रायपूरच्या या चहाकॅफेमध्ये केवळ मुकबधीरांना मिळतो रोजगार!

1

रायपूरच्या वर्दळीच्या रस्त्यावर एक कॅफे आहे जो चहाचे वाफाळलेले कप देत असतो. येथे केवळ मूक बधीर कर्मचा-यांना नियुक्त करण्यात आले आहे. सन २०१३ मध्ये प्रियांक पटेल यांनी सुरू केलेल्या नुक्कडमध्ये समाजाची मोठी सेवा घडत आहे.

प्रियांक ज्यांनी पाच वर्षे एका एमएनसी मध्ये काम केले. आणि सामाजिक कामात ते नेहमी पुढे असत. सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विचार केला की तरूण मुले येतील आणि एकत्र बसतील, त्यातूनच नुक्कडची कल्पना सूचली. सेवा देण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी मूक बधीर लोकांनाच निवडण्यात आले.


या कॅफे मध्ये वीस प्रकारचा चहा मिळतो, आणि ग्राहकांना वाचण्यासाठी पुस्तके वर्तमानपत्र, हातानी लिहीलेली पत्र उपलब्ध असतात. या ठिकाणी गाठीभेटी, चर्चा संवादाचे कार्यक्रम देखील चहा घेता घेता करता येतात. (टी ऍण्ड टोन्स) चाय और बातचित, खुला संवाद करण्याचे ठिकाण, गप्पागोष्टींचा अड्डा. येथील मेन्यू देखील मुकबधीरांच्या खाणाखुणांच्या भाषेत असतो, जे येथील कर्माचारी आहेत, त्यामुळे सहज संवाद होतो. याबाबतच्या मुलाखतीमध्ये प्रियांक म्हणाले की,

“ मला नेहमीच असे व्यासपीठ तयार करावे असे वाटे, जेथे तरूणांना बोलायची बंदी नसावी आणि सहज व्यक्त होता यावे. मी मूकबधीरांना रोजगार देण्याच्या संकल्पनेतून ही सुरुवात केली. आणि सेवाभावी कार्यकर्ते, विद्यार्थी कलाकार यांना एकत्र भेटून गप्पांच्या मैफिली करता याव्या असे ठिकाण देण्याचा प्रयत्न केला. ग्राहक येथील कर्मचा-यांशी खाणाखुणांच्या भाषेत बोलायला सुरूवात करतात.

ते पुढे म्हणाले की, “ मला असे वाटते की, एक माणूस जरी खाणाखुणांची भाषा शिकला तरी त्याचा प्रदीर्घकाळ उपयोग होतो. येथील कर्माचा-यांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे. त्यांना असे वाटते की, ते त्यांच्या कुटूंबाचे ओझे नाहीत आणि त्यांच्या घरच्यांनाही आता त्यांचा अभिमान वाटतो आहे.”