सफाई मोहिमेद्वारे जनजागृती दिल्ली विद्यापीठाचे कार्य

0

भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मागील वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी २ ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत’ या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेला हातभार लावण्यासाठी आपल्या परीने अनेकजण प्रयत्नशील आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या भगतसिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी हिमाद्रीश सुवान आणि हर्ष प्रताप यांनी ही योजना राबविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न केला. या दोघांनी प्रथमता आपल्या कॉलेज मध्ये ‘कँपस ची स्वच्छता’ या उपक्रमास सुरुवात केली. हिमाद्रीश राजकीय शास्त्राच्या व हर्ष बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षीचा विद्यार्थी आहेत.


हिमाद्रीश सांगतो की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत या अभियानाबरोबरच आम्ही आपल्या ‘कँपस ची स्वच्छता’ या अभियानाची सुरवात केली. बघता बघता संपूर्ण कॉलेज या अभियानात सहभागी झाल्यामुळे त्याचा परिणाम कॉलेज च्या आवारात दिसू लागला. विद्यार्थी कचरा पूर्णपणे कचराकुंडीतच टाकू लागले. शिक्षकांनी सुद्धा इतरत्र थुंकण्यासारख्या सवयी बदलल्या या अभियानाने लोकांची मानसिकता बदलली व अस्वच्छतेबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण होऊ लागली, जे या पूर्वी घडत नव्हते.


या नंतर आमच्या मनातल्या कल्पनेने दिल्लीच्या इतर महाविद्यालयांना सुद्धा या योजनेत सामील करून घेतले या विचारांनीच आमच्या ‘कँपस ची स्वच्छता’ या मोहिमेची सुरवात झाली. हिमाद्रीश ने युअर स्टोरी शी बोलतांना सागितले की आम्ही सुरवातीला इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांना भेटून या विषयी माहिती दिली, त्यांनी आमच्या योजनेला प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेत सामील करून घेतले’. यात आम्हाला अनपेक्षित यश मिळाले. या योजने अंतर्गत ‘कँपस ची स्वच्छता’ या अभियानाची टीम वेगवेगळ्या कॉलेज चा दौरा करून अभियानाची रूपरेषा ठरवायचे. त्या नंतर सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून या अभियानात सामील करायचे व अभियानाची सफलता वाढवायची.


हिमाद्रीश ने सांगितले की,’सर्व कॉलेज च्या यशस्वी सहभागाने दिल्लीतल्या अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी पत्राद्वारे या योजनेत सहभागी होण्यासाठी कळविले. आमच्या सोबत गुरुगोविंद इंद्रप्रस्थ विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, आंबेडकर विद्यापीठ इ.च्या सहभागाने विद्यार्थ्यांनी सुरु केलेले हे सर्वात मोठे अभियान आहे.

विद्यापीठाच्या बाहेर पण अभियान

‘कँपस ची स्वच्छता’ हे अभियान जरी कॉलेज पासून सुरु झाले असले तरी नंतर ते कॉलेज व विद्यापीठांच्या चारभिंती पार करून आता जन सामान्या पर्यंत पोहचले आहे. हे अभियान आता दिल्ली नगर निगम, भारतीय रेल्वे व इतर सरकारी कार्यालयांना बरोबर घेऊन नागरिकांना सफाईचे महत्व पटवून देत आहे.


हिमाद्रीश पुढे सांगतो की, आम्ही निगमच्या साहाय्याने सुट्टीच्या दिवशी शहराच्या विविध भागात स्वच्छते विषयी जण जागृतीचे काम करतो. या मध्ये आम्हास दिल्लीच्या सेव्हर्स नावाच्या विद्यार्थांचा एक गट पण मदत करतो. दिल्ली सेव्हर्सचे सदस्य जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करतात. हिमाद्रीशच्या म्हणण्याप्रमाणे देशातील सर्व ७५७ विद्यापीठांमध्ये ही योजना राबविली पाहिजे. या योजनेची सुरवात जरी दिल्लीतून झाली असली तरी इतर राज्यामध्ये सुद्धा हे अभियान पोहचले पाहिजे. आम्ही लवकरात लवकर हे लक्ष पार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘कँपस ची स्वच्छता’ या अभियानाची सुरवात करणारे हिमाद्रीश हे भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, इतर राज्यांचे राज्यपाल,मुख्यमंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, कुलगुरू इ.च्या प्रशंसेस पात्र ठरले आहेत.