अमित अग्रवाल : देशाचे पहिले व्यावसायिक ब्लॉगर

अमित अग्रवाल : देशाचे पहिले व्यावसायिक ब्लॉगर

Thursday November 05, 2015,

8 min Read

दिल्लीपासून २०६ किलोमीटरवर असलेले आणि लोकसंख्येच्या घनतेत उभ्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक आघाडीवर असलेले शहर म्हणजे आग्रा. महाभारतातील अग्रवेना… बुटांसाठी विख्यात असलेले आग्रा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाचे हे शहर… आता देशातल्या तंत्रज्ञानात पुढारलेल्या दहा शहरांमध्ये नसले म्हणून काय झाले? किंवा मग तंत्र विद्वत्तेतील पहिल्या दहा शहरांत नसले म्हणून काय झाले? आग्र्यातल्या एकानेच ही सगळी उणीव शंभरपटींनी भरून काढलेली आहे. अमित अग्रवाल हे त्यांचे नाव. नावातही मोगऱ्यासारखा आग्र्याचा सुगंध आहेच. देशभरातील दहा लाखांहून अधिक लोक आणि या पेक्षा तीनपटीने संपूर्ण जगभरातून लोक स्वत:ला टेक्निकली अपडेट ठेवतात ते अमित यांच्या ब्लॉगच्या साहाय्याने .

इतक्या लोकांना तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत ठेवणारे आग्र्याचे एकटे अमित अग्रवाल एकीकडे आणि टेकसिटी म्हणून नामवंत झालेली देशभरातील दहा शहरे दुसरीकडे... सांगा काय भारी? अमित अग्रवालच!!

विशेष म्हणजे अमित अग्रवाल हे भारतातले पहिले व्यावसायिक ब्लॉगर आहेत. २००४ मध्ये त्यांनीच ‘लॅबनॉल. ओआरजी’ हा ब्लॉग सुरू केला. हा एक ‘टेक्नॉलॉजी ब्लॉग’ आहे. अमित हे एक मनस्वी तंत्रज्ञ आहेतच, पट्टीचे लेखकही आहेत. अमित यांच्या गासोडीत लोकांना देण्यासाठी भरपूर काही आहे. आठवड्यातील ‘टेकी ट्युसडे’ म्हणून ‘युवर स्टोरी’शी बोलताना या गासोडीच्या बऱ्याच गाठी त्यांनी उलगडल्या. आतापर्यंचा प्रवास, आपल्या यशाची गोष्ट आणि ज्या निर्णयांनी त्यांना आयुष्याच्या वाटेवर इथपर्यंत पोहोचवले, असे ते निर्णय... बरेच काही, खुप काही त्यांनी ‘शेअर’ केले.

image


व्यावसायिक कुटुंबातला अभियंता

अमित यांचे संपूर्ण घराणे व्यवसायात. मोठा होईल तेव्हा घराण्याच्याच व्यवसायात आपल्याला पडायचे आहे, ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधलेलीच होती, पण म्हणून अभ्यासावर त्याचा कुठलाही विपरित परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. अगदी लहानपणापासूनच अमित एक अभ्यासू विद्यार्थी. वर्गातही नेहमी अव्वल येत. बरं असं असूनही त्यांना कधीही आपण कॉम्प्युटरमध्ये काही करावे, किवा मग इंजिनिअरिंग करावे, असे वाटले नाही, हो पण गणित हा त्यांचा आवडता विषय होता. शालेय शिक्षण आटोपल्यावर गणितातील या गोडीनेच त्यांना इंजिनिअरिंगकडे ओढत नेले. त्यांना ‘ॲकॅडमिक’वगळताही बरेच काही करायचे होते म्हणून मेडिकलला जाणे त्यांनी टाळले.

