मी ब-याचदा व्यवसायात अपयशी झालो, परंतू कधीच हार मानली नाही: मुकेश अंबानी

मी ब-याचदा व्यवसायात अपयशी झालो, परंतू कधीच हार मानली नाही: मुकेश अंबानी

Friday February 24, 2017,

2 min Read

“तुमच्या गुंतवणूकदारांचा पैसा तुमच्या स्वत:च्या पैश्यांपेक्षा जास्त काळजीपूर्वक खर्च करा. आणि दुसरे म्हणजे तुम्ही योग्य माणसांच्या शिवाय चांगले काम करूच शकणार नाही, या दोन गोष्टींशी मी कधीच तडजोड करत नाही.” मुकेश अंबानी म्हणाले. जगातील सर्वात मोठ्या रिलायन्स जीओ स्टार्टअपचे मालक, नॅसकॉम लिडरशिप फोरम, मुंबई येथे ते बोलत होते.


Mukesh Ambani

Mukesh Ambani


व्यावसायिक जीवनात कोणत्या उपाययोजना त्यांच्या कामी आल्या ज्यामुळे ते कॉर्पोरेट जगताचे नेते झाले याबाबत त्यांचे अनुभव सांगताना अंबानी म्हणाले की, ते त्यांच्या जीवनात पहिला धडा शिकले तो त्यांच्या वडीलांकडून, स्व. धीरूभाई अंबानी यांच्याकडूनच. रिलायन्स समूहाचे संस्थापक.

“उद्योजकतेचा पहिला धडा माझ्या वडिलांकडून मला शिकविण्यात आला, तो मी अमेरिकेतून परत आलो त्यावेळी. मी त्यांना माझ्या जबाबदा-या आणि िभूमिकांबाबत विचारणा केली आणि माझ्या कामाबाबतही, आणि त्यांनी मला सांगितले की, जर मला काही काम करायचे असेल तर मी व्यवस्थापकाचे काम करावे. उद्योजकाला मोठे होण्यासाठी काय करावे याचे भान असावे लागते,” अंबानी म्हणाले की, माझ्या वडीलांनी हेच सांगितले होते.

एका वृत्तानुसार आरआयएल, प्रमुखांनी नमूद केले की, उद्योजकाला सर्वात आधी येणा-या संकट आणि समस्या कोणत्या याचा विचार केला पाहिजे. “ त्याने प्रश्न सोडवायचे नसतात, तर शोधून काढायचे असतात.एकदा प्रश्न तुम्हाला सापडला की, तुम्ही तो सोडवू शकता”.

त्या सोबंतच, अंबानी म्हणाले, की एखादा प्रश्न सोडविताना समाजाचा काय लाभ होतो ही पहिली उपलब्धी आणि व्यावसायिक आर्थिक फायदा काय होतो आहे ही दुय्यम बाब आहे. “तिसरी गोष्ट मी शिकलो, आणि त्यातून आम्ही संस्थात्मकपणे आरआयएल चालवितो. त्यातून तुमचे सामाजिक मूल्य तयार होते.”

“ तुम्हाला प्रश्न सोडविताना त्यातून काहीतरी चांगले निर्माण करता आले पाहिजे, त्यात तसा हेतू आणि आर्थिक परतावा या दुय्यम गोष्टी असल्या तरी चालतील. तुम्ही केवळ किती पैसा मिळतो यावर लक्ष दिले, शक्यता आहे की तुम्ही खरोखर मोठे होण्याची संधी गमावू शकता आणि तुमच्या पध्दतीने प्रश्न सोडवू शकता,” त्यांनी पुढे सांगितले.

या उद्योजकाने अनेक अपयशे पचविली आणि ते व्यक्तिश: अनेकदा यश मिळण्यापूर्वी अपयशी झाले आहेत. अपयशाने कधी खचून गेले नाहीत, त्यातून शिकले, परंतू कधीच हार मानले नाहीत. 

व्यवसायासाठी योग्य माणसे निवडण्याबाबत सांगतानाच, त्यांनी स्पष्ट केले की, “ हे फारच महत्वाचे आहे की, झोकून देवून तुमच्या स्वप्नातल्या उद्देशांसाठी काम करणारे लोक मिळणे फार महत्वाचे असते. आणि शेवटी उद्योजकाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, तो संधी साधू असला पाहिजे. येथे तुमच्या आजुबाजूला विचित्र आणि नकारात्मक लोक खूप असू शकतात, पण उद्योजकाने त्या स्थितीतही सकारात्मकता पसरवली पाहिजे.”

 - थिंक चेंज इंडिया