मोहमद सिराज, हैद्राबादच्या ऑटो चालकाचा मुलगा सनरायजरच्या संघाने २.६ कोटीना विकत घेतला!

मोहमद सिराज, हैद्राबादच्या ऑटो चालकाचा मुलगा सनरायजरच्या संघाने २.६ कोटीना विकत घेतला!

Friday March 03, 2017,

2 min Read

खळबळ निर्माण करणा-या आयपीएल, इंडियन प्रिमीअर लिगमध्ये अनेकदा देशाचे लक्ष वेधून घेणारे काही घडत राहते, आणि वेगळ्या कारणाने ते बातम्यांच्याचे कारण होत राहते. या हंगामातील क्रिकेट लिगसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच झाला, या महाआयोजनात अनेक प्रकारच्या वादग्रस्त गोष्टींशिवाय हे अमान्य करता येणार नाही की आयपीएलने अनेक होतकरू खेळाडूंना प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा देखील मिळवून दिली आहे. ता श्रेणीत नवे नाव आहे मोहमद सिराज यांचे, हैद्राबाद येथील क्रिकेटपटू. ज्याला सनराइज हैद्राबाद संघाने २.६कोटी रूपयांना विकत घेतले आहे. महत्वाचे म्हणजे त्याचे मूळ मुल्य होते २० लाख रूपये! च

image


सिराज यांची पार्श्वभुमी गरीब आणि साधारण अशीच आहे. त्यांचं कुटूंब बंजारा हिल मध्ये छोट्या भाड्याच्या खोलीत राहाते. सिराज यांचे वडिल, घोश मोहमद, व्यवसायाने ऑटोचालक आहेत, आणि सारे कुटूंब ३० वर्षापासून त्यांच्यावर अवलंबून आहे. या क्रिकेटरने असे म्हटले आहे की, त्याच्या वडीलांना उदर निर्वाहासाठी ऑटो आता चालवावी लागणार नाही.

१९९४मध्ये हैद्राबाद मध्ये जन्मलेल्या, सिराज यांना कोचिंग अॅकॅडमी मध्ये कधीच जाता आले नाही, त्यांनी त्यांची चमक नोव्हेंबर २०१५मध्ये २०१५-१६च्या रणजी चषकाच्यावेळी दाखवून दिली. या हंगामात त्यांनी नऊ सामन्यात ४१ बळी मिळवले होते. त्यामुळे निवड समितीच्या सदस्याच्या नजरा त्यांच्यावर लागल्या होत्या. आणि शेष भारत संघात इराणि चषकासाठी त्यांची निवड झाली.

बोली लागल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिराज म्हणाले की, “ हे माझ्या साठी स्वप्न सत्यात येणे आहे. मला इतक्या जास्त मुल्यासाठी स्विकारले जाईल याची काहीच कल्पना नव्हती. मी आशा केली होती की, काही संघांसाठी यावेळी खेळता येईल कारण मी खूप चांगला खेळ केला आहे. पण या मुल्याची मी अपेक्षाच केली नव्हती.”

अलिकडेच माध्यमांना ते म्हणाले की, “ आता माझ्या वडिलांनी ऑटो न चालविता आराम करावा असे मला वाटते, खूप वर्षापासून त्यांनी कुटूंबासाठी काबाड कष्ट केले आहेत. “ माझे वडील त्यांची ऑटोरिक्षा ३० वर्ष चालवत आहेत, मी त्यांना हे थांबवा म्हणून विनंती केली आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मला विश्वास आहे की यावेळी ते माझे ऐकतील. त्यांना चांगला आराम करण्याची गरज आहे,” त्यांनी सांगितले. बोली लागलेल्या या क्रिकेटरने सांगितले की त्यांना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या या दोन हंगामातील रणजीमधील दहा लाख रूपये वेतनाची. त्यांना त्यांच्या कुटूंबासाठी लहानसे घर घ्यायचे आहे.जे अनेकदा आर्थिक चण चण असल्याने घेता आले नाही. त्यांनी सांगितले, “ मी बहुदा लहानसे घर घेईन, मी माझ्या पालकांचा संघर्ष पाहिला आहे, अनेक वर्ष ओढग्रस्तीची गेली आहेत. आता मला वाटते की, त्यांना जीवनात आनंद मिळाला पाहिजे.”

    Share on
    close