अमित यांनी आग्र्यालाच राहावे. कुठे बाहेर जाऊ नये, अशी आई धरून घरात सगळ्याच लेडीज् कंपनीची इच्छा होती. वडिलांसह सगळेच जेन्टस्‌ मात्र अमित यांनी त्यांना (अमित यांना) आवडेल तसे करावे या बाजूचे होते. अमित यांनी अखेर इंजिनिअरिंग यासाठी निवडले, की त्यांना मेडिकलच्या तुलनेत इथे अधिक पर्याय खुले होते. आयआयटी-रुडकीमध्येही (तत्कालिन आरईसी) त्यांनी इंजिनिअरिंगसाठी कॉम्प्युटर सायंस हा विषय निवडला. त्या काळात हुशार मुलांची हीच निवड असे.

शैक्षणिक हिशेबाने अमित यांच्यात कुठलाही बदल झालेला नव्हता. म्हणजे कॉलेजचा कुठलाही वेगळा रंग त्यांच्यावर चढलेला नव्हता. शाळेत येत तसेच इथेही आपल्या बॅचमध्ये ते पहिले आले.

अमित सांगतात, ‘‘जेव्हा माझा कॉम्प्युटरला नंबर लागला, तेव्हा माझा रस ‘कोडिंग’मध्ये नव्हे तर ‘सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन’मध्येच अधिक होता. कॉम्प्युटरच्या आत नेमके काय घडते, हे जाणून घ्यायला मी उत्सुक असे. म्हणजे सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले, की कोणत्या फाइलमध्ये काय बदल होतो, ते. आजही मी काहीसे हेच करतो आहे.’’

अमित यांना कॉलेजचे शेवटचे वर्ष आठवते तेव्हा ते आनंदून जातात. तेव्हा ‘इन्व्हँट्री मॅनेजमेंट’चा एक भाग म्हणून त्यांनी मारुतीच्या गुडगावातील फॅक्टरीत एका प्रोजेक्टवर काम केले होते.

अमित सांगतात, ‘‘त्या काळात नेटस्केप नेव्हिगेटर हेच एकमात्र ब्राउझर असायचे. आणि ते डेस्कटॉप युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असत. आमचा तिन जणांचा एकच ई-मेल असे. ग्रंथालयात दोनच कॉम्प्युटर होते. ईमेल तपासायचे तर फार वाट बघावी लागे. नंबर लावावा लागे. म्हणून हा मार्ग निवडलेला होता.’’

पहिली (आणि शेवटची) नोकरी

१९९९ मध्ये अमित पदवीधर झाले आणि हैदराबादेतील ‘एडीपी इंक’मध्ये नोकरीला लागले. इथे एका डाटाबेसवर त्यांनी सलग पाच वर्षे काम केले. गोल्डमॅन सॅश आणि मेरिल लिंचसारख्या कंपन्यांसाठी युनिक्स, पलर् आणि पीएचपीवरही त्यांनी काम केले. अमित इथे लागले तेव्हा ही ७०-८० लोकांची टिम होती. अमित या सगळ्यांत आगळे असेच होते. दोन वर्षांनंतर याच बळावर ते स्वत: टिम लिडर बनले. कोडिंगऐवजी व्यवस्थापनावर आता त्यांचे सगळे लक्ष केंद्रित झालेले होते.

अमित सांगतात, ‘‘एडीपीत काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला असेल तर तो हा, की मला खुप चांगले मित्र इथे मिळाले. कोडिंग सेशन्सव्यतिरिक्त मी माझ्या कामासाठी रात्ररात्र खपत असे. मला तेव्हा सगळे शिकून घ्यायचे होते ना. आणि हीच संधी होती.’’ ‘एडीपी’मध्ये असताना अमित खुप काही शिकले. लोकांशी वागावे कसे, प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांशी आणि सामान्य लोकांशी संवाद कसा साधवा, असे सगळे.

