तृतीयपंथीच्या सौंदर्यस्पर्धानी केरळ पुन्हा चमकले!

0

केरळने इतरांपेक्षा एक पाऊल नेहमीच पुढे टाकले आहे, आता त्यांनी तृतीयपंथीना प्रोत्साहन आणि पाठींबा देण्यात ही कामगिरी केली आहे. त्यांना सरकारी नोक-या आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून संधी दिल्यानंतर केरळाने नुकताच तृतीयपंथीसाठी पहिल्या वहिल्या सौंदर्यस्पर्धा आयोजीत केल्या होत्या. 


आर्टस ऍण्ड कल्चर सोसायटी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचा हेतू तिस-या लिंगाच्या समाजातील घटकांचे स्थान अधोरेखीत करणे हाच होता. शितल श्याम एक तृतीयपंथीसाठी काम करणारे कार्यकर्ता म्हणाले की, “ आमचा हा प्रयत्न आहे की, जास्तीत जास्त तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, त्यांना रोजगार देवून आणि जीवनाचा आनंद कसा घेता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.”

त्या अनुषंगाने, या स्पर्धांचे आयोजन नेडुंबर्सी, एर्नाकुलम येथील सीआयएएल कन्व्हेंशन सेंटरने १५ जून रोजी केले होते. यावेळी दिग्गज कलाकार जसे की, पार्वती ओमनाकुट्टन, रम्या नांबेशन, साधिका मुक्ता, शामना कासीम,कृष्णा प्रभा, आणि गायक रिमी टोमी इत्यादी हजर होते.

१५ स्पर्धक यावेळी भरगच्च भरलेल्या सभागृहात पंच समितीसमोर रँम्पवर चालले, ज्यात २००८च्या मीस इंडिया रजनी हरीदास यांचा समावेश होता. पार्वती ओमनाकुट्टन, आणि डॉ पॉल मनी, तसेच एआयएफचे डॉ सँम यांचाही यात सहभाग होता. या कार्यक्रमाची रौनक वाढवताना शेवटचा प्रश्न विचारण्यात आला की, “ जर तुम्ही एखादे मूल दत्तक घेतले तर ते कोणत्या लिंगाचे असेल मुलगा की मुलगी?” शाम्या ज्यांनी ही स्पर्धा जिंकली त्यांचे उत्तर होते, ‘मुलगा’!

या बाबतच्या वृत्ता नुसार, त्या २५ वर्षाच्या मल्याळम मधून पोस्ट ग्रँज्यूएट (पदव्युत्तर शिक्षण) झालेल्या अश्या व्यक्ती आहेत ज्यांना आठवडाभरापूर्वीच राज्य सरकारची पहिली वहीली शिष्यवृत्ती देखील मिळाली होती जी तृतीयपंथीसाठी सुरू करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की, “ महिलांच्या तुलनेत पुरूष तृतीयपंथीना जास्त त्रास देतात, त्यामुळे मी मुलगा दत्तक घेईन आणि त्याला शिकवेन की, तृतीयपंथाचा देखील कसा आदर करता येतो. आणि ते देखील इतरांसारखे कसे समान होवू शकतात. त्याला सा-यांचा समानपणे आदर करत लहानाचा मोठा होवू देईन”.

या कार्यक्रमाचे उदघाटन माकप (मा)चे राज्य सचीव कोडीयेरी बालकृष्ण यांनी केले होते, राज्याच्या आरोग्य मंत्री के के शैलजा देखील यावेळी उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “ तृतीयपंथी लोकांना अजूनही समाजाने पूर्णत: स्विकारले नाही. त्यात अभियांत्रिकी पदवीधारक आहेत,ज्यांना केवळ त्यांची ओळख दिल्याने नोक-या सोडाव्या लागल्या आहेत. केरळ सरकारने त्यांच्या साठी ब-याच गोष्टी केल्य आहेत. आणि आम्ही निरंतरपणे अनेक योजना तयार करत आहोत जेणेकरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येता यावे”.