्ट्रामॅन डिस्टेंस इव्हेंट’ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या आशियन महिला ठरल्या.

अनू लहानपणापासूनच खेळा तरबेज होत्या. बंगळुरूतील बसवेश्वरनगरात त्यांचे घर. इथून मल्लेश्वरमपर्यंत ७ किमि अंतर त्या सायकलीने कापत. उन्हाळ्याच्या सुटीत तमिळनाडूतील मूळ गावी त्यांच्या जलतरणाला सुरवात झाली. घराजवळील हौदात त्या पोहत असत. कॉलेजात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत असताना धावणे सुरू झाले.

जे जे म्हणून अनू यांनी मिळवले, त्यामागे सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच की त्या कायम स्वत:च स्वत:ला प्रोत्साहन देत आल्या. आपल्या आवडीनुसार खेळत गेल्या. खेळ चांगला होतो, की नाही, कसोटीला उतरतो, की नाही, याची पर्वा त्यांनी कधीही केली नाही.

अनू सांगतात, ‘‘माझे बालपण चारचौघींसारखेच गेले. आई-वडील कष्टाळू होते. बालपणी मी अभ्यासू होते, पण तेव्हाही प्रथम श्रेणी वगैरे अशी परवा मी कधी केली नाही. पण माझी अभ्यासाची तऱ्हाच अशी काही होती, की मला कशात गती आहे, हे कळे. इंजिनिअरिंगची निवड यातूनच केली. डॉक्टरेट मिळवण्यासाठी हाच विषय घेतला. ॲअॅथलिट बनण्याचा माझा निर्णय हे सगळे योग्यच ठरले.’’ मोकळ्या आकांक्षा आणि मजबूत मूल्य यांचे मिश्रण अनू यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेले आहे. अनू नम्रपणे म्हणतात त्या सुपर वुमेन वगैरे नाहीत.

‘‘मी पीएचडी आणि खेळ हे दोन्ही एकाचवेळी केले. हे काही कुण्या मातब्बर व्यावसायिकाचे लक्षण नाही. एका वेळी तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे तरच न्याय देऊ शकता, पण नाही. मी दोन्ही गोष्टी केल्या. अर्थात दोन्ही मन लावून केल्या. प्रत्येक दिवशी मला हे ठाऊक असे की मला आज नेमके काय करायचे आहे. विनाअट, विनातक्रार मी ते करत आले. मला वाटते कुठलेही काम असो, ते करण्याच्या पद्धतीबद्दल तुमची क्रमवारी ठरलेली असावी. कधी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, ते सुनिश्चित झालेले असावे.’’

‘टायमेक्स’ने त्यांचे प्रायोजकत्व स्वीकारलेले आहे. अनू सांगतात, ‘‘मी त्यांच्यासोबतच टायअप करते, जे मला काही देऊ शकतात आणि माझ्याकडून काही मिळवू शकतात. जेणेकरून मला मी कुणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे, असे जाणवता कामा नये.’’ तुम्ही वैयक्तिक पातळीवर काही करू इच्छित असला तर त्यासाठीचे रस्तेही तुम्ही शोधूनच घेता. खरं म्हणजे तुम्ही बाहेरून आपल्याला मदत मिळेल, ही आशाच करायला नको. मेहनत करत राहायची बस. प्रसिद्धी, पैसा, मदत हे सगळे नंतर आपोआप मिळायला लागते. अनेक तरुण-तरुणी मला उद्देशून जेव्हा लिहितात, की मी त्यांच्यासाठी प्रेरणादायक आहे, तेव्हा मला खरोखर स्वत:बद्दल अभिमान वाटतो. माझ्या कथेतून त्यांना मदत मिळत असेल तर ही खरोखर माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.’’

‘ट्रायथेलॉन’ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात अनू सांगतात, ‘‘हा खेळ सातत्याने मी स्वत: खेळते आहे. आणि या माध्यमातून या खेळासंदर्भात लोकांना जागरूक करतेच आहे. आता मला या खेळात एकदम काही सामाजिक क्रांती वगैरे घडवून आणायची नाही. प्रशिक्षण केंद्र वगैरे सुरू करण्यापेक्षा मी या खेळाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या घटकांवर अधिक लक्ष देऊ इच्छिते. जागरूकता निर्माण करणारे लोक घडवू इच्छिते.’’

