खेळाडू, डॉक्टर, उद्योजक आणि प्राध्यापक असलेली 'स्त्री समर्थ ' : अनू वैद्यनाथन

0

तुम्ही अॅथलिट, व्यवसायिक, डॉक्टर किंवा प्राध्यापक म्हणू शकता. मुलगी, पत्नी आणि बहिण हे नातेही त्या समर्थपणे सांभाळतात. ही सर्व विशेषणं एकाच व्यक्तीची आहेत. ती व्यक्ती म्हणजे अनू वैद्यनाथन. एक यशस्वी महिला. अष्टपैलू व्यक्तित्व.

कथाकार म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी –हदयात घर करतात. यामध्ये अनू वैद्यनाथन यांची गोष्ट सर्वात आघाडीवर आहे.


खेळाडू अनू

भारतामध्ये प्रशिक्षण घेऊन ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही स्पर्धा पूर्ण करणारी अनू ही पहिली महिला. या विक्रमानंतर अनूचं नाव चर्चेत आलं. ट्रायथलॉन हा अत्यंत कष्टाचा खेळ आहे. त्यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे , ४२.२ किलोमीटर पळणे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. या खेळात शानदार कामगिरी करणारी अनू ही पहिली भारतीय महिला. अनू 'हाय आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशीप'साठीही पात्र झाली होती. हा बहुमान मिळवणारी ती पहिली आशियाई महिला आहे.

अनूला लहाणपणीच खेळाची आवड निर्माण झाली. बंगळूरुमध्ये ती बसवेश्वरनगरमध्ये राहत असे. बसवेश्वरनगर ते शाळा हे सात किलोमीटर अंतर ती सायकलने पूर्ण करत असे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तामिळनाडूमधल्या आपल्या गावाला गेल्यावर ती पोहायला शिकली. तिथल्या घराजवळच्या हौदामध्ये अनू पोहत असे. कॉलेजमध्ये संगणक विज्ञान शिकत असताना अनूनं धावण्याचा सराव सुरु केला.

अनू नेहमी स्वत:ला प्रेरित करते. स्वत:च्या आवडीनुसार प्रत्येक गोष्ट करत असते. तसंच ती कधी चांगल्या कामगिरीच्या दबावाखाली खांदे टाकत नाही. अनूच्या सर्व कामगिरीपेक्षा हा गुण नक्कीच महत्त्वाचा आहे.

मी सर्वोत्तम गुण मिळविण्याच्या शर्यतीमध्ये कधीच नव्हते. मला माझ्या अभ्यासाचा अभिमान आहे.माझ्यातल्या प्रतिभेला मी अभ्यास करतानाच ओळखलं. डॉक्टरेट होण्यासाठी अनूनं इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. त्यानंतर जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ती अॅथलिट बनली. पण हे सर्व टप्पे यशस्वी पार केल्यानंतरही मी काही सूपर वूमन नाही, असं अनू स्पष्ट करते. “ मी पीएचडी आणि खेळ एकाचवेळी पूर्ण केलं. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये सर्वोत्तम होण्यासाठी मी कधीही व्यवसायिक बनले नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम होण्यासाठी त्यामध्ये तुमचं सर्वस्व पणाला लावणं आवश्यक असतं. ज्या विषयाचा तुम्हाला ध्यास लागलाय, त्यामध्ये य़शस्वी होण्यासाठी कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही.” आपण सर्व कामं अगदी काटेकोरपणे करतो, असं अनू सांगते. हाच काटेकोरपणा तिच्या यशाची गुरुकिल्ली आहे. “ मला काय करायचं आहे, हे मला माहिती असतं, आणि ते काम मी कोणतीही कूरकूर न करता पूर्ण करते. आपलं काम आणि ते काम पूर्ण करण्याची पद्धत याबाबत आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट असायला हवं.”

टाईमॅक्स कंपनीशी अनू जोडली गेलेली आहे. याचा तिला अभिमानही आहे. “ मुल्यांची देवाणघेवाण करणा-या, त्यांना समजणा-या व्यक्ती तसंच संस्थांशी मी संबंध ठेवते, असे अनू सांगते. त्यामुळे माझ्यावर दबाव येत नाही. जर तुम्हाला एखादं काम करण्याची खरोखरच इच्छा असेल, तर त्यासाठीचा रस्ता सापडतोच. त्यासाठी बाहेरची मदत घेण्याची गरज नसते. कष्ट केले तर प्रसिद्धी, पैसा आणि मदत या गोष्टी आपसूकच मिळतात. काही तरुणांना माझ्यापासून प्रेरणा मिळते. माझ्या गोष्टीपासून त्यांना स्फूर्ती मिळते, हे पाहून मला अभिमान वाटतो.” असं अनूनं सांगितलं.

ट्रायथलॉन प्रशिक्षण केंद्र उघडणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना अनू सांगते, “ मी जागृती करण्याचं काम सध्या करते आहे. मला कोणतीही सामाजिक क्रांती करायची नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं की यशापासूनचं तूमचं अंतर आपोआप कमी होते. ट्रायथलॉन या खेळाबद्दल जागृती करणा-या सर्वांना सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे.” असं अनूनं स्पष्ट केलं.

उद्योजक अनू

अनू ,बौद्धीक संपदा ( पेटंट ) फर्म ‘PatNMarks’ ची संस्थापकही आहे. बंगळूरुमध्ये २००१ साली या संस्थेची अनूनं स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेबद्दल अनू सांगते, “ जग चांगलं आहे, पण व्यापार अवघड आहे. सुरुवातीच्या काळात पेटंटबाबत जागृती करणे हेच आमच्यासमोर आव्हान होतं. पण आता ही समज वाढू लागली आहे. १२ जणांची टीम ‘PatNMarks’ मध्ये काम करते. या संस्थेचं बंगळूरु, चेन्नई आणि ऑस्टीनमध्ये कार्यालय आहे.”

अनूचे पेटंट या विषयाकडे लक्ष आई-वडिलांमुळे गेले. अनूची आई आलमेलू वैद्यनाथन या पेटंट अटॉर्नी भारत सरकारच्या दुस-या रजिस्ट्रार होत्या. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन अनूच्या आईनं हे यश मिळवलं. ही मोठी गोष्ट असल्याचं अनू सांगते.  

अनू ‘PatNMarks’ मध्ये व्यवसाय विकास आणि ग्राहक संबंध हे दोन विभाग सांभाळते. आपला कामामधूनच जास्तीत जास्त विकास होऊ शकतो यावर अनूचा विश्वास आहे.

अनू

हे सारं यश मिळाल्यानंतरही अनूचे पाय आजही जमिनीवरच आहेत. “ सुरक्षा आणि महिलांचा सन्मान या गोष्टीमुळे देशातला कोणताही खेळ आणि उद्योग यावर मोठा प्रभाव पडतो. तुमच्यातल्या उद्योजकांना ओळखा. जर साहस करण्याची धमक असेल तर उत्पादनं तयार करा.जर एखादी गोष्ट करता आली नाही तर तुमच्याकडे पर्यायी योजना तयार हवी ”, असे अनूने स्पष्ट केले.


घरात जास्तीत जास्त वेळ वाचन आणि स्वयंपाक करण्यात अनू घालवते. “ आपल्या सारख्या मध्यमवर्गीय घरांमधून येणा-यांनी सर्वप्रथम आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सर्वप्रथम सोडवायला हवा. आपल्याला जे हवं आहे, ते मिळवण्यासाठी कष्ट करा. नकारात्मक विचार आणि नकारात्मक माणसं यांच्यापासून दूर रहा. टीव्हीचा कोलाहल आणि नकारात्मक विचार यापासून माझे घर दूर आहे,” असे अनूने सांगितले.

अनूची आई ही तिची प्रेरणास्रोत. आलेमालू वैद्यनाथन यांना आपल्या मुलीचा अभिमान आह. मुलीबद्दल त्या सांगतात, “ अनू तिच्या वडिलांप्रमाणे नेहमी व्यस्त असते. आयुष्यात काय हवं आहे आणि काय नको हे तिला पक्कं माहिती आहे. कोणत्याही पुरुषाला कमी न लेखता तिच्यातल्या महिलेचा विकास व्हावा अशी माझी इच्छा होती. अनूनं आज जे काही मिळवलंय, त्याच्यापाठीमागे तिचे कष्ट आहेत. मला खेळाबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे याबाबत मी तिला कसे मार्गदर्शन करणार ? एक खेळाडू म्हणून तिचं यश किती मोठं आहे, हे समजण्यासाठीच मला कित्येक वर्ष लागले.” ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणा-या अनूनं यशाचा सारा प्रवास स्वत:च्या बळावर पूर्ण केलाय. हे सांगण्यासाठी तिच्या आईचे हे शब्द पुरेसे आहे.

Related Stories