'मुंबई ते ऑस्कर' आठ वर्षांच्या चिमुरड्या सन्नी पवार यांचा अनोखा प्रवास!

0

८९वे अकादमी पुरस्कार होवून गेले, पण इंटरनेटवरून होणा-या सन्नी पवार यांच्या कौतुक वर्षावाला पार नाही. या लहानग्या भारतीय अभिनेत्याची भूमिका असलेल्या ऑस्कर नामांकीत सिनेमा लायन ज्यात देव पटेल आणि निकोल किडमन यांच्या भूमिका आहेत, त्याने स्टार पुरस्कारात खूप लौकीक संपादन केला आहे. या कार्यक्रमाचे होस्ट जिम्मी किम्माल यांनी तर लहानग्या सन्नीला स्वत:च्या कडेवर उचलून घेवून त्याचे कौतूक केले. 


सन्नी ज्याने सारो ब्रेआर्ली ची भूमिका साकारली आहे, लहानपणीच्या काळातील देव पटेल, ‘स्लमडॉग मिलियनेअर’चे अभिनेता ज्यांनी मंचावर येवून त्याच्या सिनेमाचा परिचय करून दिला. लायन ही एका लहानग्याची सत्य कथा आहे, जो त्याच्या कुटूंबाला दुरावला आहे,आणि नंतर ऑस्ट्रेलियन कुटूंबाने त्याला दत्तक घेतले. जेंव्हा तो मोठा झाला, त्याने गुगल अर्थच्या मदतीने त्याच्या पालकांचा शोध घेतला.

हा पहा ट्रेलर: https://youtu.be/-RNI9o06vqo

सन्नी याने फोनेटिक्सच्या मदतीने इंग्रजी बोलण्याचा सराव केला, कारण त्याला फक्त हिंदी बोलता येत होते, सुरूवातीला दिग्दर्शक गार्थ डेविस यांनी त्यासाठी खूप संघर्ष केला, परंतू केवळ सन्नीच त्यातून मेहनत करून पुढे येवू शकला. गार्थ आणि कास्टिंग डायरेक्टर क्रिस्ती मँग्रेऑर यांनी २ हजार पेक्षा जास्त टेपस् पाहिल्या आणि अखेर त्यातून सन्नी यांचीच या भूमिकेसाठी निवड केली. याबद्दल एका मुलाखती दरम्यान गार्थ म्हणाले की, “ माझ्यासाठी, जेंव्हा मी लहान मुलांचा शोध घेत होतो,जो मला त्यावेळी भावेल असा कुणीव वाटला नाही मला वाटले हे आता बंद करावे. आणि एक दिवस, हा लहानगा सन्नी खोलीत आला आणि मला तो खूपच  योग्य असा वाटला.”

अभिनेता देव पटेल यांनी त्यांच्या चॅट मध्ये म्हटले आहे की, सन्नी बद्दल काय सांगायचे, “ तो आमचा या सिनेमातील लहानगा मार्गदर्शक आहे. यापूर्वी  त्याने कधीच हॉलीवूड सिनेमा पाहिला नाही, आणि आता मात्र तो या मोठ्या सिनेमात महत्वाची भूमिका साकारतो आहे. तो खूपच निरागस आहे त्यामुळेच त्याच्या कडून इतकी छान भूमिका साकारली गेली आहे. तो ख-या अर्थाने ती जगला आहे”.

सध्या सन्नी अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या विचारात आहे, तो आयपीएस अधिकारी देखील होण्यात आणि मुंबई पोलिस दलात सामिल होण्यात देखील रूची असल्याचे सांगतो. त्याला डब्ल्यूडब्ल्यूइ आवडते, आणि या सामन्यात हजेरी लावण्यास तो उत्सुक आहे.  या लहानग्या अभिनेत्याला खायला आणि झोपायला आवडते.

या  लहानग्या आठ वर्षिय सनीला ह्रतिक रोशन यांच्या क्रिश या सिनेमाची आवड आहे. आणि त्याला सुपरहिरोची भूमिका भविष्यात साकारायची आहे.

त्याला त्याच्या सुपरहिरोची भूमिका साकारण्याची संधी मिळेल किंवा नाही, पण या लहानग्यासाठी भारतात सध्या लाल पायघड्या घातल्या जात आहेत कारण त्याने ऑस्करमध्ये जी कामगिरी केली आहे ती अव्दितीय अशीच आहे.