‘‘मी माझ्या कौटुंबिक व्यवसायात हे सगळे शिकूच शकलो नसतो. आज मी जे काही करतो आहे, ते सगळे मी त्यावेळी शिकलेलो आहे. कॉलेजमध्ये माझे सगळे लक्ष ‘थिअरी’त असायचे. पण थेट लाइव्ह प्रोजेक्टवर (प्रत्यक्ष प्रकल्पांवर) काम करायला मिळाल्याने इथेच मला ‘प्रॅक्टिकल नॉलेज’ (व्यावहारिक ज्ञान) मिळाले.’’ अमित कृतज्ञता व्यक्त करतात.

image


पहिल्या व्यावसायिक ब्लॉगरचा जन्म

अमित यांना खरंतर कुटुंबाची ओढ आतून खुपच होती आणि ते कुटुंबासमवेतच राहू इच्छित होते. अर्थात त्यांनी पर्यायही खुले ठेवलेले होते म्हणून तर ते हैदराबादेत राहू शकले. पण ओढ आता जरा दाटूनच आली आणि इतकी दाटून आली, की त्यांनी बॅग भरलीच. यादरम्यान त्यांचे लग्नही झालेले होते.

स्मृतीची पाने चाळत अमित म्हणतात, ‘‘जेव्हा मी आग्र्याला परतलो तेव्हा माझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक होता. फ्रीलान्सर म्हणून काम सुरू करणे. २००४ मध्ये ‘ब्लॉगिंग’ म्हणजे एकदम नवीन गोष्ट होती. विशेष म्हणजे सोशल मिडिया आणि अन्य ऑनलाइन नेटवर्किंग सोशल टुल्सशिवाय हे शिवधनुष्य पेलायचे होते. तो अगदी वेगळा काळ होता.’’

२००४ मध्ये अमित देशातले पहिलेवहिले व्यावसायिक ब्लॉगर बनले आणि ‘लॅबनॉल’ची स्थापना केली. लॅबनॉल हे नाव निवडण्यामागे कुठलेही खास असे कारण नव्हते. आपल्या ढंगाचे हे एक आगळे नाव होते बस्स म्हणून ठरवून टाकले. २००५ मध्ये सर्वाधिक वाचले जाणारे ब्लॉग म्हणून ‘ब्लॉग ॲग्रिगेटर (इंडियन फिल्टर ब्लॉग) देसीपंडित’ने अमित यांचे नाव उचलून धरले. अमित यांची पोहोच अशी वाढली आणि वाढतच गेली. देशभरात कितीतरी शहरांच्या ब्लॉग कॅम्पस्‌मधून त्यांनी मुक्त प्रवेश मिळवला आणि मुक्त प्रवास केला. एकमेव व्यावसायिक ब्लॉगर असल्या कारणाने त्यांना साहजिकच वेगळी ओळखही मिळाली.

लॅबनॉलचा आतापर्यंतचा प्रवास

‘कंज्युमर सॉफ्टवेअर’ हा लॅबनॉलचा मुख्य विषय आहे. गेल्या ११ वर्षांपासून त्यावरील भर कायम आहे. तसूभरही फरक त्यात पडलेला नाही.

अमित लॅबनॉलच्या प्रवासाबद्दल सांगतात. ‘‘आता लिखाणाची शैली बदललेली आहे. विकसित झाली आहे म्हणा. पूर्वी लिखाण शब्दांनीच भरलेले असे. आता लिखाणात ‘ऑडिओ-व्हिजुअल्स’ही (ऑडियो, व्हिडियो आणि ॲनिमेशन) भरपूर असतात. लांबलचक गोष्टही आता ‘लॅबनॉल’वर थोडक्यात आटोपलेली असते. बातम्या आणि सूत्रांच्या हवाल्याने लिहित बसण्यापेक्षा सॉफ्टवेअर/प्रॉडक्ट्ससंदर्भात मी आपल्या अनुभवांच्या आधारावर अधिक सुस्पष्ट लिखाण करू शकतो. गुगल फोटो हा विषय येऊन महिना झालेला होता, पण मी एक महिना त्यावर आधी घालवला मगच त्या विषयावर समीक्षण लिहिण्यासाठी तयार झालो.’’

