नवी मुंबईत ‘मंगलम फाऊंडेशन’ने कर्करोग रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवा-याची केली सोय!

0

कर्करोग, आणि त्यावरील उपचार या दोन्ही गोष्टी सारख्याच भयावह आहेत. हे उपचार खर्चिक देखील असतात. नवी मुंबईतील मंगलम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने यामध्ये काही प्रमाणात हा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. उपचार घेणारे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत निवारा देण्याची सेवा या संस्थेने केली आहे. 


या उपक्रमाचा भाग म्हणून, खारघर येथील सेक्टर २७मध्ये टाटा स्मृती रूग्णालय आणि संशोधन केंद्राच्या परिसरात संस्थेने १७ इमारती भाड्याने घेतल्या आहेत. त्यांचा उपयोग रूग्ण आणि त्यांच्या निकटवर्तीयांना राहण्यासाठी केला जातो. या रहिवाश्यांना दहा रूपयांत पोटभर जेवणाची सुविधा देखील देण्यात आली आहे.

चाळीस स्वयंसेवक असलेल्या या संस्थेची सुरूवात दहा वर्षापूर्वी झाली.या सा-यानी स्वत:च्या पैश्यातून ही संस्था उभारली आहे. त्यांच्या असे लक्षात आले की नवी मुंबईत उपचारांसाठी येणारे रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना राहण्याची सोय नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंगलम फाऊंडेशन चे नरेश गुप्ता म्हणाले की, “ आम्ही १७ सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या मोफत दिल्या जातात, शिवाय दहा रूपये खर्च करून जेवणाची सोय मिळावी यासाठी ती उपलब्ध करून दिली आहे, आम्हाला टाटा रूग्णालयाच्या जवळपास जागा हवी होती जी बांधकाम विकासकांनी भाड्याने देण्यासाठी स्वत:हून इच्छा व्यक्त केली.”

आता हा चमू नव्याने काही लोकांना जागा कशी देता येईल यासाठी काम करत आहे कारण सध्याच्या जागा पूर्ण भरल्या आहेत. याशिवाय रूग्णांना तसेच नातेवाईकांना ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुलभ आणि रास्त भावात कशी देता येईल यावर ते सध्या काम करत आहेत. परळ आणि तेथून पुन्हा निवासाच्या ठिकाणी अशी ही सेवा असेल.