भारतानंतर, आता ऑस्ट्रेलियाने भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी शंभर डॉलर्सच्या नोटबंदीची केली तयारी!

0


भारतापासून धडा घेत,ऑस्ट्रेलायनेही त्यांच्या १०० डॉलर्स किमतीच्या नोटांना रामराम करायचे ठरवले आहे. हा देश त्यांच्या सर्वाधिक मुल्य असलेल्या चलनी नोटा बंद करण्याचा विचार करत आहे. त्यातून सरकारला त्यांच्या करचोरांना उघडे पाडता येणार असून भ्रष्टाचाराला आळा घालता येणार आहे.

ऑस्ट्लियाचे महसूल आणि आर्थिकसेवा मंत्री केली ओडायर यांनी सांगितले की, या सा-या मोहिमेचा हेतू हा असेल की, काळी अर्थव्यवस्था समाप्त करणे आणि करपध्दती मधील पळवाटा बंद करणे. त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे पाच डॉलरच्या नोटांच्या प्रमाणात शंभर डॉलरच्या नोटांचे प्रमाण तिपटीने कसे वाढले आहे, सध्या त्यांच्याकडे ३०० दशलक्ष शंभर डॉलर्सच्या नोटा वापरात असून ९२ टक्के चलनी नोटा या ५० आणि शंभर डॉलर्स किमतीच्या आहेत. त्यामुळे देशातील ब-याच रोख व्यवहारातून करांची अदायगी होतच नाही. त्याचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.५टक्के इतके असावे असा अंदाज आहे.

युबीएस या स्विस अर्थविषयक कंपनीच्या सल्लागारांनी अलिकडेच ऑस्ट्लियाला त्यांच्या मोठ्या मुल्याच्या नोटांबंदी करण्याची शिफारस केली आहे. “जास्त मुल्यांच्या नोटांची बंदी करणे देशाच्या हिताचे राहिल त्यामुळे बँका आणि अर्थव्यवस्था दोन्ही सक्षम होण्यास मदत होणार आहे” असे युबीएसच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यामुळे छोट्या रकमा बँकेत जमा होण्यास मदत होणार असून त्यातून गुन्हेगारी स्वरुपाच्या कल्याणाच्या नावावर सुरू असलेल्या व्यवहारांना आळा बसेल, भारताने हजार आणि पाचशेच्या नोटांबदीचा निर्णय नुकताच घेतला. या सप्ताहात व्हेनेझुअला या देशानेही शंभर बोलीव्हर चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यातून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. 

सौजन्य : थिंक चेंज इंडिया