‘सिमिलर वेब’च्या आकडेवारीनुसार लॅबनॉलला दरमहा ३० लाख लोक व्हिजिट्‌स देतात.

अमित सांगतात, “माझ्या एकूण वाचकांपैकी जवळपास ४० टक्के वाचक अमेरिकेतील आहेत. ३० टक्के भारतात तर उर्वरित ३० टक्के उर्वरित देशांतील आहेत.”

लॅबनॉल सुरू झाली तशी वर्षभरातच दोन पैसे मिळवून देऊ लागलेली होती. आज अमित यांच्याकडे उत्पन्नाचे बरेच मार्ग आहेत. जसे गुगल ॲड-सेंस, कॉन्टॅक्स्टुअल ॲड नेटवर्क्स, ब्लॉग ॲडस्‌च्या माध्यमातून थेट जाहिराती आणि आयडीजी टेक्नेटवर्क्स हे सारे.

मनस्वी तंत्रज्ञ आणि खिशात लाखो

नाविन्याचा सतत ध्यास असलेला एक तंत्रज्ञ, अशी स्वत:ची व्याख्या अमित करतात. ते म्हणतात, ‘‘तंत्रज्ञान माझे जीवन आहे. मी नेहमी याच विषयाचा विचार करत असतो. मी आंघोळ करत असतो तेव्हाही माझे हेच चाललेले असते. आमचे ज्ञान यातूनच वाढत असते आणि आम्ही मग जास्त परिणामकारकरित्या काम करू शकतो.’’

अमित यांना नेहमीच एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे, एखाद्या समस्येवरील उपाय ठरतील असे टुल तसेच सॉफ्टवेअर बनवण्यात मजा येत असे. म्हणूनच त्यांच्यादृष्टीने एक ब्लॉग त्यांच्या दिमतीला असणे कमालीचे फायदेशीर ठरले. गेल्या दोन वर्षांत त्यांनी कितीतरी प्रोजेक्ट्सवर काम केले. यातूनच ‘कुच’ तयार करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. सिंगल पेज ॲअॅप्स, एमपी३चे टुल्स, वेब ब्राउजरवर प्रतिलिपी, पॉडकास्ट गॅलरी, गुगल ड्राइव्हवर पॉडकास्ट आणि अन्य ‘कुच’ यापैकीच. गुगल डॉक/ड्राइव्हमध्ये कितीतरी ॲअॅप्स अमित यांनी लिहिलेले आहेत. त्यासाठीच्या सगळ्या कल्पना रॅडिट (झिरो डॉलर मुव्हीज्‌ प्रोजेक्ट), युजर्स, फोरम्स तसेच मित्रांकडून ते मिळवत असतात.

अमित आठवून सांगतात, ‘‘माझ्या एका मित्राला तिकिटांच्या बुकिंगसाठीची खिडकी लहान असण्यामुळे त्रासदायक ठरायचे. मग त्याचा त्रास वाचवण्यासाठी मी आवश्यक बाबी ऑटो फिल करण्याचा विचार केला. सर्वांसाठी जेव्हा हे तंत्र मी खुले केले, तेव्हा देशभरातील ट्रॅव्हल एजंट्‌सनी ते विकत घेतले आणि आतातर हे देशभरात सर्वत्र वापरले जाते आहे. खुश आहेत सगळे. झंझटच संपली.’’

अवगत तंत्राच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी ते प्रिमियम मॉडेल वापरतात. काही फिचर्स विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. पण बहुतेक फिचर्स खरेदीच करावे लागतात. तूर्त लॅबनॉलचे उत्पन कोट्यवधींच्या घरात आहे!

