लक्ष्य गाठण्यासाठी स्त्री ला पुरुष बनणे गरजेचे नाही, आवश्यक आहे स्वतःमधील शक्यता उजळणे! 

0

समाजाची संरचना पाहिली तर, आपल्याला प्रत्येक गोष्ट दोन भागांमध्ये वाटलेली दिसते, जसे दिवस-रात्र, चांगले–वाईट, पांढरे-काळे इत्यादी. सर्वात महत्वाचे दोन भाग स्त्री आणि पुरुष आहेत, जे समाजाच्या प्रत्येक भागाने प्रभावित आहेत आणि प्रत्येक भागाला प्रभावित करतात. घर-बाहेर जिथपर्यंत नजर जाते, आम्ही स्त्री- पुरुष वादविवाद, चर्चा यांच्यापासून भिन्न होऊन विचार करणे अशक्य आहे. स्त्रीयांच्या प्रति भेदभावाला दुर्लक्षित तर केले जाऊ शकत नाही, परंतु त्याहून थोडा वेगळा विचार केला तर, समाजाचे असे अनेक भाग आहेत, जेथे स्त्रीने स्वतःसोबत झालेल्या भेदभावाला आपल्या लक्ष्याच्या समोर येऊ दिले नाही. इतिहासाच्या पानांवर काही शब्द असे मिळतात, जेथे स्त्री एक आदर्श म्हणून नावारूपास आली आहे. असेच एक उदाहरण आहे, अमृता प्रीतम यांचे...

अमृता प्रीतम यांचा जन्म ३१ऑगस्ट १९१९ला गुजरावाला पंजाबमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल प्राध्यापक होते आणि जेव्हा त्या ११वर्षाच्या होत्या, तेव्हा त्यांची आई मरण पावली. आयुष्याच्या या सुरुवातीलाच समस्येचा अंदाज या दोन वाक्यांमुळे येत नाही, परंतु पुढे जाऊनही, शांत आणि सहज जीवनही त्यांची प्रतीक्षा करत नव्हते.

अनेकदा पाहिले गेले आहे की, समाजाची कहाणी ही स्त्री ची कहाणी बनत नाही, परंतु स्त्री जेव्हा स्वतः आपल्या कहाणीसाठी हत्यार शोधते आणि त्यांचा आपला रस्ता बनविण्यात वापर करते, तेव्हा समाजाच्या कहाणीला चिन्हित करताना दिसते. अमृता प्रीतम यांच्या कहाणीला समाजाच्या कहाणीच्या पानांनी वाचले तर, त्यांचा विवाह कमी वयातच झाला, परंतु जीवनाच्या या खेळात त्यांनी विवाहाला मध्ये येऊ दिले नाही आणि विरोध असूनही त्यांच्या पहिला कविता संग्रह “अमृत लहरे” तेव्हा प्रकाशित झाला, जेव्हा त्या केवळ १६वर्षाच्या होत्या. लहानपणी एक वेळा, एक प्रेम कविता लिहिण्यावरून त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप ओरडले होते आणि सतर्क केले होते की, हा त्यांचा रस्ता नाही. तेव्हा त्यांना माहित नव्हते की, प्रेमाच्या गोष्टी सांगणे आणि प्रेमात राहणे हाच त्यांचा रस्ता असेल. त्यांच्या वडिलांची देवा- धर्मावरील अतूट श्रद्धा देखील अमृता प्रीतम यांना त्या रस्त्यावर घेऊन गेली नाही. १९३६ते १९६०पर्यंत त्या आपले पति प्रीतम सिंह यांच्या सोबत राहूनही कधीही घरात त्यांना महत्व देण्यात आले नाही.

साहीर लुधियानवी यांच्यासोबत त्यांच्या प्रेमाची चर्चा प्रत्येक ठिकाणी होती आणि या समाजात विवाहित स्त्री अन्य कुणावर प्रेम करेल, हे कधीही मान्य करण्यात आले नाही. अमृता प्रीतम यांच्या सशक्त व्यक्तिमत्वाने कधीही कुठलीही गोष्ट, टिकेला आडवे येऊ दिले नाही. त्यांच्या शब्दांचा प्रवास कायम अव्वल राहिला. त्यानेच त्यांना ते विचार, ती साधना आणि ते शब्द दिले ज्यांनी त्यांच्या स्त्री होण्याच्या अस्तित्वाला सार्थक केले.

