दीर्घ मौन तोडून रिझर्व बँकेचे गवर्नर उर्जित पटेल यांनी सांगितल्या नोटबंदी बाबत महत्वाच्या दहा गोष्टी!

0

देशात सुट्या पैशांची चणचण आणि नोटबंदी हा खरेतर रिझर्व बँकेच्या अखत्यारीत असलेला सर्वात महत्वाचा विषय, पण गेल्या तीन सप्ताहांपासून त्यात देशाच्या केद्रिय बँकेच्या प्रमुखांनी मौन पाळून जणू काही मौनं सर्वार्थ साधनम् या वचनाचा परिचय करून दिला होता. पण रिझर्व बँकेच्या गवर्नरांच्या सहीने दिल्या जाणा-या चलनी नोटांच्या बाबातीत आणिबाणीसारखी स्थिती असताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काही याचिका झाल्या आहेत, त्यात गवर्नरांच्या अधिकारावर पंतप्रधान कार्यालयाने अतिक्रमण करत देशात चलनी नोटांच्या बाबतीत आणिबाणी पुकारल्याची  होवू लागल्याने पटेल यांना त्यावर समोर येवून बोलणे भाग पडले आहे. त्यांनी समोर येवून सांगितले की प्रामाणिक नागरिकांचे कष्ट कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी दहा महत्वाच्या बाबी सांगितल्या :-

पाचशे आणि हजारच्या नोटबंदीवर निर्माण झालेल्या स्थितीवर रिझर्व बँक दररोज नजर ठेवून आहे.

पुन्हा चलनी नोटा छापताना त्यांचे संतुलन ठेवण्यावर लक्ष दिले जात आहे.

नव्या नोटा तयार करताना त्यांचा हिशेब ठेवून त्यांची नक्कल केली जाणार नाही याची पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

लोकांनी डेबिट, क्रेडिट कार्डांचा डिजीटल वॉलेटचा सर्वाधिक वापर करून व्यवहार करावे, त्यातून व्यवहार पारदर्शक, आणि सुरळीत होतील.

बँकाना सांगण्यात येत आहे की त्यांनी व्यापा-यांना जास्तीत जास्त स्वाईप यंत्रे द्यावी त्यामुळे लोकांना डेबिट कार्डांचा वापर करून व्यवहार करणे शक्य होईल.

डिजीटल व्यवहारांत वाढ होणे भविष्यात विकसीत देशांप्रमाणे भारतालाही चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरेल.

बँका आणि एटीम बाहेरच्या रांगा कमी होत आहेत, पुन्हा बाजारात गर्दी दिसू लागली आहे, रोजच्या वापराच्या वस्तूंच्या टंचाईसारख्या स्थिती नाहीत.

एटीम यंत्रांना नव्या चलनी नोटांप्रमाणे सुधारीत करण्यासाठी ४० ते ५० हजार लोक रोज चोविस तास तैनात करण्यात आले आहेत.

बँका मिशन प्रमाणे या सा-या कामांमध्ये दिवस-रात्र सहकार्य करत आहेत, त्यामुळे पैसे वेळेवर मिळण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.