देशात ऑरगॅनिक क्रांती घडवण्याचा 'बिगबास्केट'च्या हरी मेनन यांचा मानस

देशात ऑरगॅनिक क्रांती घडवण्याचा 'बिगबास्केट'च्या हरी मेनन यांचा मानस

Friday February 05, 2016,

4 min Read

'किरकोळ व्यापार क्षेत्रात, मी नव्या दमाच्या ई-कॉमर्स क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत होतो, ते म्हणजे अन्न आणि किराणा मालाचे. जो अंमलबजावणी भूमिकेच्या दृष्टीने एक सर्वात कठीण व्यवसाय होता.', हे उद्गार आहेत बिगबास्केटचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरी मेनन यांचे. 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६'मध्ये ते बोलत होते. डिसेंबर २०११ साली स्थापन करण्यात आलेले बिगबास्केट हे अन्न आणि किराणा मालाचे सर्वात मोठे ऑनलाईन दुकान असून, भारतातील १८ शहरांमध्ये सध्या ते कार्यरत आहे. २०१६ साली अन्य आठ शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. बंगळूरू स्थित ऑनलाईन किराणा मालाचा हा स्टार्टअप विविध प्रकारच्या जवळपास १५ हजारांच्या वर उत्पादनांची विक्री करतो. त्यात किराणा माल, फळे, भाज्या, दुग्ध उत्पादने, वैयक्तिक उत्पादने, लहान मुलांकरिता उत्पादने तसेच घरगुती उत्पादनांचा समावेश आहे.

image


भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ही २०२० या वर्षापर्य़ंत अर्ध्याएक अब्जापर्यंत पोहोचण्याची तर जवळपास एक हजार ४४ अब्ज नागरिक अन्न आणि किराणा मालाची खरेदी ऑनलाईन करण्याची शक्यता आहे. सध्या १४४ दशलक्ष नागरिक प्रतिमाह पाच हजाराच्या किराणा मालाची खरेदी करतात. एकंदरीतच २०२० या वर्षापर्यंत ऑनलाईन व्यवसाय हा २० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ते सांगतात की, 'भारतात किरकोळ व्यापाराची उलाढाल जवळपास ५०० अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यापैकी ७० टक्के उलाढाल ही अन्न आणि किराणा मालाच्या व्यवसायात होते. ती जवळपास ३६० अब्ज डॉलर्स एवढी आहे. २०२० या वर्षापर्यंत ही ५०० अब्ज एवढी होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन किराणा मालाच्या क्षेत्राची सध्या सुरुवात झाली असून, १५० दशलक्ष एवढी त्याची उलाढाल आहे. येत्या काळात ती १० अब्जाएवढी होण्याची शक्यता आहे.' संपूर्ण किरकोळ क्षेत्रात ऑनलाईन किराणा मालाच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास हरी सांगतात की, 'भारतातील किराणा मालाचे ऑनलाईन दुकान हे एक टक्क्यापेक्षा कमी योगदान देते. २०१८ सालापर्यंत त्याच्या योगदानात एकूण दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.' येत्या दोन वर्षात बिगबास्केट एक मोठे लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या त्यांच्या एक हजार कोटींच्या (१५० दशलक्ष अमेरिकन डॉलर) महसूलात वाढ होऊन तो २ अब्ज डॉलर एवढा वाढण्याची शक्यता आहे.

हरी यांच्या मते, बिगबास्केटमधील २० टक्के किंमत ही फळे आणि भाज्या यांच्या विक्रीतून मिळते. मानवी साखळीच्या कार्यापेक्षा ही किंमत तिप्पट अधिक आहे. मानवी साखळी जवळपास सहा ते सात टक्के एवढेच योगदान देते. ते पुढे सांगतात, 'आमच्यासाठी फळे आणि भाज्यांमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते. 'ऑनलाईन फार्म टू फॉर्क' आम्हाला सर्वात चांगला अनुभव देतो. कारण आम्ही शेतीउत्पादने शेतकऱ्यांच्या भाजी मंडईतून घेतो. त्यानंतर तिच्यावर प्रक्रिया करुन ती थेट ग्राहकाला पुरवण्यात येते. फळे आणि भाज्या आमच्याकरिता महत्वाची भूमिका बजावतात.' जुने गुंतवणूकदार बेस्समेर वेंचर पार्टनर्स यांच्या नेतृत्वाखाली बिगबास्केट यांनी आपल्या व्यवसायात ५० दशलक्ष डॉलर्सची वाढ केली आहे. व्यवसाय विस्ताराकरिता याचा वापर करण्यात येणार असून, त्याद्वारे व्यवसायात नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

बिगबास्केट त्यांची ४० टक्के फळे आणि भाज्या कर्नाटक राज्यातूनच घेते. त्यापैकी ३० टक्के उत्पादने ही थेट शेतकऱ्यांकडून घेण्यात येतात. पुरवठा साखळीचा अधिक खोलवर विचार केल्यास कंपनीने कर्नाटक राज्यात विविध शहरांमध्ये शेतमाल गोळा करण्यासाठी केंद्र उभारली आहेत. 'आम्ही काही शेत व्यवसायांसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले असून, ज्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांशी थेट व्यवहार करता येतो. सर्वोत्तम उत्पादन मिळवण्याचा आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचा आम्ही कायम प्रयत्न करत असतो. सध्या आमची शेतमाल गोळा करण्याची केंद्रे चिक्काबल्लापूर, मल्लूर, नेलामंगला, गोकाक आणि म्हैसूर येथे असून, आम्ही ३३६ शेतकऱ्यांसोबत एक हजार ४८ एकर शेतजमिनीमध्ये काम करत आहोत. या परिसरात आम्ही जवळपास ४०० टन फळे आणि भाज्यांचे उत्पादन करत आहोत', असे हरी सांगतात.

भारतात ऑरगॅनिक उत्पादनांची मागणी खूप जास्त आहे. मात्र उत्पादनांची मागणी आणि पुरवठा यांमध्येदेखील मोठी दरी असल्याचे हरी सांगतात. बिगबास्केट काम करत असलेल्या सहकाऱ्यांकडून त्यांना मर्यादित उत्पन्न मिळत असल्याचे हरी सांगतात. त्यामुळे बिगबास्केट उत्पादने जमा करण्याची ७० ते ८० केंद्र फक्त ऑरगॅनिक फळे आणि भाज्या गोळा करण्यासाठी उभारण्याचा विचार करत आहेत. सध्या शेतकरी हे अनेक समस्यांना सामोरे जात असून, त्यामुळे ऑरगॅनिक शेतीद्वारे कमी उत्पादनांची निर्मिती होत आहे. 'विशेष करुन ऑरगॅनिक उत्पादनांकरिता संशोधन प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रस्ताव लवकरच आम्ही सरकारला देणार आहोत. ग्राहक ऑरगॅनिक उत्पादनांमध्ये प्रमाणीकरण मुख्य करुन पाहतो. सध्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही क्लिष्ट असून, आम्हाला त्याकरिता आंतरराष्ट्रीय संस्थांकडे जायचे नाही. आम्ही सध्या पीजीएस (पार्टीसिपेट गॅरंटी सिस्टम) सोबत काम करत आहोत. आम्ही शीत साखळीद्वारे तसेच प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेद्वारे या उत्पादनांची आयुमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑरगॅनिक उत्पादनांना उज्ज्वल भविष्य असून, आम्ही त्यात गुंतवणूक करणार आहोत', असे हरी सांगतात.

लेखक – अपराजिता चौधरी

अनुवाद – रंजिता परब