मुंबईच्या पाच रेल्वे स्थानकांवर केवळ एका रूपयांत उपचार करणारी क्लिनीक सुरू होत आहेत

0

येत्या दोन महिन्यात, मुंबईच्या पाच रेल्वे स्थानकांवर तातडीच्या उपचारांसाठी दवाखाने सुरू होत आहेत. येथे येणा-या रूग्णांना केवळ एका रूपयांत उपचार केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी मध्य रेल्वेने मोफत जागा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

ही पाच रेल्वे स्थानके आहेत, कुर्ला, घाटकोपर, मुलूंड, वडाळा, आणि दादर. या दवाखान्यात केवळ तातडीच्या उपचारांची तयारीच नसेल तर एमबीबीएस शिक्षण घेतेलेले डॉक्टर्स तेही चोविस तास असतील, त्यात ते नेहमीच्या आजारांवर उपचार करतील. येथे भेट देणारे डॉक्टर असतील ते मधुमेही बालरोग किंवा प्रसुतीबाबतच्या समस्यांचे निराकरण करू शकतील. यामध्ये चिकित्सालयाची सुविधा असेल आणि औषधेही सवलतीच्या दरात मिळतील.

याबाबत मध्येरेल्वेच्या ज्येष्ठ अधिका-यानी चॅटद्वारे सांगितले की, “ तातडीच्या वैद्यकीय सुविधा केवळ एका रूपयात दिल्या जातील त्या पाच स्थानकावर सुरू करण्यात येत आहेत, यात आणखी १५ स्थानकांची भर लवकरच घातली जाणार आहे. हे काम येत्या दोन महिन्यात केले जाईल. सार्वजनिक खाजगी सहभागिता असलेल्या या उपक्रमात जीवन रक्षणाचे काम होणार आहे. मध्य रेल्वे त्यात जागा, पाणी आणि विजेचे योगदान देत आहे. तर उपकरणे लावण्याचे काम तसेच मानवी संसाधने खाजगी संस्थाच्या माध्यमातून उभारली जात आहेत.

डॉ राहूल घुले जे शहरातील डॉक्टर आहेत, त्यांच्या बंधू समवेत या उपक्रमाची संकल्पना राबवित आहेत, त्यांनी सांगितले की, “ आम्हाला जाणवले की रेल्वे स्थानकांच्या माध्यमातून शहरातील लाखो लोकांना सहजपणे हे उपचार देता येतील”.