पाणी शुद्ध करण्याची अनोखी पद्धत, नववीतील विद्यार्थीनी ललिताची आगळीवेगळी कमाल...

0

आज स्वच्छ पिण्याचे पाणी ज्या गतीने कमी होत आहे, त्यामुळे आपण अंदाज बांधू शकतो की, येणा-या काळात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे देखील किती कठीण होईल. आपल्या देशात जलप्रदूषण ज्या गतीने वाढत आहे, ते खूपच चिंताजनक आहे. असे असूनही, त्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत, मात्र, ते प्रयत्नसुद्धा या समस्येच्या निवारणासाठी पुरेसे नाहीत, अशातच ओरिसा येथील १४ वर्षाची एक मुलगी ललिता प्रसिदाने एक प्रयत्न केला, ज्यामुळे तिला “कम्युनिटी इंपेक्ट पुरस्कार” ने कँलिफोर्नियामध्ये गौरविण्यात आले. हा केवळ ललितासाठी गौरवाचा क्षण नव्हता तर, संपूर्ण भारतासाठी हा गौरवाचा क्षण होता. ललिताने कणसाच्या टाकाऊ भागापासून पाणी स्वच्छ करण्याचा एक नमुना तयार केला. दिल्ली सार्वजनिक शाळेत नवव्या वर्गात शिकणा-या ललिताने एक असे आगळेवेगळे काम केले, ज्याबाबत आजपर्यंत कोणीही विचार देखील केला नव्हता. पाणी स्वच्छ करण्याचे यापूर्वीसुध्दा खूप प्रयोग झाले, जे खूपच यशस्वी देखील राहिले आहेत. मात्र, या सर्वात ललिताने तयार केलेला नमुना खूपच नवीन, स्वस्त आणि सोपा होता. ती कणसाच्या टाकाऊ पदार्थापासून अशुद्ध पाणी स्वच्छ करत आहे. ललिता सांगते की, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा कणसाच्या उत्पादकाचा देश आहे. भारतात देशातील प्रत्येक कोप-यात कणसाला पसंत केले जाते आणि त्याचे उत्पादन केले जाते. कणसापासून अनेक गोष्टी देखील बनविल्या जातात. मात्र कणसाच्या दाण्यांना खाल्ल्यानंतर जो भाग उरतो, ज्यात कणसाचे दाने अडकले असतात, तो मोठा भाग दाणे काढल्यानंतर पूर्णपणे टाकाऊ होऊन जातो आणि त्याला कचराकुंडीत टाकले जाते. ललिताने याच कणसाच्या टाकाऊ भागापासून आपली मार्गदर्शक पल्लवी मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली एका पाणी स्वच्छ करणा-या वस्तूची निर्मिती केली, जी खूपच स्वस्त आहे आणि त्यातून अस्वच्छ पाणी खूपशा प्रमाणात स्वच्छ होते.

ललिताच्या वडिलांची नोकरीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बदली होत असे, ज्यामुळे ललिताने देशातील विविध भागांना जवळून पहिले आणि त्याची माहिती घेतली. तिने प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक जागेला पहिले जेथे स्वच्छ पाण्याची कमतरता होती. त्यामुळेच तिने या विषयावर एक नमुना तयार करण्याचा विचार केला. पाणी स्वच्छ करण्याच्या या नमुन्यात पाच पाय-या आहेत. ज्यातील चार पाय-या कणसामुळे निर्मित करण्यात आल्या आहेत. पहिल्या भागात कणसाचे सालटे आहे. ज्याला कापून कापून ठेवण्यात आले आहे. तर दुस-या भागात त्याचे खूपच लहान लहान तुकडे आहेत. तिस-या भागात कणसाचे खूपच लहान तुकडे आहेत जे डाळीच्या आकाराचे आहेत, त्यांना ठेवण्यात आले आहे, चौथ्या भागात कणसाच्या याच तुकड्यांना कोळशाने भाजून ठेवण्यात आले आहे. त्यात ९९ टक्के दाण्यांना शोषून घेण्याचा गुण असतो. पाचवा भाग रेतीचा आहे. या पाचही पाय-यांमधून जेव्हा अस्वच्छ पाणी पार होते, तेव्हा ते स्वच्छ होऊन येते. या प्रक्रियेनंतर देखील या पाण्याला तुम्ही उकळवून पिऊ शकता.

ललिताचा कँलिफोर्नियाचा हा पहिला विदेश दौरा होता. ज्यात ती आपल्या कुटुंबासोबत व मार्गदर्शकासोबत गेली होती. ललिता आपल्या या प्रवासाबाबत खूपच उत्साहित होती. तेथे ललिताने १६ न्यायाधीशांसमोर चार वेगवेगळ्या भागात आपली प्रस्तुती दिली. त्यानंतर २० प्रकल्पांना अंतिम टप्प्यासाठी निवडण्यात आले. ललिता या अंतिम लोकांमध्ये एकमेव भारतीय होती. त्यांनतर ८ लोकांना न्यायाधीशांनी वेगवेगळ्या श्रेणीसाठी विजेता निवडले आणि त्यांना “कम्युनिटी इंपॅक्ट पुरस्कारा”ने गौरविले. ललिता सांगते की, “मी अंतिम परिणामासाठी खूपच चिंतेत होते, मात्र माझ्या नावाची जशी घोषणा झाली, माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळी तिला खूपच गौरान्वित झाल्यासारखे वाटत होते.”

ललिताला भविष्यात संशोधन कार्य करायचे आहे. ती वेगवेगळ्या समुदायांना मदत करू इच्छिते आणि सर्वांमध्ये राहूनच देशाची देखील मदत करू इच्छिते.

लेखक: आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे.