जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे अभिनेते! 

0

कलेच्या माध्यमातून मनोरंजनाच्या जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या तारे-तारकांची या क्षेत्रात ओळख आणखी एका कारणासाठी होते ती म्हणजे त्यांनी या क्षेत्रात काम करताना मिळवलेले उत्पन्न आणि त्यातून मिळवलेले मान सन्मान आणि प्रतिष्ठा.  जगातील दहा सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते कोण आहेत,  जाणून घेऊ या अभिनेत्यांबद्दल :

अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वांत व्यग्र अभिनेता असून, तीन हिट चित्रपटांमधून त्याने सर्वाधिक कमाई केली आहे. कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन असलेल्या अक्षय कुमार यांचा जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये समावेश आहे.  

मुळचे अमेरिकी अभिनेता आणि लोह पुरुष समजले जाणारे  रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर यांचा जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये समावेश आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरु झाली. तेव्हापासून ते सातत्याने या क्षेत्रात काम करत आहे.

बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला किंगखान शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो .देशात सर्वाधिक कमाईदार असलेल्या  शाहरुख यांचा या यादीत आठवा क्रमांक आहे.

जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये विन डिझेल यांचा यात सातवा क्रमांक आहे.  विन डिझेल एक अमेरिकन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहे. 


 बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा बेन अॅफलेक  एक अमेरिकन अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. जगातील महागडा अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे.  

एक अमेरिकन अभिनेता, निर्माता, आणि संगीतकार जॉनी डेप  हा जगातील महागडा अभिनेत्यांच्या यादीत  पाचव्या क्रमांकावर आहे.

चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय समजला जाणारा गोल्डन ग्लोब हा पुरस्कार तीन वेळा पटकावलेले टॉम क्रुझ हे अमेरिकन अभिनेता, निर्माता चवथ्या क्रमांकावर आहेत.


महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता मॅट डेमन हे तिस-या स्थानी आहेत.


जेकी चैन  एक अभिनेता, अॅक्शन कोरिओग्राफर, फ़िल्म-निर्माता, हास्य-अभिनेता, निर्माता, मार्शल आर्टिस्ट, पटकथा-लेखक, उद्यमी, गायक आणि स्टंट कलाकार आहे. जगातील सर्वाधिक कमाईदार अभिनेत्यामध्ये ते दुस-या स्थानावर आहे.

एक अमेरिकी फ़िल्म अभिनेता, कुस्तीपटू, डब्लूडब्लूई चे ब्रांड  आणि 'द रॉक' जॉनसन या नावाने प्रसिद्ध असलेले ड्वेन जॉनसन हे जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते आहे.