१७ शस्त्रक्रियांनंतर या अॅसिडहल्ला पिडितेला एका राँग नंबरने मिळवून दिला जीवनाचा आनंद

0

आता त्या घटनेला पाच वर्ष झाली जेंव्हा भयानक अॅसिड हल्ल्यात २६ वर्षांच्या ललिता बेन बन्सी यांना उध्दस्त होण्याची वेळ आली, मात्र आज त्या आनंदी महिला म्हणून जीवनाची नवू सुरूवात करत आहेत. सन २०१२मध्ये त्यांच्या नातलगाने किरकोळ भांडणातून त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यांच्या चेह-यांचा महत्वाचा भाग जळाला, त्यासाठी त्यांना १७ वेळा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या त्यातून शेवटी त्यांना काही प्रमाणात इलाज झाला.“ अनेकदा शस्त्रक्रिया केल्याने माझ्या चेह-याची ठेवण बदलली, मला बदल करावे लागले मी आझमगढ येथून कळवा जे मुंबई नजिक ठाणे येथे आहे तेथे आले. चमत्कार घडत असतात – कुणाला माहित होते की अॅसिड हल्ला होईल आणि १७ शस्त्रक्रिया केल्यावर मला माझे प्रेम गवसेल, पण हे झाले आहे. आणि हे सारे एका राँग  नंबरमुळे झाले आहे”.


ही परिकथा जिची सुरूवात एका राँग नंबरने होते आज बहुचर्चित कहाणी झाली आहे जी नात्यांचे भावबंध उलगडत जाते. राहुल कुमारनं चुकून केलेल्या एका फोन कॉलमुळे ललिताचं आयुष्यच बदललंय. त्यानं राँग नंबर डायल केलेला खरा, मात्र तो लागला एकदम राईट. या फोननंतर दोघांमध्ये ओळख झाली.  ललिता या एका कॉलनंतर २७ वर्षांच्या रविशंकर यांना भेटल्या आणि त्याना जाणवले की, त्यांच्यात दोघांत त्यापुढचे काही ऋणानुबंध जुळलेत आणि मग त्यांनी ठाणे येथे नोंदणी पध्दतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. राहुल यांनीच मला प्रेमावर विश्वास करायला शिकवले, ही नवी सुरूवात आहे” ललिता म्हणाल्या.

एका मुलाखती दरम्यान या वराने सांगितले की, “ मला ती सुरूवातीपासूनच आवडली, ललिताच्या चेह-यावर नाही तर मनावर प्रेम असल्याचं सांगत त्यानं तिला मागणी घातली. मला केवळ माझ्या आईला माझ्या पसंतीने लग्न करण्यासाठी राजी करावे लागले. मला वाटते ललिताला देखील चांगले जीवन जगण्याचा अधिकार मिळायला हवा. जे काही झाले ते तो काळाचा प्रभाव होता. मी सुंदर लोकांना लग्नानंतर काही काळाने दूर जाताना पाहीले आहे, मी नेहमीच इतरांच्या पेक्षा काही वेगळे करण्याचा विचार केला.”राहुल खाजगी संस्थेत कांदीवली येथे सीसीटिव्ही ऑपरेटर म्हणून काम करतात, या शिवाय रांची झारखंड येथे त्यांचा मालकीचा पेट्रोलपंप देखील आहे.“आम्ही मुंबईत रहायचे की झारखंडला स्थायिक व्हावे याचा निर्णय ललिताला काय हवे त्यावर घेणार आहोत”

अभिनेता विवेक ओबेरॉय ज्यांनी ललिता यांची कार्यक्रमा दरम्यान भेट घेतली. त्यांना ठाण्यात रहायला घर भेट दिले आणि भविष्यात त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली.