'गुडवीव': बालकामगार प्रथेचं समूळ उच्चाटन करणारी चळवळ

१४ वर्षाखालच्या निरागस मुलांच्या हातापा यातल्या गुलामीच्या बेड्या तोडणारा हातोडा म्हणजे गुडवीव ही संस्था. गरीबी आणि दुःखी आयुष्याच्या खोल गर्तेत कोसळणा-या लहानग्यांना अलगद झेलून त्यांना आरोग्य, शिक्षण देत उज्वल भविष्याच्या वाटेवर नेऊन सोडणारा कल्याणमित्र म्हणजे गुडवील. बालकामगार प्रथेसारख्या अमानुष प्रथेच्या विरोधात उभं राहणं तितकसं सोपं नाही. बालकामगार होण्याला गरीबी, शिक्षणाचा अभाव, शोषणावर आधारित अर्थव्यवस्था आणि तटस्थपणे वागणारा समाज कारणीभूत आहेत. हे आव्हान पेलत गुडवील आपली सर्वशक्ती एकवटून बालकांच्या शोषणाविरूद्ध आवाज उठवते आणि सर्व पातळ्यांवर काम करून ख-या अर्थानं बालकांना शोषणातून मुक्त करते. गुडवीलनं हजारो बालकामगारांची सुटका केली, त्यांचं पुनर्वसन केलं आणि लाखो संभाव्य बालकामगारांना गुलाम होण्यापासून रोखलं. ख-या अर्थानं समाजसेवा करणा-या या संस्थेचे कार्य अधोरेखित करणारी ही कथा.

'गुडवीव': बालकामगार प्रथेचं समूळ उच्चाटन करणारी चळवळ

Monday August 31, 2015,

5 min Read

जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी नवा गालिचा विकत घेता, तेव्हा तो कोणी तयार केला आणि तो तयार करण्यासाठी कोणत्या कारागिरांनी काम केले हे प्रश्न स्वत:ला विचारता का ? दक्षिण आशियामध्ये गालिचा विणकाम उद्योगात सध्या अंदाजे २,५०,००० बालकामगार अडकलेले आहेत. याबरोबर या गालिचा विणकाम उद्योगात पौढ कामगारांना नेहमीच्या, आरोग्याच्या आणि कामगार हक्कांबाबतच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. ज्यांना सामाजिक जाणीव आहे अशा नागरिकांना या परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. भारतामध्ये, बालकामगार प्रथेच्या रुपातली ही गुलामगिरी आजही अस्तित्वात आहे ही प्रकाशात न आलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

UNICEF नं जाहीर केलेल्या पहाणीनुसार भारतामध्ये ५ ते १४ या वय़ोगटातल्या अंदाजे १२ टक्के मुलांचं बाल कामगार प्रथेच्या माध्यमातून शोषण केलं जातंय. एका पाहणीतल्या अंदाजानुसार ६ कोटी ५० लाख बेकार लोकांव्यतिरिक्त भारतात ६ कोटी बालकामगार आहेत. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थेचं मिश्रण अससेली गुडवीव ही संस्था १९९४ मध्ये भारतात स्थापन झाली. ही संस्था बालकामगार प्रथेचं उच्चाटन व्हावं या उद्देशानं गालिचा विणकाम उद्योगाला बाजारातल्या यशासाठी प्रोत्साहीत करून पुरक परिस्थिती निर्माण करण्याचं काम करते

बालकामगार प्रथेच्या जोखडातून मुक्त झालेली मुलं स्वातंत्र्याचा पाठ गिरवताना...

बालकामगार प्रथेच्या जोखडातून मुक्त झालेली मुलं स्वातंत्र्याचा पाठ गिरवताना...


गुडवीव ही संस्था बालकामगारांच्या शोषणापासून दूर असलेल्याच गालिच्यांना प्रमाणित करते आणि गालिचा उद्योगाच्या तावडीतून सोडवलेल्या मुलांचं पुनर्वनसही करते. शिवाय त्यांना शिक्षणाच्या संधीही उपलब्ध करून देते. गुडवीव ही भारत, नेपाळ आणि अफगाणिस्थानातही काम करते. गुडवीवनं युरोप आणि अमेरिकेत ७७ लाखाहून अधिक प्रमाणित गालिचे विकले आहेत. विशेष म्हणजे एकीकडं इतकी मोठी उलाढाल करत असताना दुसरीकडं दक्षिण आशियातल्या गालिचा उद्योगात काम करणा-या मुलांची संख्या १० लाख ते अडीच लाख इतकी घटवण्यात गुडवीवला यश आलंय.

गालिचा आयात निर्यातदारांना आता कायदेशीर करार करावा लागतो आहे. त्यानुसार या उद्योगात बालकामगारांचं शोषण करणार नाही आणि अचानकपणे होणा-या तपासणीला आपला पाठिंबा असेल या अटी पाळणं उद्योगाला बंधनकारक असणार आहे. गुडवीवच्या देखरेख आणि शैक्षणिक उपक्रमाला मदत व्हावी म्हणून परवाना फी च्या रूपात निर्यातदार आणि आयातदारांकडून येणारी रक्कम ही गुडवीवच्या एकूण उत्पन्नापैकी २० टक्के इतकी आहे. 

जर गुडवीवच्या तपासणीत एखाद्या गालिचा विणण्याच्या उद्योगात बालकामगार आढळून आला, तर त्या उत्पादकाला आपला परवाना गमवावा लागतो. शिवाय त्या कारखान्यातून त्या बालकामगारांची ताबाडतोब सुटकाही करण्यात येते. मग त्या बालकामगारांना त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचवलं जातं आणि यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या गुडवीवच्या पुनर्वसन आणि शैक्षणिक भागीदाराकरवी त्यांना शैक्षणिक सेवासुविधाही पुरवल्या जातात. सुटका झालेली मुलं ही खरोखरंच कामापासून दूर आहेत का आणि ती आता खरंच शिक्षण घेत आहेत का याची खात्री करून घेऊन गुडवीव त्यांच्या कुटुंबांना दरमहा ठराविक रक्कम देते. पण ही रक्कम देण्याअगोदर ही मुलं खरोखरच नियमित शाळेत जातात का याबाबतचा शाळेतला रेकॉर्ड तपासल्यानंतरच गुडवीव ही रक्कम संबंधित कुटुंबांना देते. 

१४ वर्षाखालच्या मुलांना मोफत शिक्षण देणा-या ‘शिक्षणाचा अधिकार’ कायद्याबरोबरच बालकामगार सुधारणा कायदा १९८६ या कायद्यानं १४ वर्षाखालच्या मुलांना कामावर ठेवण्यावर बंदी घातली आहे. गुडवीवच्या या कार्याला पुरक ठरणा-या ‘बालकामगार सुधारणा कायदा’ आणि शिक्षणाबाबतच्या कडक कायद्याचा मोठा पाठिंबा मिळतोय.

सध्याचा प्रचलित कायदा हा १४ वर्षाखालच्याच बालकामगारांना केवळ “धोकादायक नसलेल्या काम” करण्यावर बंदी घालतो. 

२००५ मध्ये सामाजिक उद्योजक या प्रकारात देण्यात येणारा स्कोल पुरस्कार जिंकलेल्या गुडवीवच्या कार्यकारी संचालिका नीना स्मिथ स्पष्ट करून सांगतात, “ बालकामगार प्रथेचा अभ्यास करणं आणि कालांतरानं त्यात कशा प्रकारचे बदल होत जातात याचा अभ्यास करणं ही सर्वात कठीण गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.” बाजाराचा कल लक्षात घेऊन तयार केलेलं लोकप्रिय मॉडेल म्हणून, मार्केट आणि प्रत्यक्ष फिल्डमधून आलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा प्रभाव किती आहे याचं मुल्यांकन करते. स्मिथ म्हणतात, “ आमचा सिद्धांत काय आहे पहा. जशी आम्हाला बाजारात मान्यता मिळत गेली, जसे आम्ही बाजारात शेअर मिळवले ( प्रमाणित कार्पेट्सच्या संख्येत ), आणि जसे लोकांपर्यत पोहचत गेलो, तसा बालकामगार प्रथेला आळा बसत गेला आणि बालकामगार प्रथेचे बळी ठरलेल्या असंख्य निरागस मुलांची सुटका ही होत गेली. ”

