नोटबंदी आणि वस्तू-सेवा कायद्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र पालटेल : वित्तमंत्री अरुण जेटली

नोटबंदी आणि वस्तू-सेवा कायद्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र पालटेल : वित्तमंत्री अरुण जेटली

Saturday December 03, 2016,

2 min Read

देशाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, नोटबंदी आणि जीएसटी कर प्रणालीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणार आहे. सरकार एक एप्रिल पासून देशात जीएसटी करप्रणाली लागू करणार आहे. ते म्हणाले की, “ जीएसटी आणि नोटबंदी दोन्ही निर्णय खेळाचा नूर बदलणारे असतील, जीएसटीमुळे सरकारी महसूलात वाढ होणार आहे, त्याचप्रमाणे राज्यांच्या महसूलातही भर पडणार आहे. ही सक्षम करप्रणाली असेल, त्यातून त्रुटी दूर होणार आहेत. या प्रणालीमुळे ओडिशा सारख्या कमी खप असलेल्या राज्यांनाही फायदा होईल.” जेटली मेक इनओडिशा या कार्यक्रमात बोलत होते.

नोटबंदीच्या निर्णयाने उडालेल्या गोंधळाबाबत वित्तमंत्री म्हणाले की, “ चलनातील बदलाबाबतची प्रक्रिया जशी पूर्ण होईल,अर्थव्यवस्था गतिमान होणार आहे. त्याचा परिणाम सकल राष्ट्रीय उत्पन्नात झालेल्या वाढीत होणार आहे, त्याशिवाय कर आधारही वाढेल”.

image


वित्तमंत्री म्हणाले की, “बँकेत जमा झालेल्या रकमेच्या माध्यमातून निधीमध्ये वाढ होईल, त्यातून अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे.” ते म्हणाले की सध्याच्या काळात सरकारसमोर काही आव्हाने जरूर आहेत मात्र त्यात भविष्यातील फायदे दडले आहेत. जीएसटीमुळे होणा-या परिणामाबाबत ते म्हणाले की, अनौपचारिक अर्थव्यवस्थेकधून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा हा बदल असून त्यातून महसूलात वाढ लवकरच दिसून येईल. त्यातून करप्रणाली देखील सुधारेल असे ते म्हणाले.

जेटली यांनी यावेळी ओडिशा राज्याच्या पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रातअधिक काम करण्याची गरज आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला या बाबतच्या कार्यक्रमाचे केंद्र म्हणून विकसीत करून नव्या विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमा मुळे फायदा होणार आहे.

ओडिशांच्या मेक इन ओडिशा या मोहिमेला केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करत असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या ९ टक्के विकासाच्या दराचे कौतूक करत ते म्हणाले की, राज्याच्या सक्षम साधन संपदांच्या बळावर आणखी मोठा विकास करणे शक्य आहे. गरीबी आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या ही आव्हानेअसल्याचे सांगून ते म्हणाले की, खनिज संपदा ही राज्याचे वैभव आहे. याशिवाय राज्याच्या विस्तिर्ण समुद्र किना-याचाही त्यांना फायदा करून घेता येईलअसे ते म्हणाले. ते म्हणाले की गरीबी दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे, राज्याचा विकास दर वेगाने वाढत आहे तर गरीबीचा स्तर घसरत आहे, राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.