सारे काही राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या बद्दल जाणून घ्या

0

रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे असे उमेदवार आहेत की, ज्यांनी राजकारणात नेहमीच शब्दांपेक्षा कृतीवर भर दिला. सामान्य पार्श्वभुमी असलेले हे ७१ वर्षीय उमेदवार नेहमीच वादांपासून दूर राहिले आहेत.


Image source: Business Standard
Image source: Business Standard

सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे शेतकरी कुटूंबात झाला. रामनाथ यांनी कायद्याच्या क्षेत्रात काम केले आणि ते दलितांचे महत्वाचे नेते आहेत. ते त्यांच्या प्रत्यक्षात राबविण्यात आलेल्या योजनांसाठी देखील प्रसिध्द आहेत.

सुरूवातीपासून कोविंद हे भारतीय जनता पक्षात राहिले, दोन वेळा ते उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य राहिले आहेत. १९९४ ते २००० आणि पुन्हा २००६ पर्यंत त्यांनी राज्यसभेच्या समितीचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे, आणि जीवनभर लोकसेवा केली आहे, वंचित आणि गरीबांसाठी त्यांनी नेहमीच मोलाची कामगिरी केली आहे.

रामनाथ कोविंद वाणिज्य शाखेचे पदवीधर असून  कानपूर विद्यापीठातून कायद्याची एलएलबी ही पदवी त्यांनी मिळवली. १९७ ७ ते ७९ दरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या उत्तर प्रदेश उच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले. त्यानंतर १९७८मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाच्या दप्तरी देखील सरकारी वकील म्हणून नोंदीत झाले. १९७१ मध्ये ते दिल्ली बार कौन्सिलसाठी वकील म्हणून कार्यरत होते, त्यावेळी त्यांनी गरीबांना, महिलांना आणि मागासवर्गाना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते फ्री लिगल सोसायटीचे काम करत होते. १९७७ -७८ मध्ये ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहायकही होते.

लखनौ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या संचालकापैकी एक म्हणूनही  त्यांनी काम केले. याशिवाय इंडियन इंन्स्टिट्यूटऑफ मॅनेजमेंट कोलकाता या संस्थेच्या संचालक मंडळावर देखील त्यांनी काम केले. २००२ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये देशाचे नेतृत्व केले आणि तेथे युएन जनरल असेंब्लीत भाषणही दिले.

ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांना बिहारच्या राज्यपाल पदाची सूत्रे मिळाली.