इमरोज यांच्यासोबत त्यांचे प्रेम एक वेगळीच कहाणी आहे, जी चाळीस वर्षांपर्यंत सुरू राहिली आणि त्यासोबतच त्यांच्या कादंब-या, कविता संग्रह  नागमणी सारख्या नियतकालिकासोबत अतूट झाल्या.

केवळ प्रेमच नाहीतर समाजातील दु:खानेही त्या़ंना झपाटले. भारताच्या फाळणीने त्यांच्या व्यक्तिगत दु:खांना मागे टाकले आणि संपूर्ण मानवतेच्या दु:खाला जाणिव देणारी एक संवेदनशील महिला म्हणून त्या अमर झाल्या. त्यांची कविता ‘आज वारिस शाह नून ’ दु:खितांचा आवाज बनली. अमृता प्रितम यांनी ज्या हिंमतीने समाजाच्या रुढींच्या विरोधातही जाऊन आपली ओळख बनविली ती अनोखी गोष्ट आहे. इथे ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, केवळ परंपरांच्या विरोधात जाणेच नाहीतर त्याविरोधात जाऊनही स्वत:ला सिध्द करणे आणि कायम करणे ही मोठी गोष्ट आहे.

त्यांना मिळालेले पुरस्कार या गोष्टीचे प्रमाण आहे की, वाईट काळाची देखील एक सीमा असते आणि निष्ठेने जगलेले जीवन केवळ एकाचे नसते समाजाचे होऊन जाते अगदी समाजाचे नियम जरी ठोकरले असतील तरी. साहित्य अकादमी पुरस्कार (१९५६), पद्मश्री (१९६९),पदम-विभूषण आणि इतर अनेक विद्यापिठांनी दिलेल्या सन्मानाच्या डि-लीट, या गोष्टीच्या प्रमाण आहेत की ज्या समाजाने त्यांना एकदा विरोध केला होता त्याच समाजाने त्यांच्या साहित्याला आपलेसे केले. आपल्या साठ वर्षांच्या साहित्यिक रचनाकाळात त्यांनी २८ कादंब-या, अनेक कविता संग्रह, लघु-कथा आणि कित्येक अनोख्या गोष्टींचा प्रयोग करताना अनेक पुस्तके आपल्या व्यक्तिमत्वांचा भाग बनविली. संस्कृती आणि परंपरांचा विरोध केल्यानंतरही आपल्या रचनांमधून समाजाला समृध्द बनविताना अमृता प्रितम यांनी सिध्द केले की, हिंमत आणि धैर्याला कोणताही मापदंड लावता येत नाही. प्रत्येकवेळी चाकोरीतील रस्तेच लक्ष्यापर्यंत घेऊन जात नाहीत, लक्ष्य त्या रस्त्यांनेही गाठता येते ज्यावर कधीच कोणी चालून गेले नसते. जे रस्ते बाहेरुन पाहिले तर चुकीचे दिसतात, प्रत्यक्षात ते नजरेचा दोष ठरतात. साहित्य निर्मितीचा रस्ता कसाही का असेना त्याचा संवेदनशीलपणा अखेरीस संस्थेसारखा भासू लागतो.

शेवटी इतकेच म्हणता येईल की, अमृता प्रीतम यांनी स्त्री होण्यास नकार देऊन पुरुषांच्या अस्तिवाकडे चालण्याचा प्रयत्न केला नाही. स्त्री होणे काही दुय्यम मानले नाही, त्यातील शक्यताना पूर्ण प्रयत्नाने समजून घेतले आणि जगल्या. एक उंची गाठण्यासाठी, स्त्रीला पुरुष बनण्याची गरज नाही. स्वत:मधील शक्यतांना उजळण्याची गरज आहे. जे अमृता प्रीतम यांनी नेमेकेपणाने केले. स्त्री होण्यातील सौंदर्य त्यांनी समजले आणि उजळले.

लेखक : मिनी गिल
अनुवाद : किशोर आपटे