बंगळूरूच्या या सॉफ्टवेअर अभियंत्याला भेटा, ज्याने ७०० पेक्षा जास्त भटक्या श्वानांना दिला आहे आश्रय!

0

असे अनेकदा दिसत नाही की, खूप लोकांनी भटक्या कुत्र्यांचे पालकत्व घेतले आहे.चीनमध्ये ‘युलिन’ नावाच्या महोत्सवात आणि जगभरात कुत्र्यांबाबत असे काहीसे घडताना दिसते. मात्र तुम्हाला एक मन हेलवून टाकू शकेल अशी बंगळूरू मधील सॉफ्टवेअर अभियंत्याची बातमी देत आहोत ज्याने ७३५भटक्या कुत्र्यांना शहराबाहेरच्या फार्म हाऊसवर आसरा दिला आहे.

Source : Alyzaonline
Source : Alyzaonline

राकेश शुक्ला पूर्वी दिल्लीत काम करत होते, त्यानंतर अमेरिकेत गेले. दहा वर्षापूर्वी बंगळूरूला आले आणि सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली, ज्यात त्यांची पत्नी सह भागीदार आहे. ते म्हणाले की, “ जीवन केवळ मोठ्या कार खरेदी करणे, महागडी घड्याळे खरेदी करणे, आणि छानशौकीत जगणं यात चालले होते. मी प्रवास केला आणि जगभर अनेकदा फिरुन आलो आहे पण तरीही मला मनाचे समाधान काही गवसले नाही”.

लोक ज्यांना आता कुत्र्यांचे पालक (वडील) म्हणून संबोधू लागले आहेत ते ४५वर्षीय राकेश सांगत होते की, त्यांचे कुत्रे हीच त्यांची मुले आहेत, आणि त त्यांचे वडील (पप्पा)आहेत. त्यांच्याकडे सर्वात मोठी कुत्री ४५ दिवसांची गोल्डन रिट्रिव्हर जातीची आहे जिचे नाव काव्या आहे. “ आम्ही तिला जेंव्हा घरी आणले, ती कोप-यात जावून लपली. मी  जमिनीवर  बसलो आणि तिला हाका मारल्या. ती घाबरली होती पण मला वाटले तिला माझ्यावर विश्वास होता. तिच्या केसांतून कुरवाळले त्यावेळी तिला विश्वास वाटला आणि मला समाधान लाभले.  आणि मला त्यानंतर मग पुन्हा काही मनात प्रश्न पडले नाहीत ‘मी हे काय करत आहे?’ ते सांगत होते.

त्यांनतर राकेश यांनी कुत्र्यासाठी अनाथालय सुरू करण्याचे ठरविले आणि त्यात खूप प्रकारच्या कुत्र्यांना आसरा दिला. सुरुवातील त्यांच्या पत्नीने विरोध नोंदविला होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयात या कुत्र्यांना  स्थान दिले होते. पण त्यांची संख्या खूप झाली त्यावेळी त्यांनी डोडबल्लापूर येथे काही जमिन विकत घेतली. बंगळूरू शहराबाहेर त्यांनी त्यांच्यासाठी अनाथालय सुरु केले.

या ठिकाणी कुत्र्यांना मुक्तपणे फिरता यावे आणि पोहता यावे यासाठी व्यवस्था आहे. त्यासाठी दहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यांना पशुवैद्यकाची देखील माहिती आहे असे हे कर्मचारी आहेत. राकेश म्हणाले की, “ ज्यावेळी मी प्रथमच हे काम सुरु केले त्यावेळी हे कुत्रे माझ्या कार्यालयात राहात होते. आता पाच जण माझ्या घरी दहा जण माझ्या कार्यालयात आहेत. त्यातील चार जणांना माझ्या कार्यालयातील सोफा झोपण्यासाठी दिला जातो. १२५जण बंगळूरूबाहरेच्या माझ्या घरी राहतात.

त्यांच्या जेवण्याचा औषध उपचारांचा खर्च दररोज पन्नास हजार रुपये आहे. त्यापैकी ९३% खर्च ते स्वत: करतात. त्यांच्या या अनाथालयाबद्दल लोकांनी खूपदा बंद करावे म्हणून आंदोलने केली आणि त्रास दिला. पण राकेश त्यांच्या श्वानप्रेमावर ठाम राहिले आणि या सर्वांना तोंड देण्यास सदैव तयार असतात.