जी खोली 'ओम' मध्ये होती ती कुणाच्यातच नव्हती !

जी खोली 'ओम' मध्ये होती ती कुणाच्यातच नव्हती !

Tuesday January 10, 2017,

4 min Read

आपल्या रुबाबदार आवाजाने ओळखले जाणारे महानायक ओमपूरी यांचे ह्रदयविकाराने शुक्रवारी निधन झाले. ते ६६वर्षाचे होते. ओमपूरी यांच्या स्मृती निमित्त प्रसिध्द पत्रकार चंचलजी यांचा हा लेख. हिंदी जगतात चंचलजी ते लेखक आहेत ज्यांच्या वाचकांची संख्या रोज वाढत आहे. या लेखात त्यांनी आपल्या ओमपूरी यांच्यासोबतच्या आठवणी आम्हाला सांगितल्या आहेत, ज्या त्यांच्या मनात कायम आहेत.

प्रसिध्द सिनेनिर्माता रंगमंच दिग्दर्शक आणि ओमपूरी यांचे मेहूणे रंजीत कपूर यांचा छोटासा संदेश मिळाला की, ‘ओम पूरी नही रहे’ आणि क्षणात मन विषण्ण झाले. आता काही दिवसांपूर्वीच तर आमचे फोनवरून बोलणे झाले होते. आणि आमच्यात ठरले होते की एका गंभीर विषयावरच्या सिनेमाची कथा तयार केली जावी जी स्वार्थी राजकारणावर असेल त्यातील बारकावे आणि कंगो-यावर प्रकाश टाकणारी असेल.


image


अलिकडेच रंजीत कपूर यांचा एक सिनेमा जय हो डेमोक्रसी आला. "ग्रुशा कपूर अत्यंत निष्णात कलाकार आहे आणि तितकेच मनमिळावू माणूस देखील. ग्रुशाला आम्ही उत्तर प्रदेशात करमाफ करण्यासाठी विनंती केली. की मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत मधुकर जेटली त्यांना भेटा काम होईल” या गोष्टीची चर्चा येथे यासाठी गरजेची आहे कारण की, लोकांना समजावे की फिल्मी जगताचा हा दुसरा कपूर परिवार आहे जेथे सर्वच्या सर्व एका पेक्षा एक कलाकार आहेत.ओम पूरी यांच परिवाराशी संबंधित आहेत. सिमा कपूर रणजीत यांची बहीण आहेत. रणजीत कपूर, अनिल कपूर जे आज सिनेमात अन्नू कपूर म्हणून ओळखले जातात दोघे सख्खे भाऊ आहेत. 

जगातील हा सर्वात मोठा प्रयोग होता, त्यापूर्वी देखील यासारख्या गंभीर आणि संभ्रमात टाकणा-या विषयावर सिनेमा बनला आहे. पण हा अद्भूत प्रयोग होता. कथा मुन्शी प्रेमचंद, दिग्दर्शक सत्यजीत राय. सद्गती कलाकार एका पेक्षा एक भारी मोहन आगाशे, ओम पूरी,आणि स्मिता पाटील. सिनेमात ओम पूरी अस्पृश्य आहे हे सांगायला कुठलयाही बाहेरच्या गोष्टीची गरज पडली नाही. तर त्यांचे बसण्याची पध्दत, त्यांच्या चेह-यावरचे भाव सारे त्यांच्या आतून येत असत. त्यांचे खाजगी आयुष्य देखील उणिवा आणि तिरस्काराने भरले होते. त्यांनी कोळसा विकला, मामाच्या घरातून हाकलण्यात आले, चोरी आणि चहाटळपणाचा आरोप लावण्यात आला. खाजगी अनुभवांच्या भांडवलावर उभे राहून ओम यांनी हिंदी सिनेमाला एक वेगळेच वळण दिले. ज्याने हिंदी सिनेमाचा नवा चेहरा दिसला.

७०चे रंगीत, सजले धजलेले चेहरे जेथे राजेश खन्ना, अमिताभ बच्चन जितेद्र यांचा बोलबाला होता, त्याच्या समांतर रंगमंचावरून आलेल्या मुलांनी नवे भाग्य आजमवाले होते. नशीर, कुलभूषण खरबंदा, पंकज कपूर, राजेश विवेक, अन्नू कपूर, ओम पूरी, खूप नावे आहेत. पण जी खोली ओम मध्ये होती ती कुणाच्यात नव्हती.एकाच वेळी आणि एकमेवच. हास्याची देखील नवी परिभाषा दिली ओम यांनीच. येथे मी ओमसोबत घडलेल्या एका घटनेची आठवण सांगेन. जेथे रंगमंच आणि जीवन एकजीव होवून जाते. त्यात कारुण्य आहे, आभाव आहे, राजाशाही आहे आणि हे सारे असतानाच ठसका सुध्दा आहे.

दिल्लीच्या पुसा रोडवर भाड्याचे घर घेवुन दुस-या मजल्यावर एका खोलीत बज्जू भाई ( कलाकार, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक राहीले, सध्या मुंबईत आहेत आणि सिनेमाशी जोडले गेले आहेत आणि सोबतच आमचे जवळचे स्नेही आहेत) आणि ओम पूरी सोबत राहात होते. ते मौजमस्तीचे दिवस होते.एका दिवशी सकाळी माहिती झाले की दोघाच्या जवळ इतके पैसे नाहीत की ते मंडी हाऊस (बंगाली मार्केट) पर्यंत पोहोचू शकतील आणि मित्रांकडून उधारी घेत जीवन पुढे ढकलू शकतील. इतक्यात खालून भंगारवाल्याचा आवाज आला. ओम यांनी बाल्कनीतून त्याला आवाजा दिला, आणि वरती बोलावले. तो वरती गेला खाली बाटल्या, वर्तमान पत्रांची रद्दी सारे मिळून काहीतरी ७३ रुपये झाले होते भंगारवाल्याने शंभर रुपये काढले आणि म्हणाला की, “सुट्टे तर नाहीत. तुमच्या जवळ असतील तर द्या”. त्यावर ओम जोरात हसले आणि म्हणाले की, “उस्ताद तोच प्रश्न इकडेसुध्दा आहे, शंभराच्याच नोटा आहेत. तुम्ही असे करा खाली जा चार अंडी एक लोणी, एक ब्रेड, आणि दुधाचे पाकीट घेवून या सुट्टे होवून जातील” आणि इतके बोलून ओम बसले दाढी करायला. भंगारवाल्याने जाता जाता विचारले की, साहेब ही गोणी खाली घेवून जावू? बज्जू भाईने मोठ्या मनाने संगितले की, “घेवून जा बाबा आणि जरा लौकर परत ये” पुढचा किस्सा विचारूच नका. आठवले की अजूनही हसू येते. ओमचे आणि आमचे संबंध तितके जवळचे राहिले नाहीत जितके अन्य कलाकारांचे राहिले त्याचे महत्वाचे कारण हे होते की, जेंव्हा आम्ही दिल्लीत होतो त्यावेळी ओम आणि राज बब्बर यांचे पंजाबमध्ये कार्यक्षेत्र बदलून गेले. मात्र ओमशी अधून मधून भेट होत राहीली. खरे सांगू, ओमचे असे अचानक जाणे मनाला लागलेच मित्रा तू कायम आठवत राहशील. 

-चंचल