दशकभरातले अनुभव

चांगली टिम बनवण्यातील अपयश ही अमित यांच्या मते सर्वांत मोठी अडचण ठरली. चांगली टिम मिळाली असती तर अन्य क्षेत्रांतही आपल्या व्यवसायाचा विस्तार अमित यांना करता आला असता. या क्षेत्रातील दशकभरात आलेल्या अनुभवांच्या आधारे ते तंत्रज्ञ आणि ऑनलाइन समूहांना काही गोष्टी सांगू इच्छितात. त्या खालीलप्रमाणे-

१) एक चांगला कोड कशाला म्हणावे, तर जो लिहिण्याच्या प्रक्रियेत आटोपशीर आणि विचारांच्या प्रक्रियेवर अधिक प्रकाशझोत टाकणारा असतो. ज्या कोडच्या मदतीने तुम्ही प्रगतीकडेच जाता.

२) शक्य होईल तोवर साधेपणा, सरळपणा आणि नेमकेपणा या त्रिसूत्रीचा संगम साधण्याचा प्रयत्न करा. मी त्या प्रॉडक्टस्‌ना अधिक महत्त्व देतो, जे भलेच एक गोष्ट करतात, पण नेमकेपणाने करतात. उदाहरणार्थ ड्रॉपबॉक्स.

३) जनसंपर्कात उत्तम असेल तर कंझ्युमर प्रोडक्ट कंपनी आणि ब्रँड्ससाठी उपयुक्त ठरू शकतात. ग्राहकांच्या समस्या कशाप्रकारे हाताळल्या जातात आणि ग्राहकांशी संवाद कसा साधला जातो, यावर कंपनीची बाजारातील प्रतिमा अवलंबून असते. म्हणजे हे उत्तम केले तर प्रतिमा उजळते आणि हेच खराब केले तर प्रतिमा काळवंडते.

४) डेस्कटॉप सोडून अचानक मोबाईल तेवढा खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढलेला ओह. हे योग्य, की अयोग्य मला माहित नाही.

भारतातील टॉप टेक ब्लॉग वैशिष्ट्ये अन्‌ धर्म?

१) त्याच गोष्टी बनवण्यावर लक्ष केंद्रित करा ज्या तुम्हाला आवडतात. आणि तुम्ही स्वत:ही त्या वापरू शकता. वरून कुटुंबीयांना, नातेवाइकांना आणि मित्रांनाही त्या गोष्टी वापरण्याचा सल्ला देऊ शकता.

२) ज्या ज्या म्हणून समस्या आहेत, त्यावर उपाय शोधा. जगात समस्यांची वाणवा नाही.

३) तुम्ही पूर्णवेळ ब्लॉगिंग करू इच्छित असला तर कृपया एकदा आणखी विचार करा. अशा अनेक अडचणी येतील ज्यांच्यावर तुम्हाला उपाय सापडणार नाहीत. गोष्टी तुमच्या आवाक्यात राहणार नाहीत आणि तुम्हाला खुप सोसावे लागेल.

४) जमेच्या बाजूंपेक्षा आपल्या मर्यादा ओळखा इंडियनब्लॉगर्स.ओआरजीकडे भारतातील सक्रिय ब्लॉगर्सची यादी असते. वरून अशा ब्लॉगर्सचीही यादी असते, जे काल होते आणि आज गायब झाले. बरेचदा ब्लॉगर आटोपते घेतात किंवा मग त्यांना एखाद्या चांगल्या नोकरीचा प्रस्ताव मिळालेला असतो आणि त्यांनी ब्लॉगिंग सोडलेले असते.

५) पैसा कमवणे हा प्राथमिक उद्देश नसावा. तो दुय्यम असू शकतो. आवड हीच प्राधान्यक्रमावर असली पाहिजे. अमित यांना याच गोष्टीची मदत झाली. ते तेच लिहित जे त्यांना आवडत असे आणि याच दमावर त्यांची पावलेही दमदारपणे पडली, पडत गेली आणि आज ते ‘या’ टप्प्यावर आहेत.

६) आपल्या वाचकांशी प्रामाणिक रहा. जे तुम्हालाच माहित नाही, ते मला माहित आहे, या आविर्भावात लोकांसमोर मांडण्याची चेष्टा उगीच करू नका. चेष्टा होईल.