कधी काळी ऐपीजे अब्दुल कलाम यांचे चालक होते, आता आहेत इतिहासाचे प्राध्यापक!

कधी काळी ऐपीजे अब्दुल कलाम यांचे चालक होते, आता आहेत इतिहासाचे प्राध्यापक!

Friday June 30, 2017,

3 min Read

दोन दशकांपूर्वी ऐपीजे अब्दुल कलाम यांचे चालक असणारे, ५५ वर्षांचे व्ही काथीरेसन हे आता सहायक प्राध्यापक म्हणून तामिळनाडूमध्ये अरिग्नर अण्णा सरकारी कला महाविद्यालयात कार्यरत आहेत आणि माजी राष्ट्रपतीनी दिलेल्या प्रोत्साहनाचे आभार व्यक्त करतात.


image


काथिरेसन यांनी १९७९मध्ये लष्करात नोकरी मिळवली, आणि भोपाळ मध्ये इलेक्ट्रीक तंत्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (डिआरडिएल), हैद्राबाद येथे १९८०मध्ये त्यांना नंतर कलाम यांचे चालक आणि सहायक म्हणून नियुक्ती मिळाली. तेथे त्यांनी १९९१ पर्यंत काम केले.

एका वृत्तानुसार, काथीरेसन म्हणाले की, “ मी अब्दुल कलाम महोदयांसाठी चालक म्हणून साडेपाच वर्ष काम केले. ते खूप चांगले व्यक्ती होते, मी आज ज्या ठिकाणी आहे त्याला मुख्य कारणीभूत असणारे व्यक्ति म्हणजे कलाम साहेब आहेत.”

आणखी एका वृतानुसार, काथीरेसन यांच्याकडे माजी राष्ट्रपतींचे लक्ष त्यावेळी गेले ज्यावेळी त्यांनी त्यांना वर्तमानपत्र नितयकालीके आणि पुस्तके वाचताना पाहिले, त्यानंतर कलाम यांनी त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यासाठी सुरूवातीला त्यांना कलाम यांनी मदत देखील केली. कलाम यांनी डिआरडिएलच्या कर्मचा-यांना अनेकदा व्याख्याने दिली, नेहमीच त्यांना खूप मेहनत करण्यास आणि त्यांची स्वप्ने साकारण्यास चालना दिली. एका वृत्ता नुसार काथिरेसन म्हणाले की, “ मला नेहमीच माझा अभ्यास पूर्ण करायचा असे, जो मी माझ्या वडीलांच्या निधनामुळे अपूर्ण ठेवला होता, कलाम साहेबांच्या शब्दांनी मला प्रेरणा मिळाली.”

त्यानंतर कलाम दिल्लीला गेले, त्यांनी जी उर्जा काथीरेसन यांच्यात निर्माण केली होती ती फुलत गेली. त्यांनी दहावीची परिक्षा उत्तिर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणाकडे वळले, बीए (इतिहास) आणि एमए (इतिहास) असे त्यानी मदुराई कामराज विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांनी १९९६मध्ये उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी त्यांची नोकरी सोडली, आणि मुख्य शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात तिरूनेलवेल्ली येथे पर्यावेक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी राज्य शास्त्र या विषयात एमए देखील केले, आणि तुरूनेलवेल्ली येथे पीएचडी देखील पूर्ण केली. त्यानंतर ते अरिंगर अण्णा सरकारी कला महाविद्यालयात सालेम जिल्ह्यात सहायक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.

एका वृत्तानुसार ते म्हणाले की, “ मी त्यांना पत्र पाठवून कळविले की मी डिआरडिएल सोडून शिक्षणाधिकारी कार्यालयात रुजू झालो आहे. त्यांचे जे उत्तर आले ते मनाला स्पर्श करून गेले. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे.”

काथिरेसन यांनी त्याकाळात दिवसा काम आणि रात्री जागून अभ्यास केला, यामध्ये त्यांच्या पत्नीचा पाठींबा होता. आणखी एका वृत्तानुसार ते म्हणाले की, “ त्यावेळी माझ्या वडीलांची काही जमिन होती त्यामुळे माझ्या पत्नीने माझ्याकडे कोणत्याही पैश्यांची अपेक्षा न करता घरातील खर्च भागविले. मी माझा सारा पगार आणि मिळकत शिक्षणावर खर्च केली. माझी चालकाची नोकरी सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी होती, मी सायंकाळी शिकायला जात असे. डिआरडिएल मध्ये सारेच माझ्या प्रेरणास्थानी होते.”

कलाम यांच्या कडून मिळालेल्या मदत आणि मार्गदर्शन यावर बोलताना ते आणखी म्हणाले की, “ कलाम साहेबांकडून मला मिळालेल्या पाठींब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळेच माझ्यात हा बदल होवू शकला. ते त्यांच्या सहका-यांच्या भल्यासाठी नेहमीच झटत राहिले".