जो बालकांचं शोषण करत नाही तोच गालिचा सुंदर दिसतो

जो बालकांचं शोषण करत नाही तोच गालिचा सुंदर दिसतो


स्मिथ म्हणतात की, ज्या प्रकारे व्यावसायाचं वातावरण विकसित होत गेलं, तसं या व्यावसायात टिकून राहण्याबाबत ग्राहकांमध्येही जागृती निर्माण होत गेली. याबरोबरच मोठ्या कॉर्पोरेट खरेदीदारांची खरेदीची आवडही वाढत गेली. अशा महत्त्वाच्या बदलांमुळं हा व्यवसाय बालकामगार प्रथा या विषयाला ओलांडून पुढं गेला. अलिकडच गुडवीवनं दक्षिण आशियातल्या गालिचा विणकाम उद्योगावर परिणाम करणा-या घटकाचा विचार केला. त्यानंतर या उद्योगाच्या संदर्भात पर्यावरणाचे मुद्दे लक्षात घेऊन उद्योगाला प्रमाणित करण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणल्या. यामुळं उद्योगांना मानांकन ठरवण्याच्या प्रक्रियेचा दर्जा उंचावला आहे. गालिचा विणकाम उद्योगाच्या उत्पादनांना प्रमाणित करणाऱ्या समग्र मानांकन पद्धती विकसित कऱणं ही अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे, भागधारकांना त्यामध्ये अंतर्भूत करून घेण्याच्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांहून अधिक काळ लागला.

गुडवीवनं केलेल्या या सुधारणा बालकामगार विरहित उद्योग हे प्रमुख लक्ष असलेल्या कार्यक्रमाला पुरकच ठरल्या. त्याचवेळी कार्यक्रमाचं सातत्य कायम टिकवून ठेवणं, आरोग्य, उद्योगावर परिणाम करणारे कामगारांचे हक्क अबाधित ठेवणं, अशा गुडवीवच्या ‘चार्टर’मधल्या उद्दीष्टांच्या दृष्टीनंही या सुधारणा उपयुक्त सिद्ध झाल्या. संपूर्ण जगभरातून बालकामगार प्रथेचा उच्चाटन करायचं असेल तर, बालकामगार प्रथेविषयी व्यक्तीचं, सरकारचं, उद्योगांचं आणि पुढच्या पिढीचं शिक्षण आणि याबाबत त्यांच्यात जागृती येणेही अत्यंत गरजेचं आहे असं स्मिथ यांना वाटतं.

गुडवीवनं प्रमाणित केलेल्या गालिच्या पासून ते स्थानिक कृषी उत्पादनांपर्यंत ( कृषी उद्योगात सुद्धा बालकामगार प्रथा ही मोठी समस्या आहे) आपण जे काही विकत घेतो त्याबाबत विचार करण्याची महत्त्वाची भूमिका ग्राहकांनी पार पाडली पाहिजे असं स्मिथ सांगतात. उत्पादनांबाबत, वस्तूंबाबत प्रश्न विचारण्याचा आणि व्यावसायिक पातळीवर आपल्याया हवे ते योग्य बदल घडवून आणण्यासाठी आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क ग्राहकांनी बजावण्याची गरज आहे. स्मित म्हणतात, “ जेव्हा तुम्ही एखादी वस्तु खरेदी करायला जाता, तेव्हा प्रश्न विचारा. खरेदीच्या क्षणी तुम्ही अधिक सावध आणि सक्रिय रहा, ही वस्तु कुठून आलेली आहे याचीही माहिती करून घ्या, आणि या वस्तू नेमक्या कुठून आल्या याची विक्रेत्यांना माहिती आहे किंवा नाही याचीही खात्री करून घ्या.”

बाजाराधिष्टित मॉडेल्सचा परिणाम हा मुलांचं पद्धतशीर शोषण होण्यात पारंपारिक असा कल राहिलेला आहे. गुडवीव मार्केटमध्ये हाच दृष्टीकोण घेऊन उतरली, परंतु या समस्येला खतपाणी न घालता गुडवीवनं समस्या नष्ट करण्याचे प्रयत्न केले हेच गुडवीवच्या उपायांमधलं नाविण्य आहे. गुडवीवच्या कार्याबाबत आणि संसाधनांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी social.yourstory.com ला भेट द्या.