४०० टीम्स, ६० देशांचे स्पर्धक आणि 'टेक्नोव्हेशन चॅलेंज' विजेत्या ठरल्या बंगळुरूच्या १४ वर्षीय ५ विद्यार्थीनी

0

पाच मुली, ४०० टीम्स, ६० देश आणि एकमेव विजेता. बंगळुरूच्या पाच मुलींनी नुकताच सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक्नोव्हेशन चॅलेंज’ जिंकून जगात भारताचा सन्मान वाढवला आहे.

‘टेक्नोव्हेशन’ हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरूण महिलांसाठी एक जागतिक उद्योजकता कार्यक्रम आहे. संपूर्ण जगातील मुलींना कोडिंगची माहिती उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्यामध्ये उद्योजकतेचे गुण विकसित करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.


आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारे ( इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन) चालवली जाणारी ‘वी टेक’ ( वीमेन इन्हेसिंग टेक्नॉलॉजी) भारतात उच्च माध्यमिक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणा-या मुलींसाठी विद्यालय मार्फत एक विशेष कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमाअंतर्गत या मुलींना मोबाईल अॅप्लीकेशन तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना टेक्नोव्हेशनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर प्रस्तुत करणे देखील शिकवले जाते.

ही जागतिक स्पर्धा तीन फे-यांमध्ये आयोजित केली जाते. या वर्षी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ६० देशांच्या संघांव्यतिरिक्त एकूण ४०० जागतिक स्तरावरील संघांनी भाग घेण्यासाठी नोंदणी केली. आणि मग उपांत्य फेरीत पोहोचलेल्या २५ संघांपैकी १० संघ 'सॅन फ्रॅन्सिस्को'त आयोजित झालेल्या अंतिम फेरीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या. भारतासाठी हा एक गौरव होता. कारण पहिल्यांदाच एक भारतीय संघ युरोपीय आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांना मात देत हे स्थान मिळवण्यात यशस्वी झाला.

महिमा,नव्यश्री, स्वास्ती, संजना आणि अनुपमा या पाचजणी बंगळुरूच्या 'न्यू हॉरिझन पब्लिक स्कूल'मध्ये नवव्या इयत्तेत शिकणा-या विद्यार्थीनी आहेत. या सर्व मुली केवळ १४ वर्षे वयाच्या आहेत. त्या स्वत:ला 'Team Pentechans' असे म्हणवतात.

त्यांनी निर्माण केलेल्या अॅप्लिकेशनला ‘सेलिक्सो’ ( Sellixo) असे नाव देण्यात आले आहे. याबाबत त्या म्हणतात, “ ‘सिलिस्को’ आपल्या वापरकर्त्याला दोन फायदे मिळवून देतो. एक म्हणजे त्या कच-यामधून उत्पन्न मिळवून देतो आणि दुसरा म्हणजे सुटका मिळवून देतो. हे फायदे मिळावेत म्हणून ‘सिलिस्को’ एक अतिशय सुलभ असा बाजार उपलब्ध करून देण्याचे काम करतो. शिवाय सुक्या कच-याच्या उत्पादकांना ग्राहकांशी जोडणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आता ग्राहक इतर वस्तुंप्रमाणे सुका कचरा देखील सहजपणे खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो. खरेदीदारांच्या रूपात स्थानिक दुकानदार, अपार्टमेंट्स, परिसर, पार्टी हॉल, तसेच रद्दी कागद इत्यादींच्या खरेदीदारांना आणि या वस्तूंचा पुनर्वापर करणारांना हे व्यासपीठ लक्ष्य करते. ‘सेलिक्सो’ भारतासारख्या देशांमध्ये सुक्या कच-याच्या निपटा-यासाठी एक प्रभावी उपाय उपलब्ध करण्याव्यतिरिक्त रद्दीवाले आणि पुनर्वापर करणारांवर देखील अंकुश ठेवण्याचे काम करतो.”

या मुलींनी हाच मुद्दा उचलला. कारण कच-याची विल्हेवाट लावणे ही केवळ भारताचीच समस्या नसून ती संपूर्ण जगाची, विकसनशील अर्थव्यवस्थेची एक व्यापक आणि सध्याची सतावणारी समस्या आहे. या व्यतिरिक्त या मुली भारताच्या पंतप्रधानांद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाने देखील प्रेरित झाल्या.

‘युवर स्टोरी’ने देशाचे नाव उज्ज्वल करणा-या या मुलींकडून त्यांच्या 'सिलिकॉन व्हॅली'तील अनुभवांविषयी जाणून घेतले. याबरोबर त्यांच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अर्थ काय आहे आणि त्या आत्तापासून काही वर्षानंतर स्वत:ला कुठे पाहू इच्छितात याबाबत जाणून घेण्याच्या उद्देशानेही ‘युवर स्टोरी’ने त्यांच्याशी चर्चा केली:


महिमा महेंडले

तंत्रज्ञान हा एक सतत प्रगती करत राहणारा अद्भूत आणि रोमांचक असा शोध आहे. तंत्रज्ञान समाजाच्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यात मदत करत जगाला बदलू शकतो.

“ सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये आम्ही परिक्षक आणि दर्शकांसमोर आमचे हे विचार ठेवले. शिवाय आमच्या अपची थीम आणि उपाय दर्शवणारे पोस्टर्स सुद्धा आम्ही प्रदर्शित केले.

हा आम्हा सर्वांसाठी एक अद्वितीय आणि अद्भूत असा अनुभव होता. या अनुभवाने आम्हाला एक टीम म्हणून काम कसे करावे हे शिकवले. शिवाय एक टीमच्या स्वरूपात आम्ही आमच्यातील क्षमतांचा चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे ही या अनुभवाने आम्हाला जाणून घेण्यात मदत केली. आम्ही जगभरातून आलेल्या लोकांना भेटणे, ट्विटर आणि अमेझन सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांना भेटी देण्यात देखील यशस्वी झालो. या प्रक्रियेत आम्ही अतिशय मनोरंजक आणि उत्कृष्ट कार्यक्रमाचा भाग बनलो.”

संजना वसंथ

संजना विज्ञान, गणित आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन या विषयांची विद्यार्थिनी आहे.

तंत्रज्ञान तुमच्या स्वप्नांना जलद गतीने साकार करण्यात मदत करणारे एक व्यासपीठ आहे.

“ हा एक अतिशय सुंदर असा अनुभव होता. या अनुभवाने मला अनपेक्षित स्थितींसोबत लढण्यास शिकवले. या व्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कारकिर्दीचा विकास करण्याचा संकल्प मजबूत करण्याचे काम केले आहे. आम्ही तिथे जे काही पाहिले, जे काही समजून घेतले ते सर्व अद्भूत असे होते. या व्यतिरिक्त आम्ही जगातील काना- कोप-यातून आलेल्या विविध लोकांना भेटणे आणि आपल्या आई-वडिलांपासून दूर राहणेही शिकलो.

आता मी स्वत:ला महाविद्यालयाची एका विख्यात विद्यार्थीनीच्या रूपात पाहते. मी महाविद्यालयामध्ये संगणक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत आहे. आणि मला ‘सिलिक्सो’चा विकास करायचा आहे की नाही याबाबत मी मोठे निर्णय घेत आहे.”

नव्यश्री बी.

नव्यश्रीने कॉम्प्यूटर आणि विज्ञान हे विषय निवडले आहेत.

तंत्रज्ञान हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण असा भाग आहे. आम्ही सर्व कोणत्याना- कोणत्या स्वरूपात तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. तंत्रज्ञान आमचे भविष्य आहे आणि आम्हाला तथाकथित ‘अशक्य’ गोष्टी मिळवण्यासाठी त्याला विकसित करावे लागेल.


“आमच्या अॅप्लिकेशनचा मुख्य विचार आहे ‘जीवनाची प्रगती’ कऱणे. याच दृष्टीने आम्ही सॅन फ्रॅन्सिस्कोला गेलो होतो. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील व्यावसायीक आणि परिक्षकांसमोर असे करण्यात यशस्वी ठरलो. आमचे अॅप्लिकेशन सर्वोत्कृष्ट आहे हे त्यांना समजावण्यात आम्हाला यश मिळाले. त्या बदल्यात आमच्या एप ला १० हजार डॉलरची प्राथमिक गुंतवणूक प्राप्त झाली. व्यापाराच्या जगाची एक झलक दाखवण्याच्या दृष्टीने हा अनुभव माझ्यासाठी विशेष असा होता. मी तिथे बरेच काही शिकले. शिवाय शिकण्याबरोबर मी तिकडे भरपूर मौजमजा सुद्धा केली.

आमच्यासमोर काही तणावपूर्ण क्षण देखील आले. परंतु शेवटी आम्ही काळाच्या कसोटीवर खरे उतरलो. मी या अॅपला पुढे आणखी विकसित रुप देऊ इच्छिते. परंतु, या कारणामुळे मी माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ इच्छित नाही. मी कॉलेजला जाऊ इच्छिते, परंतु मी विषय कोणते निवडावे याबाबत मला अजूनही निर्णय करता आलेला नाही.”

स्वास्ती राव

गणित आणि संगणक स्वास्तीचे आवडते विषय आहेत.

"तंत्रज्ञान माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण यात निश्चित अशी उत्तरे नसतात. आज बाजारात आलेले मॉडेल्स येणा-या तीन महिन्यांच्या काळात संशोधन आणि सुधारणांच्या टप्प्यातून जातील. या कारणामुळे आपण बनवलेल्या उत्पादनाला अंतिम म्हटले जावू शकत नाही. अशा स्थितीत आपले उत्पादन काळाशी सुसंगत आणि अधिक चांगले बनवण्यासाठी आपल्याला सतत काम करावे लागते. यासाठी त्या उत्पादनात आपल्याला नवे आणि रोमांचक असे फिचर्स जोडण्याबरोबर अधिक प्रभावशाली मूल्य ठरवण्याची रणनीती आणि व्यापाराच्या मॉडेलचा अंगीकार करावा लागतो. आपल्याला आपल्या आवडीचे काम करत पैसा सुद्धा मिळतो आणि या कारणामुळेसुद्धा मला तंत्रज्ञान खूप आवडते. "


