शून्य टक्के निकालातून झारखंडमधील ६६शाळा - महाविद्यालयांनी अनुभवले दुस्वप्न!

शून्य टक्के निकालातून झारखंडमधील ६६शाळा - महाविद्यालयांनी अनुभवले दुस्वप्न!

Wednesday June 14, 2017,

2 min Read

दहावी आणि बारावीच्या निकालांच्या निमित्ताने झारखंडने एका दुस्वप्नाचा अनुभव घेतला आहे. या पूर्वेकडील राज्यात ६६ शाळा आणि प्राथमिक महाविद्यालयांनी पूर्णत:अपयशाचा अनुभव घेत एकही विद्यार्थी दहावी अणि बारावीच्या मंडळाच्या परिक्षेत उत्तीर्ण न होण्याची वेळ पाहिली आहे. दहावी- बारावीचे निकाल राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख निरा यादव यांनी ३० मे रोजी जाहीर केले आहेत.

झारखंड शैक्षणिक परिषदेच्या( जेएससी) मते, ज्यांच्या मार्फत मंडळाच्या परिक्षा घेतल्या जातात. ५७.९ टक्के विद्यार्थी जे दहावीच्या आणि ५२.३६ टक्के विद्यार्थी जे इंटर सायन्समध्ये तर ६०.०९ टक्के इंटर-कॉमर्समध्ये शिकत होते त्यांना उत्तिर्ण घोषित करण्यात आले. शिक्षण विभागातील सूत्रांच्या मते, ३३आंतर महाविद्यालये आणि तेवढ्याच शाळांमध्ये दहावीचा आणि बारावीचा निकाल शून्य टक्के झाला, जेथे एकही विद्यार्थी उत्तिर्ण होवू शकला नाही.


image


या तेहतीस आंतर महाविद्यालयातून, १४८ मुलांनी बारावीची परिक्षा दिली होती, तर २४० मुलांनी तेहतीस शाळांमध्ये दहावीच्या परिक्षेत भाग घेतला होता. चिंतातूर शिक्षक आणि राष्ट्रीय शिक्षण संघ यांनी तांत्रिक कारणे उपस्थित केली आहेत, ज्यामुळे हे धक्कादायक निकाल आले. अमरनाथ झा जे राष्ट्रीय शिक्षण संघाचे सरचिटणीस आहेत, त्यांनी अहवाल दिला आहे त्यात नमूद केले की, “ मोठ्या प्रमाणात दहावीच्या वर्गातील मुले इंग्रजीच्या परिक्षेत नापास झाली आहेत, झारखंड शैक्षणिक परिषदेच्या तरतूदीनुसार त्यांची काळजी घेण्यात आली नाही”. शिक्षक संघटनेचे सदस्य जेएससीचे अध्यक्ष अरविंद प्रसाद सिंग यांना भेटले, आणि ही गोष्ट ३१ मेला त्यांच्या नजरेत आणून दिली.

राज्यातील हे निकाल वाईट गोष्ट आहे, जे भारतात एका राज्यातील शिक्षणाची दुस्थिती दाखवते, जेथे आजही चार टक्के मुले शाळेतच जात नाहीत, ५८ टक्के प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत आणि ९० टक्के मुले उच्च शिक्षण घेवू शकत नाहीत. दुर्गम भागात शाळा नसल्याने विद्यार्थी गळती प्रमाण आजही आहे, शिक्षणा बाबत जागृती आणि बालमजूरीच्या प्रश्नामुळे दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना कमाविण्यासाठी जावे लागते आणि त्यांची शाळा बंद होते. त्या शिवाय जी मुले शाळेत पोहोचतात तेथे ही नकारात्मक पध्दतीच्या वातावरणातून त्यांना बाहेर फेकले जाते. प्रसाधनाच्या पुरेश्या सोयी नसल्याने ब-याचदा मुलींच्या शाळेतून गळतीचे प्रमाण मोठे दिसते, खास करून अकरा ते १४ वयोगटाच्या मुलींमध्ये हे प्रमाण जास्त आहे.

या घटणा-या आकड्यांनी देशात अजून बरेच काही केले जावू शकते हेच दाखवून दिले आहे, जर सार्वत्रिक शिक्षणाचे लक्ष्य पूर्ण करायचे असेल आणि साक्षर भारत निर्माण करायचा असेल.