उद्योजक अनू

अनू या बंगळुरू येथील बौद्धिक संपदा प्रतिष्ठान ‘PatNMarks’ च्या संस्थापिका आहेत. २००१ मध्ये अनू यांनी हे प्रतिष्ठान सुरू केले. अनू म्हणतात, ‘‘जीवन छान आहे, पण बाजार कठीण आहे. व्यवसायाच्या प्रारंभिक काळात बौद्धिक संपदा काय भानगड आहे, हे लोकांना नेमके पटवून देणे म्हणजे आमच्यासाठी आभाळ पेलण्यासारखेच होते. फार अवघड गेले हे सगळे. पण आताचे संशोधक जरा बऱ्यापैकी असतात. समंजस आणि मेहनतीही असतात. ‘PatNMarks’ च्या बंगळुरू, चेन्नई आणि ऑस्टिन कार्यालयांत मिळून बारा लोकांचा चमू आहे.

अनू म्हणतात खेळ आणि PatNMarks मध्ये सारखेच नियम लागू होतात. शिस्त तर यात हवीच. खेळात तुम्हाला वारंवार उत्तम प्रदर्शन करावे लागते. धंद्याचेही तसेच आहे. तिन वर्षे तुम्ही कष्ट करता तेव्हा थोडा निधी हाती येतो. खेळातही तुम्हाला उर्जा साठवण्यासाठी सतत सराव करावा लागतो.’’

व्यवसायाच्या या क्षेत्रात अनू यांचा प्रवेश आई-वडिलांमुळे झाला. अनू यांच्या मातोश्री अलामेलू वैद्यनाथन या केंद्र शासनाच्या ‘पेटंट ॲटर्नी’ कार्यालयात दुय्यम निबंधक होत्या. अत्यंत विपरित परिस्थितीचा सामना करत अलामेलू या पदापर्यंत पोहोचल्या होत्या, त्याचा अनू यांना रास्त अभिमान आहे.

अनू आपल्या व्यवसायातील ‘बिझनेस डेव्हलपमेंट’ आणि ‘कस्टरम रिलेशन’ या बाजू सांभाळतात. कामात घालवलेल्या तासांपेक्षाही कामातील गुणवत्ता अनू यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे.

... आणि अनू

इतके सारे मिळवल्याउपर अनू अत्यंत साध्यासरळ आहेत. त्यांचे वागणे अगदी सामान्य आहे. अनू म्हणतात, ‘‘खेळ आणि उद्योगापेक्षाही सुरक्षित रस्ते आणि महिलांचा आदर या दोन गोष्टी देशासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. उद्योग व्यवसाय जो आहे तोच आहे. त्याला तसेच समजावेही. तुमच्यात धाडस असेल तर चांगली उत्पादने काढा. नफा कमवा. नाही जमले तर दुसरी योजना तुमच्याकडे तयार असली पाहिजे. दुसरे काम करा.’’

घरात आपला जास्तीत जास्त वेळ वाचन आणि स्वयंपाकात घालवणाऱ्यांना अनू सांगतात, ‘‘आमच्यासारख्या मध्यमवर्गातून येणाऱ्या लोकांनी स्वत:साठी भाकरीची व्यवस्था आधी करायला हवी. जीवनात जे तुम्हाला हवे आहे, तेही मिळवावे लागेलच. नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दोन हात दूरच राहिलेले बरे. टीव्हीचा गोंगाट आणि नकारात्मकता मी माझ्या घरात फिरकू देत नाही.’’

अनूची आई...

ही कथा अनू यांच्या मातोश्रींशी बोलल्याशिवाय संपायचीच नाही. अलामेलू वैद्यनाथन यांना आपल्या लेकीचे नुसते कौतुकच नाही तर अभिमानही आहे. अलामेलू म्हणतात, ‘‘अनू तिच्या वडिलांप्रमाणेच दिवसभर कामात व्यग्र असते.जीवनात तिला काय हवे आहे आणि काय नको आहे, याबद्दल ती कमालीची स्पष्ट आहे. मला नेहमी तिच्यासंदर्भात वाटायचे, की पुरुषांना कमी न लेखणारा स्वतंत्र असा स्त्रीवादी दृष्टिकोन तिच्या ठायी सदैव असावा. आणि तसा तो तिच्या ठायी आहे. अनूने जे काही मिळवले आहे, ते तिच्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले आहे. मला खेळातले काही कळत नाही. मी तिला काय मार्गदर्शन करणार? मला हे समजायलाही खूप वर्षे लागली, की माझ्या लेकीने खेळाडू म्हणून मिळवलेले यश किती दैदिप्यमान आहे म्हणून…’’

Related Stories