बांबूच्या हस्तकला व्यवसायातून या त्रिपूराच्या महिला कशा सक्षम झाल्या?

3

भारतामध्ये त्रिपूरा हे एक सर्वाधिक बांबू उत्पादन करणारे राज्य आहे, बांबूच्या उत्पादनातून राज्याला श्रीमंत बनविण्याच्या प्रयत्नात ग्रामिण त्रिपूराच्या महिलांनी हस्तकलांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे.

सेपाहिजाला जिल्ह्यातील काशचोव्हमुनी या गावात बहुतांश महिलांना प्रशिक्षित करून कौशल्य विकास करण्यात आला आहे. जयंती दास, एक सहभागी महिला म्हणाल्या की,

“ आमच्या घरांच्या अवती भवती खूप बांबू आहे, ज्याचा वापर कसा करावा आम्हाला माहिती नव्हते. केवळ कुंपणाच्या वापरा पलिकडे आम्ही तो वापरत नव्हतो. नंतर आम्हाला त्रिपूरा बांबू मिशन मध्ये काही प्रशिक्षण मिळाले, आणि आम्ही हस्तकला वस्तू तयार करू लागलो, त्या विकू लागलो. त्यातून आमचा फायदा होवू लागला. कोणत्याही समस्यांशिवाय आम्ही मागच्या सात वर्षांपासून काम करतो आहोत, आमच्या घरच्यांना वेळ देतो आणि मुलांच्या शिक्षणाला हातभार लागतो आहे. आम्हाला भविष्यातही हेच सुरू ठेवायचे आहे”.


या शिवाय येथे आणखी काही वस्तू आहेत, ज्या त्रिपूरा बांबू मिशनने केल्या आहेत. ज्यातून राज्यभर लहान मध्यम आणि अतिलहान उद्योगांच्या बांबू उत्पादन निर्मितीला चालना मिळाली आहे. नव्या हस्तकला रचना या महिलांना विचार करण्यास प्रवृत्त करतात. यातील बहुतांश गृहिणी आहेत. रूपये ४११.२५ लाखांची मंजूरी उत्तर पूर्व परिषदेने बांबू हस्तकला व्यवसायांसाठी केली आहे. यातील दहा टक्के रक्कम त्रिपूरा राज्य सरकार देते, वस्तू गोळा करणारे मिथून देबनाथ यांच्या मते, “ मी या व्यवसायात व्यस्त आहे, मी या वस्तू गोळा करतो आणि त्या चारीलाम येथे किंवा हैद्राबादला, बंगळुरू किंवा मुंबईला किंवा अन्य राज्यात पाठवतो. मी त्या ग्रामिण कारागिरांकडून जमवितो, मला चांगला फायदा होतो, आणि माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह यावर चालतो.”