"‘टेक्नोव्हेशन’च्या अनुभवाची मला आणि माझ्या टिमच्या सहका-यांना आणखी जवळ आणण्यासाठी मदत झाली आहे. आता आम्ही एकमेकांची प्रतिभा आणि क्षमता काय आहे हे खूपच चांगल्या प्रकारे जाणतो. शिवाय काम करत असताना एकमेकांबद्दल मनात विश्वासाची भावना देखील असते. दोन टोके एकाहून चांगली असतात हे आता आम्हाला समजून चुकले आहे. या व्यतिरिक्त मी आणखी नवीन अशी माहिती मिळवताना खूपच रोमांचित आणि आश्चर्यचकित होत असते. एरव्ही मला माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतरच या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या असत्या अशा या सा-या गोष्टी आहेत.

‘टेक्नोवेशन’च्या पूर्वी मला व्यापार योजनांपासून ते सेल्स पीचच्या नावांपर्यंत कशाचीच विशेष अशी माहिती नव्हती. परंतु आता मी पूर्वीपेक्षा अधिक माहितगार झाली आहे.

येणा-या पाच वर्षांच्या काळात मी चांगले गुण मिळवून आणि शिष्यवृत्तीसह पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कमीत कमी माझ्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करावे अशी माझी इच्छा आहे. या व्यतिरिक्त मी ‘सिलिस्को’च्या वर्तमान स्वरूपाला अधिक चांगले रूप देऊन लवकरच त्याला पूर्ण विकसित करण्याचा माझा मानस आहे. व्यावसायिक बाजारात प्रवेश करून १५ दिवसांमध्ये १० हजार ग्राहकांचा आधार मिळवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

जगात 'सिलिकॉन व्हॅली' या नावाने प्रसिद्ध असलेल्या 'सॅन फ्रॅन्सिस्को'मध्ये आम्ही बरेच काही शिकण्यात यशस्वी झालो. लोक अमेझन आणि ट्विटर सारख्या इमारतींबाहेर सेल्फी काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी तयार असतात. मला वाटते की मी या मोठ्या संस्थांच्या कार्यप्रणालीशी वास्तवात परिचित होण्यात यशस्वी झाले. या बद्दल मी स्वत:ला भाग्यशाली समजते. आणि हो, मी सेल्फी सुद्धा काढली.

या व्यतिरिक्त आम्ही ब्राझिल, मेक्सिको, नायजेरिया इत्यादी इतर देशांमधून येणा-या चांगल्या सहभागींबाबत जाणून घेण्यात आणि त्यांच्याशी बोलण्यात यशस्वी झालो. भविष्यात आम्ही ज्या गोष्टी करू इच्छित होतो त्यांची चाचपणी करण्यात देखील आम्ही यशस्वी झालो.

या व्यतिरिक्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने आमची मुलाखत देखील घेतली. निकालाच्या घोषणेच्या दुस-या दिवशी ही मुलाखत वर्तमानपत्रांच्या टेक आणि व्यापार या पानावर छापून आली. तथापि, निकालाच्या घोषणेपू र्वीच आमची मुलाखत घेण्यात आली होती.”

अनुपमा एन. नायर

अनुपमाचे आवडते विषय संगणक आणि विज्ञान हे आहेत.

सॅन फ्रॅन्सिस्को खरे तर एक अद्भूत जागा होती.


"हा अनुभव बरेच काही शिकवून गेला. लोक ज्या गोष्टी महाविद्यालयांमध्ये शिकतात, त्या सर्व गोष्टी आम्ही इथे शिकण्यात यशस्वी झालो. संकल्पना कशा राबवाव्यात, उत्पादने कशी विकावीत, कोडिंग कसे करावे, व्यापाराची योजना कशी आखावी या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. या व्यतिरिक्त आम्ही बरेच काही शिकलो. शिवाय आम्ही काही नवे मित्र सुद्धा मिळवले, तर इतर टीम्ससोबत काही प्रमाणात आम्ही नेटवर्किंग सुद्धा केले.

येणा-या पाच वर्षांच्या काळात मी स्वत: इंजिनिअरिंग किंवा मग तंत्रज्ञान आणि संगणक क्षेत्रात महाविद्यालयांमध्ये काही करत असलेले मला स्वत:ला पाहायचे आहे.

माझ्यासाठी तंत्रज्ञान ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा उपचार आहे. आपल्या विचारांना आपल्याला हवे ते रूप देण्याचे हे एक माध्यम आहे. आपण बनवलेल्या उत्पादनाला काम करताना पाहणे आणि इतरांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पाहणे खरोखर एक खूप चांगली गोष्ट असते. तंत्रज्ञान माझ्या सारख्या व्यक्तीच्या स्वप्नांना साकार करण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ आहे."

लेखक: तन्वी दुबे

अनुवाद: सुनील तांबे