अशी एक शिक्षिका ज्यांनी लग्नाच्या दिवशी सुद्धा शिकवले मुलांना 

0

असे म्हणतात की, “काम असे करा की ज्याने तुमचे नाव होईल, प्रत्येक पाऊल असे टाका की त्याच्या खुणा उमटतील”, या उक्तीवादाला पूर्ण केले बिहारच्या छपरा गावातील तत्हीर फातिमा नामक मुलीने ज्या एका शाळेत शिक्षिका आहेत. तत्हीर यांनी आठवडाभर सुरु असलेल्या आपल्या लग्नाच्या तयारी मध्ये सुद्धा शाळेत जाणे सोडले नाही. एवढेच नाही तर आपल्या लग्नाच्या व पाठवणीच्या दिवशीसुद्धा शाळेत जावून मुलांना शिकवले. सैयद मोहंमद ईमाम व शमां आरा यांची मुलगी तत्हीर फातिमा, सारण जिल्यातील लह्लादपुर प्रखंड च्या प्राथमिक विद्यालय लष्करीपुरात उर्दू भाषेच्या शिक्षिका आहेत. एप्रिल महिन्याच्या नऊ तारखेला त्यांचा विवाह आलामगंज पटना शहर निवासी सैय्यद मुसा अली रिजवी यांचा मुलगा जफर अली रिजवी यांच्याशी नक्की झाला. सगळे नातेवाईक लांब लांबून आशीर्वाद देण्यासाठी आले व त्यांच्या आनंदात सहभागी झाले. नातेवाईक लग्नाच्या लगबगीत होते सगळेजण संध्याकाळच्या मुहूर्ताची आतुरतेने वाट बघत होते. पण, प्रश्न असा होता की या क्षणाला सुद्धा तत्हीर यांनी शाळेतून सुट्टी घेतली नव्हती.

तत्हीर सांगतात की,”लग्नासाठी मला जास्त दिवस सुट्टी घेणे आवडत नाही. माझे प्राथमिक कर्तव्य हे मुलांना चांगले शिक्षण देण्याचे आहे मी काही वेगळे करत नाही कारण सरकारने मला याच कामासाठी नियुक्त केले आहे, जी जबाबदारी मी प्रामाणिक पणे पार पाडत आहे.”

भलेही शिक्षिका या नात्याने आपल्या कामाप्रती समर्पण, याचे तत्हीर यांना अप्रूप वाटत नसेल,पण आज सगळ्यांसाठी त्या एक उदाहरण बनल्या आहेत. लग्नाच्या पाच दिवसापूर्वी हळद, मेहंदी इ. कार्यक्रम सुरु झालेले असतांनाही तत्हीर यांचे मुलांना शिकवायला जाण्याची चर्चा पूर्ण भागात जोरात सुरु होती. आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी शाळेत जावून मुलांना शिकवले व चॉकलेट वाटून आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला. तेच लग्नानंतर आपल्या सासरी जाण्याच्या दिवशी तत्हीर यांनी नेहमी प्रमाणे शाळेत जावून मुलांची हजेरी घेऊन त्यांना शिकवले. त्यानंतर घरी पोहचल्यावर त्यांची पाठवणी झाली.

शाळेतील मुले तत्हीर यांच्याशी भावनिकपणे जोडली गेलेली होती. शाळेतील विद्यार्थी पिंटू कुमार, कुणाल कुमार, काजल कुमारी, खुशबू यांनी सांगितले की जो पर्यंत मॅडम तुम्ही येत नाही तो पर्यंत आम्हाला तुमची कमी जाणवेल.

याप्रकारे एक शिक्षिका तत्हीर फातिमा द्वारा त्यांचे शिक्षणाप्रती असलेले समर्पण हे कौतुकास्पद व अनुकरणीय उदाहरण असून, विभागीय शिक्षण पदाधिकारी कमरुद्दीन अंसारी यांनी तत्हीर यांची प्रशंसा करून त्यांना सन्मानित करण्याची घोषणा केली. जिल्हा शिक्षण अधिकारी चंद्रकिशोर प्रसाद यांनी तत्हीर यांच्या कार्याची प्रशंसा करत अन्य शिक्षकांसाठी त्या एक प्रेरणा असल्याचे सांगितले.