देशातील पहिली उभयलिंगी विद्यार्थ्याची शाळा कोची येथे अस्तित्वात येत आहे!

0

केरळ राज्य मागील वर्षी बातम्यांमध्ये झळकले होते, ते भारतामधील पहिले तृतियपंथी लोकांसाठीचे धोरण जाहीर करण्याबाबत. यातून समाजातील अल्पसंख्य असलेल्या या समाजाच्या वर्गाला न्याय देण्याची कल्पना होती. या धोरणानुसार, “ तृतीयपंथी न्याय आयोगाची स्थापना करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी समान हक्क आणि संरक्षण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशिष्ट ओळखपत्रे देण्यात येणार आहेत”.

केरळ राज्यात आता देशातील पहिले तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठीचे विद्यालय कोची येथे सुरु करण्याचा निर्णय घेवून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. या शाळेचे नाव सहज इंटरनँशनल स्कूल असे असणार आहे. ३० डिंसेंबर रोजी प्रसिध्द तृतियपंथी चळवळीच्या कार्यकर्ता काल्की सुब्रमण्यम यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे.

तृतीयपंथीयाच्या हक्क चळवळीच्या वतीने कार्यकर्ता विजयराजा मल्लिका, माया मेनन आणि फैसल सी के यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेवून सांगितले की, दहा विद्यार्थ्याच्या पहिल्या चमूला प्रवेश दिला जात आहे. जे राष्ट्रीय खुल्या शिक्षण (ओपन स्कुल) धोरणांतर्गत शिक्षण घेतील.

याबाबतच्या वृत्ता नुसार, विजयराजा मल्लिका यांनी सांगितले की, “ शिक्षक आणि समाजसेवकांच्या एका गटाने त्यांच्या अध्यापनासाठी पुढाकार घेतला आहे. या शाळेचा हेतू त्यांना संरक्षण देणे आणि शोषणमुक्त करून समाजात सन्मानाने जगायला शिकवणे हा असेल. सुरुवातीला काही प्रायोजक आम्हाला मदत करत आहेत. आम्ही सरकारच्या वतीने कायमस्वरुपी मदत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत जेणे करून या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत होईल.”

या शाळेतील अभ्यासक्रम तयार करताना तो व्यावसायिक शिक्षणाच्या धर्तीवर तयार केला जात आहे, ज्यात कौशल्य विकास आणि शालेय अभ्यासक्रम जो दहाव्या-बाराव्या वर्गासाठी असतो त्या प्रकारे तयार केला जात आहे. सहा तृतियपंथी जे ट्रान्सइंडिया फाऊंडेशनसोबत काम करत आहेत यामध्ये पुढाकार घेत आहेत. विजयराजा हे ‘सनाथना’या संकल्पनेचे प्रमुख आहेत. हा प्रकल्प प्रामुख्याने दहाव्या वर्गापासून तृतियपंथीयांचे शाळाबाह्य होण्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तयार करण्यात येत आहे. विजयराजा याबाबत सांगतात की, “ कोची मेट्रो सारख्या काही संस्था देखील यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यातून तृतियपंथीयाना सन्मानाने नोक-या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा प्रामुख्याने आव्हान म्हणून पुढे येत आहे”. 

५० जागामालकांनी नकार दिल्याने त्यांना ही शाळा सुरु करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला आहे. परंतू एका ख्रिस्ती संस्थेने यासाठी होकार दिल्याने आणि जागा भाड्याने देण्याचे मान्य केल्याने हा उपक्रम आता सुरु होत आहे. 

सौजन्य - थिंक चेंज इंडिया